Skip to content

तुम्ही दोघेही एक माणूस आहात १००% संसार सुखी व्हायला जादूगार नाहीत.

तुम्ही दोघेही एक माणूस आहात १००% संसार सुखी व्हायला जादूगार नाहीत.


रोहिणी राधाकिसन


थोडं तुझ थोडं माझ मिळून बनतं दोघांच. संसाराच्या गाडीचे दोन चाक असतात, एक नवरा आणि एक बायको. एकही चाक थांबल किंवा बंद पडल तर नक्कीच गाडी बंद पडणार ती पुढे नाही जाऊ शकत. हे आपण ऐकत आलो आहोत आपल्या थोरांकडून बरोबर ना?
पण आपण मनुष्य आहोत. एक माणूस आहोत.

आणि आपण माणूस असल्याचा पुरावा म्हणजे चुका हो ना ! मग जर आपला जोडीदार कुठे कमी पडतोय चुकतोय तर आपण त्याचा बवाल करण्याची गरज नसते, पण आपण करतो आणि तिथून आपल्या संसाराची सुख शांती भंग व्हायला सुरवात होते.

हा संसार आहे चढ-उतार, सुख:-दु:ख तर असणारच ना. मग जर एखादी गोष्ट मागे पुढे होते तर चालतय की! प्रत्येक दिवस सुखाचाच नाही होऊ शकत कधी सुख: कधी दु:ख दोन्ही अनुभवले पाहिजेत. आपण एखादी मूवी बघतोय आणि त्यात सर्व काही फक्त छान सुरू आहे तर तुम्हाला ती मूवी बघायला मज्जा येईल का बर? नक्कीच नाही. त्यात थोडा ट्विस्ट पाहिजे, दु:ख पाहिजे, ड्रामा पाहिजे, रोमॅन्स पाहिजे, आणि एक विलण पण पाहिजे तेव्हाच तर कळेल की हीरो कोण आहे.

हीरो आपल्या आवडीचा असतो पण तो विलण असतो जो हीरो ला हीरो बनवतो. जर सगळे कॅरेक्टर्स चांगले असतील तर कस कळेल की रीयल हीरो कोण आहे म्हणून, बरोबर ना? आता तुम्ही म्हणाल येथे या सगळ्याचा काय संबंध हो ना? आहे संबंध आहे आणि तो असा की, आपला संसार पण एका मूवी सारखा आहे. जर आपल्याला फक्त आणि फक्त सुखच मिळाल संसारात तर कस कळेल की आपल्या जोडीदारच खरंच आपल्यावर कीती प्रेम आहे ते. नाहीच कळणार की खरंच अपला जीवनसाथी आपल्याला कीती साथ देईल आपल्या पडत्या काळात आणि कीती सोबत करेल ते.

आणि शेवटी कितीही म्हंटल तरी हा संसार आहे, कुठे ना कुठे कमी जास्त होणारच. कितीही प्रयत्न करा आपण कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नाही नेऊ शकत. काही ना काही सुटणारच. यावर एकच उपाय, आहे त्यात समाधान मानने. आणि सुखी राहणे. बऱ्याचदा आपण आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे लक्ष न देता. जे कधी आपल्याला मिळणारच नाही. अश्या च्या मागे पळतो. सोप्या भाषेत, हातच सोडून पळत्याच्या मागे लागणे.

बरीच लोकं( पुरुष/स्त्री दोघेही ) आपल्या संसाराची तुलना दुसऱ्याच्या संसाराशी करतात. पण ती कधीच होऊ शकत नाही. हे सर्वांना माहीत असत तरीही आपण करतो. त्याची बायको जॉब करते मुलांना, घर दोन्ही सांभाळते. पण याला ही माहीत नसतं की तिचा नवरा तिला सपोर्ट करतो ते, घरात तिची मुलं सांभाळायला तिची सासू-सासरे असतात.

बायकांचही अगदी असच तिचा नवरा एवढ कमावतो, तिला मदत करतो घरात, बाहेर नेतो, आणि आणखी बरच. पण तू बघितलस का, नाही मला तिने सांगितल! मग तू कशी compare करतेस तुझ्या नवऱ्याला तिच्या नवऱ्याशी. ठीक आहे तो जास्त कमावतो, पण जास्त कामावण्याच्या नादात घरी वेळ नाही देऊ शकत, पोरांसोबत नसेल खेळत. बायकोला वेळ नसेल देत.

ठीक आहे तुझ्या नवरा जॉब करतो. पण सगळ व्यवस्थित आहे ना ! तुला वेळ देतो. कामावरून आल्यावर घरी थांबतो. तुझी काळजी घेतो. मुलांना वेळ देतो. अश्या दिखाव्यांमुळे सुद्धा खूप वेळा नवरा बायकोंना खूप तानावातून जाव लागत. आजकाल तर या मोबाईल मुले खूपदा भांडण होतात. पण एकमेकांना सांभाळून घेतल्याने खूप गोष्टी सोयीच्या होतात.

पहिल्या म्हणजे आपल्या आजी आजोबांच किंवा अगदी आपल्या आई वडिलांच उदाहरण घ्या त्यांच्या संसारात कधी आपण काडीमोड, सोडून जाणे असले प्रकार बघितले नव्हते. आणि आज बघाल तर संसार म्हणजे शब्दा शब्दाला आपण वेगळ होण्याची भाषा बोलतो. पहिले आपल्या आई आजींच काही अस्तित्व, वर्चस्व नसायच त्या जसं नवरा म्हणेल घरचे म्हणतील तस करायच्या. त्यांनी घेतलेले निर्णय स्वीकारणार अस होत. आणि आपणही पहिलं आहे त्याचा त्यांना होणारा त्रास.

पण आजची स्थिति वेगळी आहे. आज स्त्रीचं स्वतःच अस्तित्व आहे तिची स्वतःची अशी ओळख आहे. ती बाहेर पडून पुरुषांच्या बरोबरीने काम करते. मग तिची एक डिमांड असते की, ती जॉब करते नवऱ्याला हातभार लावते. आणि ती आजची गरजही आहे. तिला थोडीशी मदत करावी नवऱ्यानी. थोडं समजून घ्यावं. कधी तिलाही थकलीस का विचारवं, एवढंच.

प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही होऊ शकत तुम्ही कितीही प्रयत्न करा काही ना काही सुटणारच. पैश्यांच्या मागे गेलात तर माणसं, आणि माणसांच्या मागे गेलात तर पैसे. थोडं तुझ थोडं माझ करून १००% सुखी जरी नाही झालात तरी समाधानी नक्कीच व्हाल.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!