Skip to content

मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!!

मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


असं नेहमी म्हटलं जातं की आपण सर्वसामान्य आयुष्य जगणारी माणसं आहोत. पण यापैकी कित्येकांना सर्वसामान्य आयुष्य नेमकं कसं जगलं जातं याविषयी निश्चिती नसते. पण सर्वसामान्य आयुष्य जगून समाधानी आणि आनंदी राहता येतं, इतकाच तो काय भावार्थ ही सर्व मंडळी जाणून असतात.

मी सुद्धा त्यातलाच…

अडचण, संकट, क्लेशकारक स्थिती, वेदना देणारी बाब हे प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक तीव्रतेने येणारी अनिवार्य गोष्ट आहे. आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पायऱ्या चढाव्याच लागतात. त्याशिवाय पुढे सरकताच येत नाही.

नेहमी मीच का आणि मलाच का? इथूनच समस्येला सुरुवात होते. कारण एकतर ती बाब जिव्हारी लागते किंवा सहन आणि सय्यमाच्या पलीकडची असते. परंतु इतरही अशा बऱ्याच गोष्टी आपल्या ठिकाणी अंगीकृत असतात, याबद्दल इतर आपल्याला दुःखी दिसतात पण त्याच गोष्टीबद्दल आपण मात्र सामान्य असतो.

उदा. प्रियकर फोनवर वेळ देत नाही याबद्दल तुमची मैत्रीण फार त्रास करून घेते, पण तुमच्याबद्दलही अगदी तसंच घडतंय. फक्त फार तुम्ही उद्विग्न न होता, न चिढता सय्यम बाळगून जेव्हा प्रियकराला भेटता तेव्हा नेहमीचा आनंद साजरा करता. पण तो आनंद तुमच्या मैत्रिणीला साजरा करता येत नाही. अगदी उलट स्थिती प्रियकराकडून मनासारखी शॉपिंग झाली नाही तर तुमचा सय्यम मात्र सुटतो (राग व्यक्त करता किंवा २-३ महिने मनात ठेवता) पण तुमची मैत्रीण याबाबत फार समायोजनशील आहे. शॉपिंग नाही झाली तरी तिला काही फरक पडत नाही.

वरील उदाहरणात आपले स्वभाव गुण, व्यक्तिमत्व, जवळच्या व्यक्तिंप्रती अपेक्षा यावरून आपण किती सामान्य वागू हे ठरतं.

हीच प्रक्रिया निरनिराळ्या वस्तू, परिस्थिती आणि व्यक्तींशी कनेक्ट होताना घडत असते. याचा अर्थ अपेक्षा करू नये असा नसून तर अपेक्षांचं ओझं करू नये असा आहे आणि ते ओझं समोरच्यावर सुद्धा लादू नये. कारण आज तुमची समस्या समोरच्याची समस्या केव्हा बनेल हे कळणारही नाही.

आपण चिढतो, रागावतो, वैतागतो म्हणजेच अमुक-अमुक त्या गोष्टींबाबत आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला गरज आहे काही गोष्टी जाणून आणि समजून घेण्याची हे कदाचित मनात येऊनही जातं.

पण प्रत्येकवेळी मीच का समजून घ्यायचं ??? हा ज्वालामुखी सारखा प्रश्न मनात काहूर माजवतो. म्हणून परिस्थिती समजून घेण्याचा दिवा कुठेतरी पेटलेला असतो, तो लगेचच विझतो. एक प्रश्न सुटत नाही की लगेचच दुसरा प्रश्न, मग तिसरा….अशा बऱ्याच प्रश्नांना आपण आपल्या मानगुटीवर बसवतो.

जगातले सर्व ग्रंथ, कादंबऱ्या, साहित्य, लेख हेच शिकवतात की दुसऱ्यांना बदलवण्याच्या भानगडीत पडू नका (मग तो हक्काचा का असू दे). या वाक्यात जर तुम्ही अजूनही असा विचार करत असाल की जग वाईट ते वाईट, स्वार्थी मग आपण नको त्या भानगडीत…..तर अजूनही तुम्ही सामान्य आयुष्य जगण्याच्या फार मागे किंवा पुढे गेलेला आहात.

दुसऱ्यांना बदलवण्याच्या भानगडीत पडू नये, म्हणजेच ज्या डोळ्यांनी तुम्हाला जग दिसतंय, ते अर्थात तसं नाहीये…तुमच्या डोळ्यातल्या-मनातल्या अतार्किक जगाला शांत करा किंवा सामान्य जगा, जे डोळे तुम्हाला चुकीचं काहीतरी दाखवत आहेत…

तुमच्या मनात ज्या गोष्टी भरल्या आहेत-पसरल्या आहेत, अगदी तसंच जग तुम्हाला दिसेल आणि ऐकू सुद्धा येईल आणि पुष्कळ वेळेस तेच सत्य हे आपण स्वीकारलेलं सुद्धा असतं.

माझंच बरोबर किंवा कसं बरोबर यासाठी नियोजित फिलॉसॉफी इम्प्लिमेंट करणं हे तर त्याहूनही अजून दुर्दैव….

सर्व पटतं-कळतं पण तरीही तिकडे लक्ष जातंच, कारण तुम्ही तुमचा वेळ स्वतःला आनंद देण्यासाठी देतच नाही. म्हणून त्या रिकाम्या वेळेत स्वभावानुसार तुम्ही आकर्षिले जाता. छंद, आवडीनिवडी, कलागुण, कौशल्य हे सर्व लहानपणी करण्याच्या गोष्टी असतात. इकडे सुद्धा आपलं अज्ञान शिरतं. मग जगण्याची मानसिक ऊर्जा आपल्याला मिळणार कशी???

करून बघा…..

● स्वतःला प्रत्येक परिस्थितीत सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा.

● जी स्थिती अवक्याबाहेरची आहे तिकडे शांत रहा, कोणताही टोकाकडचा निर्णय घेऊन पच्छाताप करून घेऊ नका. कारण नेमकं अशा वेळी कसं वागायचं याबद्दल तुम्ही अज्ञानी आहात. अशी समजूत काढून मनाला शांत करा.

● दिलदार बना, अपेक्षा जास्त करा. (ओझं होऊ देऊ नका) त्या पूर्ण व्हायलाच हव्यात असा अट्टहास नको.

● अपेक्षांची पूर्ण जबाबदारी स्वतः घ्या. इतरांकडूनच पूर्ण व्हाव्यात अशा भ्रमात स्वतःला ठेऊ नका.

● जवळच्या लोकांना तुमचा वेळ द्या. ज्या व्यक्ती जास्त वेळेची मागणी करतात, भांडतात, वाद घालतात त्यांना तुम्ही किती व्यस्त असता, हे पटवून देऊ नका. परिस्थितीनुसार झालेला बदल त्यांच्या लक्षात येईल. त्या खरच जवळच्या असतील तर समजूनही घेतील.

● छंद जोपासा. जे आवडतं त्यात पूर्ण तल्लीन व्हा.

● निसर्गरम्य ठिकाणी जा. लहान मुलांच्या बालिश कुरापती गार्डनमध्ये जाऊन पहा. त्यात सामील व्हा.

● १-२ वर्षापुढील ध्येय निवडा किंवा इतरांना ध्येय निवडण्यास, तिथपर्यंत पोहोचण्यास सायलेंटली प्रोत्साहित करा. त्याचा आनंद घ्या.

अजून बरंच काही….

आपण कसे वागतो, यावरून समोरचा आपल्याशी कसा वागेल हे ठरत असतं आणि मी इतका चांगला वागूनही समोरचा माझ्याशी चांगला वागला नाही, हे ओझं आपल्याला दुष्ट बनवतं….अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर शांत रहा, सामान्य वागा. जर उद्विग्न वागाल तर अपेक्षा न ठेवताही ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात काही काळात घडणार होत्या, त्यांना तुमच्याकडूच तिलांजली मिळेल, हे लक्षात घ्या.

‘आपलं मानसशास्त्र’ मधील माझ्या सर्व मित्रांनो….तुम्हाला जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अनंत शुभेच्छा…??

सदैव सामान्य, आनंदी आणि समाधानी राहा



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!