बायकोच्या चेहऱ्यावर कायम समाधान राहील यासाठी काही टिप्स.
हर्षदा पिंपळे
सुकन्या म्हणजे जणू दरवळणारी बकुळी.१९ चा काळ म्हणजे तसा जुनाच काळ.त्यावेळीही तसं स्त्रियांच जगणं अवघडच होतं.सगळीकडेच सगळ्याच स्त्रियांना मोकळीक नव्हती.पण सुकन्या मात्र त्या बाबतीत अगदीच नशीबवान होती. सुकन्याला सगळ्याचीच मोकळीक होती.सुकन्याला चांगलं शिक्षणही मिळालं.चांगल्या कॉलेजमधून तिने मराठी विषयात पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.सुकन्याला लहानपणापासूनच साहित्यात खूपच रस होता.कवितांची तर ती वेडी चाहती होती.
ती स्वतःही खूप सुंदर सुंदर कविता करायची.आणि याच कवितांच्या प्रेमात श्रीरंग नावाचा कॉलेजमधील कुणीतरी मुलगा वेडा झाला.त्याला सुकन्याने लिहलेल्या कविता खूप आवडायच्या. हळुहळू त्याने सुकन्यासोबत ओळख वाढवली होती.सहवासाने त्यांच्यात छान मैत्री झाली होती.मैत्री झाल्यानंतर दोघांचही एकमेकांशिवाय पानच हलायच नाही. कालांतराने त्यांच्या मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं.दोघांच लग्नही झालं.नंतर सुकन्या एका कॉलेजमध्ये नोकरीला लागली.मराठीची फेवरेट प्रोफेसर म्हणून तिची एक वेगळी ओळख होती.आणि श्रीरंग एक उत्तम चित्रकार होता.
लग्नानंतरही दोघांच छान चाललं होतं. श्रीरंग तसा स्वभावाने शांत होता.पण सुकन्या मात्र स्वभावाने थोडीशी तिखट मिरची होती.लग्नाआधी सुकन्याचे शंभर नखरे श्रीरंगने हसतहसत झेलले होते. लग्नानंतरही सुकन्याचे नखरे काही कमी झाले नव्हते. प्रत्येक जोडप्यात होतात तसे छोटे छोटे वाद यांच्यातही व्हायचे. पण यामुळे सुकन्या मात्र नाराज व्हायची. तिच्या चेहऱ्यावर असणारं हसु क्षणार्धात उडून जायचं. अपेक्षा नसल्या तरी तिच्या तक्रारी फार असायच्या.
“आज पांढराच शर्ट का घातला..? खूप खराब होतो आणि मग इतर वेळी पुन्हा तेच शर्ट घालतोस.तो ओला टॉवेल ते सॉक्स बेडवर टाकून तसाच जातोस.डब्बा तर पूर्ण संपवतही नाही. इतकं कष्टाने बनवायच आणि तु खात नाहीस याला काय अर्थ आहे..?बोलू नकोस तु माझ्याशी… जा.” असं सुकन्या श्रीरंगला कित्येकदा बोलायची. कधी कधी तिच्या चेहऱ्यावर ना हसू असायचं ना की समाधान असायचं.त्यावेळी श्रीरंगला काही सुचायचच नाही. तिचा असमाधानी चेहरा श्रीरंगला अस्वस्थ करायचा. त्यामुळे श्रीरंगने एक दिवस सुकन्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान पुन्हा एकदा फुलवायच ठरवलं.
सुकन्याला निळसर रंग फार आवडतो हे श्रीरंगला माहीत होतं. तसेच सुकन्याला भटकंतीचही प्रचंड वेड होतं.त्यामुळे श्रीरंगने एक दिवस सुकन्यासाठी निळसर रंगाची छान साडी आणली.साडीसोबत बकुळीचा गजराही आणला होता.जवळच असलेल्या किनाऱ्यावर तिला फेरफटका मारायलाही तो घेऊन गेला.
पाण्यात पाय टाकून, हातात हात घेऊन दोघे छान गप्पाही मारत होते.बऱ्याच दिवसांनी फिरायला घेऊन गेल्यामुळे सुकन्या खूपच खुश होती.श्रीरंगला इतकं निवांत पाहून सुकन्याला फार बरं वाटत होतं.कमालीची सुखावली होती ती.असाच अधूनमधून तो सुकन्याला घेऊन चार निवांतपणाचे क्षण अनुभवायला किनाऱ्यावर घेऊन यायचा.
घेवड्याची भाजी तर श्रीरंगला अजिबात आवडत नव्हती. पण तरीही तो रोज जी भाजी असेल ती आवडीने खायचा.डब्बा पूर्णपणे संपवून घरी आणायचा. तिच्या जेवणाच मनापासून कौतुकही करायचा. दमायची ती कधी कधी सगळं करून .म्हणून तिला एकदिवस पूर्ण आराम द्यायचा. शक्य होईल तसं वेळात वेळ काढून तिला जमेल तितकी तिला मदत करायचा.
इतर वेळी आणि तिच्या त्या चार दिवसांमध्येही तो तिची छान काळजी घ्यायचा. तसं काळजी घेणं श्रीरंगला छान जमायच. पण त्या दिवसापासून तो नव्याने तिची काळजी घेऊ लागला. नव्याने तिला जाणून घेऊ लागला. हळुहळू तिच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा फुललं.ती हसत होती म्हणून घरही हसत होतं. जुन्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने गंध आला होता.श्रीरंग नी सुकन्याच्या नात्याला एक नवी पालवी फुटली होती. “ती” आनंदी समाधानी झाली नी सगळ्या सुखाच्या व्याख्या श्रीरंगला नव्याने उमगल्या होत्या.
त्यांची लव्हस्टोरी तर लोणच्यासारखी मुरतच राहिली…. पण तुमच काय…? तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावर समाधान असतं का…? तिच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान हरवतय का…?
तसं असेल तर या काही टिप्स तुमच्यासाठीच—–
रिस्पेक्ट-
रिस्पेक ही अशी गोष्ट आहे जी नात्यांमध्ये असायलाच हवी. म्हणून आपल्या पत्नीचा रिस्पेक्ट करा.तिच्याशी आदराने वागा.तिला कोणत्याही प्रकारची चुकीची वागणूक देऊ नका. इतरांसमोर तिला विनाकारण चुकीचं काही बोलू नका. तिच्याशी नम्रपणे बोला.
वेळ-
आयुष्यात वेळेला प्रचंड महत्त्व आहे. आणि नात्यांच म्हणाल तर एक एक क्षण नात्यांमध्ये महत्वाचा असतो.त्यामुळे पत्नीला शक्य होईल तितका थोडासा वेळ द्या. आपल्या नवऱ्याने किमान थोडासा तरी वेळ द्यावा अशी तिची माफक अपेक्षा असते.त्यामुळे नक्की तिला वेळ द्यायचा प्रयत्न करा.
निवांतपणाचे क्षण-
रोज नाही पण कधीतरी कुठेतरी पत्नीला छानशा ठिकाणी फिरायला घेऊन जा.तिथे जाऊन मोकळेपणाने छान गप्पा मारा.
स्वयंपाकाच कौतुक-
रोज इतका चविष्ट स्वयंपाक करून करून ती कधीच कंटाळत नाही. दुसऱ्या दिवशीही ती तितकाच चविष्ट स्वयंपाक करते. तिने बनवलेल्या स्वयंपाकाच आवर्जून कौतुक करा.”आज वांग्याची भाजी काय चविष्ट झाली गं…आणि काकडीची कोशिंबीर तर…आहाहाssss…!” असं म्हणून प्रेमाने जरा कौतुक करा.
अन्नाचा अपमान करणं थांबवा-
तिने प्रेमाने जेवण बनवलेलं जेवण कधीच वाया घालवू नका. भरल्या ताटावरून कधीच उठू नका.संपेल तितकच ताटात वाढून घ्या.उगाचच भरमसाठ घेऊन ते वाया घालवू नका.
ऑफिसमध्ये नेलेला जेवणाचा डबा पूर्णपणे संपवा.(नवरा जेवला याचं समाधान तिला सुखावणारं असतं.) ज्यादिवशी डबा नको असेल त्यादिवशी तिला त्याची पूर्वकल्पना द्या.संध्याकाळी जेवायला येणार नसाल तर त्याचीही कल्पना तिला द्या.
कधी तिच्यासोबत बाजारात भाजी आणायला जा.(ती बारगेनिंग करत असेल तर करूद्या. तुम्ही केवळ तिच्यासोबत जा आणि तो क्षण एन्जॉय करा.)
*एक दिवस तिला पूर्णपणे विश्रांती द्या. तिची सगळी कामं स्वतः करा.
*तिच्या आवडीची गोष्ट करायला सहसा नकार देऊ नका.
*तिच्याबरोबर स्वतःची काळजी घेत जा.ति तितकीच निर्धास्त राहू शकते.
*नेहमी आनंदी रहा.(तुम्ही खुश तर तीही खुश असते.)
*तिच्या आजारपणात तिची योग्य काळजी घ्या. तिची दगदग समजून घ्या.
*तिची चूक झाल्यास न रागवता समजावून सांगा.
*तिच्या घरच्यांना समजून घ्या. तिच्या नातेवाईकांशी चार शब्द बोला.”तुझे नातेवाईक आहेत तर तु बोल” असं म्हणून ते बोलणं टाळू नका.
*तिला जर पुस्तकांची आवड असेल तर तिच्यासाठी छान पुस्तकं खरेदी करा. तिच्या आवडीच्या कविता वाचून दाखवा. तिच्या आवडीची गाणी लावा.
*जर बायको गृहीणी असेल तर “कमवत नाहीस ,तुला काय कळणार पैसे कमवायला काय काय करावं लागतं”असं बोलून तिला दुःखावू नका.याउलट महिन्याला थोडेफार पैसे तिला स्वतःहून खर्चायला देत जा.”तुला काय हवं ते घे…किंवा हे पैसे तुला ठेव” असं सांगा.
* तिला कधीतरी तिच्या माहेरी स्वतःहून पाठवा. शक्य असल्यास सोडायला जा.”पुन्हा लवकर ये,तुझी वाट पाहीन” असं प्रेमाने सांगायला विसरू नका.
*”एक दिवस तिचा”असं म्हणून तिला तिच्यानुसार वागूद्या.
*तिच्या कलाकुसरीच कौतुक करा.तिच्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्या.
*तिला नटण्याची हौस असते.तर तिची ती हौस नाकारू नका.
आणि राहिला प्रश्न शारीरिक जवळीकतेचा….तर शारीरिक गरज ही नैसर्गिक असली तरी शारीरिक आणि मानसिक गरजेमध्ये खूप फरक आहे.स्त्रीची मानसिक गरज जेव्हा पूर्ण होते तेव्हा खऱ्या अर्थाने ती समाधानी असते.त्यामुळेच तिच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलले,तिला समजून घेतलं तर तिच्यासाठी याच गोष्टी खूप सुखकारक असतात.त्यामुळे तिच्या मानसिक गरजा समजून घेऊन तिला समाधानी ठेवायचा प्रयत्न करा.
पहा…सुमन-श्रीरंग सारखच तुमचं नातही लोणच्यासारखं मुरायला वेळ लागणार नाही.ती समाधानी असेल तर पूर्ण घर घरासारखं वाटेल.
टिप्स आवडल्यास नक्की सांगा.आणि तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील तर शेअर करायला विसरू नका.
