Skip to content

तुमच्या बायकोला जुन्या गर्लफ्रेंड बद्दल सांगून उगाचच नामुष्की ओढवून घेऊ नका.

तुमच्या बायकोला जुन्या गर्लफ्रेंड बद्दल सांगून उगाचच नामुष्की ओढवून घेऊ नका.


मयुरी महाजन


नवरा बायकोच्या नात्याची नाजूक डोर ही विश्वासाच्या पायावरती उभी असते, एकमेकांवरती असलेला विश्वास व्यक्तिला खरेपणाची व आपल्यावर असलेल्या अतुट प्रेमाची साक्ष देत असते,

आताच्या जनरेशनचा आपण विचार केला, तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा शब्द कॉमन वापरला जातो, फ्रेंड सर्कल मध्ये, त्यातल्या त्यात एखादी आवडत असेल, किंवा एखादी लाईकही करत असणार, तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असणार, तर फ्रेंड लगेच म्हणतात, ती गर्लफ्रेंड आहे का तुझी, आणि चिडवतात…

एखाद्या मुली विषयी वाटणारे आकर्षण हळूहळू पुढे जाते, मग माझे तुझ्यावरती प्रेम आहे, असे बरेच प्रसंग घटना घडतात, कुठेतरी तो आकर्षणाचा प्रवास ब्रेकअप पर्यंत येऊन थांबतो, त्रास होतो , मन तुटल्याचा कोणीतरी धोका दिल्याचा, तरीही त्या प्रेमात व्यक्ती जगलेली असते, ते क्षण व्यक्तीने घालवलेले असतात, त्याच्या आठवणी मात्र कधीही पुसता येणार्‍या नसतात,

आयुष्याचा प्रवासा कोणी सोबत आहे, म्हणून चालत नाही किंवा कोणी सोबतिला नाही, म्हणून थांबतही नाही, परंतु त्या प्रवासासोबतचा आपला आनंद मात्र कमी अधिक असू शकतो, ते व्यक्ती परत्वे सुद्धा ठरते, जेव्हा व्यक्ती जुन्या गोष्टींना मागे सारून पुन्हा नव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस व्यक्तीला भीती असते, आपल्या भूतकाळाची…

आमच्या गुरुवर्य मँम आम्हाला सांगतात ,की एखाद्या गोष्टीच्या खोलात कधीकधी न गेलेलेच बरे असते, कारण माणूस असो वा पुस्तक त्याच्या जितके खोलात जाणार तितकिच त्याची गुपित उलगडत जातात, नवऱ्याने बायकोला जुन्या गर्लफ्रेंड बद्दल काहीतरी सांगणे म्हणून उगाच स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारण्यासारखे असू शकते, परंतु तुम्ही मात्र आपल्या बायको सोबत प्रामाणिक असायला हवे, जे काही होतं त्यापासून तुम्ही धडा घेऊन फार पुढे आलेले असतात ,परंतु बायकोला त्याबद्दल सांगणे म्हणजे तिच्या विश्वासाला तडा जाण्यासारखे आहे ,आणि त्यानंतरची तिची प्रतिक्रिया तिच्या मनात उठलेल्या प्रश्नांचे काहूर तुम्हाला स्वस्त बसू देणारे नसेलच,

तुम्ही तुमच्या सोयीने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार ,परंतु ती तिच्या सोयीने त्याचा अर्थ लावणार, हे लक्षात घ्या, एक तर सांगायचं असेल तर पूर्णपणे सांगावे ,नाहीतर अर्धवट माहिती गैरसमजाला खतपाणी घालते, हे ध्यानात घ्यावे, तुमच्या गर्लफ्रेंड सोबतचा तुमचा प्रवास हा खूप मागे टाकून तुम्ही पुढे आलेले आहात, त्यामुळे तुमच्या पदरात असलेली चांगली नाती ,चांगली माणसं गमवू नका ,जोडायला काही क्षण लागतात,

परंतु निभवायला, संपूर्ण आयुष्य कमी पडते, गर्लफ्रेंड बद्दल सांगताना तिच्यासोबत विचार करून सांगा नाहीतर ते महागात पडू शकते, आणि काही वेळेस असे बघायला मिळते, की पुरुष त्या गोष्टीला लपवण्याचा प्रयत्न करतात ,आणि ते प्रयत्न जितके जास्त होतात ,त्या गोष्टी त्या बाईसमोर उघडपणे समजतात, काही पाठपुरावे असतील, तर त्या माध्यमातून नाही ते अंदाजही लावले जातात ,

आपल्या नात्याची विन घट्ट करायला हवी, आपल्याविषयी पुढे मागे बोलणाऱ्यांनी जरी काहीही भरवले ,तरी नाते प्रत्येक प्रसंगात अगदी ठामपणे उभे असायला हवे, व्यक्ती परत्वे काही गोष्टी ठरतात ,त्याच पद्धतीने नवरा बायको म्हणून एकमेकांचा भूतकाळ ऐकून घेण्याची तयारी किती जणांची असते ,हे पाहणे गरजेचे ठरते ,

एखादी गोष्ट आपल्या बायकोला सांगताना तिला तितक्याच विश्वासाने विश्वासात घ्या ,आणि प्रामाणिकपणे तिच्याही प्रेमाला प्रेम द्या ,तुमच्या विश्वासाचा हात हातात असू द्या, कारण तुमचा भूतकाळ घडून गेलेला आहे, तुमचा वर्तमान काळ तीच आहे, आणि भविष्य तिच्यासोबत सुखकर व्हावं असं वाटत असेल, तर आपल्या भूतकाळाचा आपल्या वर्तमान काळावर परिणाम होईल ,असे वागू नये….


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!