Skip to content

आपल्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशीही केल्यास त्याचे परिणाम काय होतील?

आपल्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशीही केल्यास त्याचे परिणाम काय होतील?


सोनाली जे.


अनेक लोकांना , बहुतांश स्त्रियांना तुलना करण्याची कायम सवय असते. अगदी तिने काय कपडे घातले आहे. तिची फिगर कशी, ती दिसते कशी, तिच्या साड्या ,ड्रेस , तिचे रहाणीमान , तिच्याकडे असलेल्या वस्तू हे तर आहेच शिवाय तिचे शिक्षण , नोकरी , पगार , घर , घरातल्या वस्तू हे सगळे कायम स्त्रिया तुलना करत असतात.

तर पुरुष ही अनेकवेळा कळत नकळत तुलना या करत असतातच . जसे बायकोला सांगताना, आईच्या हातचा स्वैपाक, पदार्थ किती छान असतात, ती किती मायेने करते हे सहज नकळत बोलून जातात.

हे तर नेहमीचेच आहे की , जसे मोबाईल, गाडी , घड्याळ , लॅपटॉप , गॅजेट्स थोडे अजून थांबलो असतो तर नवीन लेटेस्ट मॉडेल मिळाले असते ही भावना निर्माण होते. पण पुरुषाच्या मनात ही इतर स्त्रिया बघितल्या की असे वाटते की अजून थोडे थांबले असतो तर चांगली बायको मिळाली असती. शेजार पाजारी , असलेल्या active स्त्रिया , फिगर असलेल्या स्त्रिया आणि सगळ्यात महत्वाचे धडाडीने , उत्साहाने कार्यरत स्त्रिया बघितले की सहज असे वाटते की मला ही अशी उत्साही , active , कार्यरत , प्रेमळ , काळजी घेणारी , क्रिएटिव्ह बायको पाहिजे होती.

याउलट स्त्रिया एखादा कर्तबगार, कर्तृत्ववान पुरुष बघितला , त्याची हुशारी , त्याची personality , नोकरी ,पैसा तर कधी त्याचे बोलणे , त्याचे विचार या सगळ्याची तुलना आपल्या जोडीदारासोबत करत असते. आपल्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशीही केल्यास त्याचे परिणाम काय होतील?

१. नात्यात नकारात्मकता वाढते :

सतत आपल्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशी केल्यास बरेचवेळा नकारात्मकता वाढते. याचे कारण असे की , समोरच्या व्यक्ती मधले चांगले गुण , चांगल्या गोष्टी फक्त दिसत असतात. आणि त्याच बघून आपण आपल्या जोडीदारा मधले दोष काढत असतो. किंवा त्याच्यात असलेल्या कमतरता यांची तुलना करून आपला जोडीदार आणि आपल्यात एक नकारात्मकता निर्माण करत असतो.

खरे कारण काय असते तर बारा महिने चोवीस तास आपण आपल्या जोडीदाराला खूप चांगले ओळखत असतो. त्यामुळे त्याचे गुण दोष या दोन्ही सोबत आपण खूप चांगले परिचित असतो. परंतु समोरच्या व्यक्तीचा तसा सहवास नसतो. तेवढी जवळीक नसते. त्यामुळे त्याच्या स्वभाव , गुण दोष यांचे बारकावे आपल्याला माहिती नसतात. जसे दुरून डोंगर साजरे तसेच काहीसे. त्यामुळे आपल्या जोडीदाराची इतर कोणाशी तुलना करून नात्यातली नकारात्मकता वाढवू नका.

२. आपल्या जोडीदाराचे चांगले गुण दुर्लक्षित केले जातात. हे वादास कारणीभूत ठरते.

इतर कोणाशी तुलना केल्यास आपल्या जोडीदारा मधले चांगले गुण दुर्लक्षित केले जातात. आणि ज्या उणिवा आहेत त्यावर सतत लक्ष दिले जाते. आणि त्याच त्याच विचार किंवा उणिवा यांचेच विचार मनात येत राहतात. जसे obsessive compulsive behavior disorder निर्माण होते आणि त्यातून वाद वाढत जातात. काही वेळेस हे वाद मिटण्या सारखे असतात तर काही वेळेस टोकाची भूमिका गाठणारे. भांडण , मारामारी , घटस्फोट.. काहीही लेव्हल पर्यंत पोहचू शकतात.

३. दुरावा निर्माण होतो , मन तुटते. मन विषण्ण होते , depression :

भारतात अजून तेवढी मानसिक काळजी घेतली जात नाही. किंवा मानसशास्त्राची गरज तेवढ्या प्रकर्षाने जाणवत नाही. पण इतरांच्या सोबत आपल्या जोडीदाराची तुलना करत राहिलो तर मन तुटते च. दोघात दुरावा ही निर्माण होतो . त्यातून नाते सावरता आले नाही तर मन विषण्ण होते. Depression, नैराश्य , उदासीनता या मानसिक आजाराने पछाडले जातात.

४. जोडीदाराचा इगो दुखावला जातो. अपराधी पणाची भावना वाढते :

आपण इतरांच्या सोबत जोडीदाराची तुलना करतो तेव्हा त्याचा / तिचा इगो दुखावला जातो. त्यातून विरक्ती निर्माण होते तर कधी आपल्या उणिवांची जाणीव होवून आयुष्य ही नकोस वाटते. आपण अपयशी आहोत याची जाणीव होवून मन खात राहते. कधी कधी याची जाणीव होते की आपण किती ही प्रयत्न केले तरी ही आपण आपल्या जोडीदाराच्या इच्छेप्रमाणे बनू शकत नाही. आपल्या जोडीदाराला आनंद ,सुख , समाधान देवू शकत नाही. त्यातून आत्महत्या करावी ही वाटते. किंवा मग सतत चिडचिड , अस्वस्थता वाढते.

प्रत्येक व्यक्ती ने कायम हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणीच एका सारखा दुसरा सारखा असू शकत नाही. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हे विभिन्न आहे. सर्व गुण संपन्न असे कोणीही नाही. तसे आपण ही नाही. आपल्यात ही गुण दोष आहेत. प्रत्येक जण unique आहे. बुद्धी ,विचार क्षमता, इंटेलिजन्स , कार्यक्षमता प्रत्येकाची विभिन्न आहे. तसे प्रत्येकाचे यश , अपयश याला ही विविध कारणे आहेत. तर सगळे असून अपयश येणे यात कुठे तरी नशीब हा घटक ही आहे. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. खाली पडणे म्हणजे अपयश नाही. तर पडून राहण्यात अपयश आहे.

आपल्या जोडीदार किंवा इतर कोणाच्या मध्ये ही थोड्या फार प्रमाणात बदल घडवू शकतो पण त्याने / तिने पूर्णपणे बदलावे . आपल्याला जस वाटते तसेच वागावे , राहावे , विचार करावे हे शक्य नाही. ही अवास्तव अपेक्षा आहे. त्यामुळे अपेक्षा ही कुठे तरी मर्यादित ठेवावी. रंग रूप या गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्याचा स्वीकार करावा.

तसेच कर्तुत्व ,यश , अपयश हे आपल्या हातात नाही. प्रयत्न मात्र आहेत. त्यामुळे कोणाला दोष देवू नयेत पण प्रयत्नात साथ देता आली .मग तुमचा मानसिक. Support किंवा physical presence महत्वाचा असेल तसे साथ द्यावी. पण सतत ही त्याच्या अस्तित्वात दखल देवू नये.
जोडीदार आपल्या दृष्टीने जसा महत्वाचा असतो तसे त्याच्या दृष्टीने त्याची इतर नाती, मित्र मैत्रिणी ही त्यांना महत्वाची असतात. त्यामुळे त्यांच्या इतर नात्याविषयी आणि आपणच सगळ्यात जवळचे असे विचार , तुलना , कृती किंवा संभ्रम बाळगू नये. त्याची / तिची स्पेस त्यांना द्यावी.

आपल्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशीही केल्यास त्याचे परिणाम काय होतील? तर मानसिक आणि शारीरिक ही परिणाम होतात. नैराश्य , विषण्ण मनस्थिती , उदासीनता , निद्रानाश , भूक न लागणे , अपचन, डोकेदुखी , किंवा आपण काही केले तरी नावडती चे मीठ अळणी असे वाटून कशात च गोडी ,रस निर्माण होत नाही. त्यातून काहीच करण्याची इच्छा होत नाही. आळस वाढतो. पडून राहावे वाटते. उत्साह वाटत नाही. अति जास्त झोप घेतो व्यक्ती. एकाकी पण वाढते. कोणाच्याच मध्ये मिक्स व्हावे. बोलावे वाटत नाही. Introvert होत जातात व्यक्ती.

आयुष्य सुंदर आहे. एकमेकांच्या मधल्या उणिवा भरून काढण्यास मदत करा. पण त्याचा सतत मारा करून उणिवा च दाखवू नका. तर आयुष्यात balance करण्यासाठी चांगल्या गोष्टी ही वर काढा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!