Skip to content

एकटी / अविवाहित / काडीमोड झालेली महिला तिच्या पुढील आयुष्यात काय-काय करू शकते वाचा.

एकटी / अविवाहित / काडीमोड झालेली महिला तिच्या पुढील आयुष्यात काय-काय करू शकते वाचा.


अपर्णा कुलकर्णी


उर्वी अतिशय उत्साही आणि हसरं खेळत व्यक्तिमत्त्व. तिचा मोठा भाऊ आणि आई बाबा यांची खूप लाडकी आणि सर्वेसर्वा होती ऊर्वी. रोज ऑफिसमधून येताना तिचे बाबा तिच्यासाठी आठवणीने कलाकंद घेऊन येत असत आणि उर्वि दारातच त्यांची वाट बघत बसत असे. बाबा दारात दिसले की त्यांच्या हातातून पटकन मिठाईचा बॉक्स घेऊन धूम पळत असे.

मागून तिची आई ओरडत असे अग ऊर्वि लग्नाला आलीस तू आता, तरीही लहान मुलांसारखी काय वागतेस ?? जरा बुद्धीने मोठी हो. तेंव्हा हसत तिचे बाबा म्हणत अग चित्रा तुझ बोलणं ऐकयला ती समोर थांबली तर पाहिजे ना ?? हो बरोबर आहे तुमचं ?? कशी थांबेल ती ?? तुम्हीच तिला लाडावून ठेवले आहे म्हणून शेफरली आहे ती चित्रा म्हणते.

चित्राच्या हट्टखातर विनायकरावांनी उर्वीचे नाव विवाह मंडळात नोंदवल्यामुळे नेहमीच स्थळे येत जात होते. त्यातील एक स्थळ विनायकराव आणि चित्रा दोघानाही आवडले होते. मुलगा चांगला पी.एस.आय होता. गावाकडे त्याची जमीन घर आणि मुंबईला नोकरी शिवाय एकुलता एक त्यामुळे चित्रा म्हणते अहो हे स्थळ मला उर्वीसाठी योग्य वाटत आहे.

आपली उरवी लाडाकोडात वाढलेली आहे त्यात एखाद्या जॉइंट फॅमिलीमध्ये देण्यापेक्षा इथे देऊन टाकूया. तसंही मुलगा मुंबईत असतो, त्याचे आई वडील येऊन जाऊन करतील त्यामुळे दोघांचे काम करून मोकळी होईल आपली उर्वी. तिचे म्हणणे विनायक रावांना आणि विवेकला पटते. त्याची कल्पनाते उर्वीला देतात तर ती ही तयार होते.

मग काय लगेच दाखवण्याचा कार्यक्रम होतो. उर्वी असतेच देखणी त्यामुळे तिला पसंती मिळते आणि दिनेश पण देखणा असल्याने त्यालाही ऊर्वीकडून होकार येतो. बघताबघता लग्न होते उर्वीचे आणि सगळ्यांना घर खायला उठते. घरातून चैतन्य निघून गेल्यासारखे वाटते सगळ्यांना.

तिला गावी ठेवून दिनेश मुंबईत येतो. काही दिवसांनी तो उर्विला घेऊन जाणार असतो. इकडे उर्विही त्याची वाट पहात असते. कारण तिला दिनेश सोबत मुंबईत राहायचे असते आणि इथे तिची सासू जुन्या विचारांची आणि फारच नियमबद्ध असल्याने त्याचा त्रास उर्विला होत असतो. शिवाय सासरे पाच मिनिट बसू देत नसत.

कधी चहा दे, पणी दे, औषध दे, भाजी आण , जेवायला दे अशी सगळी कामे सतत उर्वीला सांगत होते. अनेक महिने उलटतात पण दिनेश फक्त एकदा ऊर्विला येऊन भेटतो आणि थोड्याच दिवसात घेऊन जाईन म्हणत नेत नाही.

इकडे चित्रा, विनायकराव आणि विवेक सगळेच टेन्शनमध्ये येतात. दरम्यान विवेकचे लग्न होते. पण त्याची बायको वनिता खूपच कुचकट आणि भांडखोर स्वभावाची असल्याने विनायक रावांना दोन्ही मुलांचे खूप टेन्शन येते. अशात वर्ष उलटून जाते पण दिनेश काही उर्विला घेऊन जाण्याबद्दल बोलत नाही. एकदा तो गावी येतो. उर्विल वाटते आतातरी तो घेऊन जाईल, तिला प्रेमाने जवळ घेईल पण तसे काहीच होत नाही. उर्वी रूम मध्ये येते तर दिनेश बाथरूम मध्ये असतो. त्याच्या बॅगेतून काहीतरी बाहेर पडलेले असते. उर्वी ते ठेवून देण्यासाठी टी

बघते तर दिनेश चे एका मुलीसोबत अश्लील फोटो तिला दिसतात. ती रागाने लाल होते आणि तेवढ्यात दिनेश येतो. तिच्या हातातील फोटो बघून तिलाच ओरडतो का हात लावला तू माझ्या बॅग ला. काहीच अक्कल नाही तुला. त्याचं हे बोलणं ऐकून उरवि त्याच्या कानाखाली मारते.

तुला लाज नाही वाटली माझी फसवणूक करायला ?? वर माझी अक्कल काढतोस ?? उर्विचे बोलणे ऐकून दिनेश तिच्यावर हात उचलतो पण मध्येच कोणीतरी तो हात पकडतो, तर ते विनायकराव असतात. उर्वी त्यांना पाहून सगळ सांगायला लागते पण विनायकराव म्हणतात मी सगळं ऐकल आहे बेटा. आता तू इथे थांबण्याची गरज नाही, चल इथून. तिला आलेले पाहून वनिता चे तोंड वाकडे होते पण आई बाबांकडे पाहून उर्वी शांत रहाते.

काही महिने उलटून जातात पण ऊर्वी चे कोमेजलेले मन पूर्ववत होत नाही. विनायक राव ऊर्विचा कायदेशीर रित्या घटस्फोट करून घेतात. विनायकराव तिच्यासाठी रोज कलाकंद आणत असतात पण ऊर्वी एकदाही त्याच्याकडे बघत नाही. चित्रा आणि विनायक रावांना तिची अवस्था बघवत नाही.

एकदा उर्वी विवेक साठी चहा घेऊन रूममध्ये जाते तर वनिता त्याच्याशी खूप भांडत होती. किती दिवस राहणार आहेत तुमच्या बहिना बाई अजून, काय कोडकौतुक चालू आहे तीच जसं काही पराक्रम करून राहायला आली आहे इथे. सासरी जमवून घेता आले नाही आणि आली इकडे तोंड घेऊन. आता काय आयुष्यभर इथेच राहणार का ती ?? विवेक तिला परोपरीने समजाबतो पण काही केल्या ती ऐकून घेत नाही उलट कायमचे माहेरी जाण्याची धमकी देते. उर्वी हे ऐकून सुन्न होते. चहा न देताच पुन्हा आपल्या खोलीत येते आणि शेवटी स्वतःचे मन कठोर करून एक निर्णय घेते.

दुसऱ्या दिवशी चित्रा तिच्या खोलीत येते तर ऊर्वी तिथे नसते पण टेबल वर चीठी असते. चित्रा ती बघते तर ती चिठ्ठी उर्विने लिहलेली असते,

प्रिय,

बाबा, माझे ओझे तुमच्यावर टाकण मला योग्य वाटत नसल्याने माझ्या आयुष्याचा रस्ता शोधायला जात नाही. कोणीही मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. लवकरच स्वतःहून तुमच्याशी संपर्क करेन.

तुमचीच उर्वी.

दोन वर्षानंतर :

विनायकरावांना पेपरमध्ये उर्विचा फोटो दिसतो. आधार आश्रमाची संचालिका आणि अनेक निराधारांची आई मिस उर्वी देशमुख. या हेडिंग सह तिची मुलाखत पेपरमध्ये आलेली असते. त्यावर आश्रमाचे काही नंबर असतात आणि आश्रमाचा पत्ता पण. विनायकराव ते वाचून आनंदाने वेडे होतात आणि विवेक चित्राला पेपर दाखवतात. तातडीने सगळेच आश्रमाच्या पत्त्यावर निघतात.

विनायक राव, चित्रा आणि विवेक आश्रमाच्या पत्त्यावर पोहचतात. आश्रमाचा एरिया खूप मोठा आणि अतिशय शांत असतो. आश्रमात सगळीकडे झाडे लावली असतात, एक भाग कमवा आणि शिका, दुसरा भाग लघुउद्योगचा, तिसरा भाग व्यवसाय प्रशिक्षणचा असे अनेक भाग असतात. असा आश्रम उर्विंने उभा केलेला असतो जिथे महिला काम करून पैसे मिळवू शकत होत्या आणि त्यांच्या मुलांसाठी छान अंगणवाडीची सोय असल्याने त्यांनाही शिकवू शकत होत्या.

विनायकरावांचे डोळे हे सगळं बघून भरून आले होते. त्यांची नजर मात्र उर्विला शोधत होती. विनायक राव फिरत फिरत एका भागा जवळ आले तर तिथे त्यांची लाडकी लेक काही महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होती. तिचे शिकवण्याचे कसब पाहून विनायकराव तिथेच उभे राहिले, चित्राने उर्विला हाक मारली तेंव्हा उर्वीने पाहिले तर समोर तिच्या कुटुंबाला पाहून तिचे डोळे क्षणात भरून आले.

धावत तिच्या लाडक्या बाबांना ती बिलगली. दोघेही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत रडत होते. उर्वी पटकन त्यांना तिच्या केबिनमध्ये घेऊन आली आणि लगेच चहा पाणी दिले. इतकी मोठी झालीस पण तुझ्या फॅमिलीला विसरलीस का ग उर्वी ?? तिच्या बाबांच्या प्रश्नाने उर्वी अस्वस्थ होत म्हणाली असे कसे होईल बाबा. मी स्वतःहून तुमच्याशी संपर्क करणार होते पण आज माझी महत्त्वाची मीटिंग होती ती संपवून यायचं ठरवल होत मी.

तुम्ही सगळे कसे आहात ?? आम्ही मजेत आहोत पण तू सांग तू चिठ्ठी ठेवून कुठे गेलीस ?? कशी राहिलीस आणि हा एवढा मोठा डोलारा कधी उभरलास ?? बाबांनी विचारले. बाबा घरातून बाहेर पडले तेंव्हा डोक्यात काहीच नव्हते. कुठे जायचे कुठे राहायचे कशाचाच विचार नव्हता. सगळा अंधार होता. काही दिवस मिळेल ते काम केले. एका कंपनीत ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. कपनीच्या शेजारी रूम करून राहिले, तिथल्याच बॉसची माझ्यावर वाईट नजर होती. ती जाणवली आणि नोकरी सोडली. पुन्हा रस्त्यावर आले. फिरता फिरता प्रवसात अनेक मुली भेटल्या ज्यांची अवस्था माझ्यासारखीच होती. सासरी राहू शकत नव्हत्या आणि आई बाबाकडे राहता येत नव्हते.

या सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली पण कशी सुरुवात करावी समजेना. त्यात एका मॅडमची पी.ए म्हणून नोकरी मिळाली. त्या खूप चांगल्या होत्या आणि मदत करायला तयार होत्या. त्यांना मी माझी आश्रमाची कल्पना बोलून दाखवली त्यांनी लोनसाठी, जागेसाठी खूप मदत केली. आधी एक एक विभाग सुरू केला आणि आज हा डोलारा उभा राहिला आहे.

खरंच कमाल आहे तुझी बाळा. मला अभिमान वाटतो तुझा. बाबा नेहमीच एकट्या, अविवाहित आणि घटस्फोटित स्त्रीला दुबळे, लाचार समजले जाते. इथल्या सगळ्याच स्त्रिया एकट्या, अविवाहित आणि घटस्फोटित आहेत. आज यातील प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे आणि कायम राहील. एकट्या स्त्रीने तिने ठरवले तर ती बरेच काही करू शकते बाबा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “एकटी / अविवाहित / काडीमोड झालेली महिला तिच्या पुढील आयुष्यात काय-काय करू शकते वाचा.”

  1. अतिशय सुंदर मला खुप खुप आवडला..😊🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!