मुलाच्या संसारात त्याच्या आई-वडिलांनी नाक खुपसू नये, नाहीतर होतील हे परिणाम..
सोनाली जे
बऱ्याच आई वडिलांना सवय असते की मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या संसारात ढवळा ढवळ करायची. नाक खुपसत राहायचे. मुलगी सासरी गेल्यावर तिकडचे लोक कसे , त्यांचे स्वभाव कसे , त्यांच्याशी वागावे कसे हे रोज उठून सांगत असतात. कधी आई – वडील मुलाच्या संसारात नाक खुपसत असतात. विषय काय असतात एक तर सुनेचे वागणे , सुनेने केलेला स्वैपाक किंवा जर करत नसेल तर त्यावरून सतत नातवंडांचे वागणे यावरून तक्रार करत असतात.,
अगदी काही नाही तर सून आणि मुलगा यांच्या एकमेकांच्या सोबत असलेल्या वागणूक यावरून मुलाला काही ना काही समजावत असतात. मुलाच्या संसारात त्याच्या आई – वडिलांनी नाक खुपसू नये, नाहीतर होतील हे परिणाम..
१. स्वैपाक आणि कुरबुर त्याचे परिणाम : आजकाल ज्या सूना आहेत त्यांना विभक्त कुटुंब पद्धती आवडते. त्यांना सासू सासरे ,दिर जाऊ , नणंद , हे कोणी नको असतात. आणि जर सासू सासरे घरी असतील तर सुनेची काही ना काही कुरबुर सुरू राहते. मग स्वैपाक कोणी करायचा यावरून , आवराआवरी असेल किंवा इतर गोष्टी जसे स्वैपाक अंदाज नसणे असेल.
पण या कोणत्याही गोष्टी वरुंन आई वडिलांनी नाक खुपसू नये. कारण मुलाला काही सांगितले की मुलगा आणि सून यांच्या मध्ये सतत वाद होत राहतात. आणि सून म्हणून मोकळी होते की मी एव्हढे करते त्यांच्याकरीता तरी तुम्हाला त्याची कदर नाही.
यात मुलाचा काय प्रोब्लेम होतो की तो बायकोची बाजू घेणार का आई वडिलांची हा प्रश्न पडतो. आणि त्यात बायकोच्या बाजूने बोलले तर बायको पुढे काही चालत नाही म्हणून रिकामे होतात. तर आई वडिलांची बाजू घेतली तर बायको म्हणते बरोबर आहे मी बाहेरची म्हणून मी कायमच ऐकून घ्यायचे. यात मुलाची मानसिकता ढासळते. तो फुटबॉल चा चेंडू असतो तशी अवस्था होते. याचा परिणाम म्हणजे एक तर तो सगळ्या बाजूने गोष्टी ऐकून ही दुर्लक्ष करू लागतो. तर सरळ घरातून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहण्याचा प्रयत्न करतो.
२.वस्तू खरेदी आणि सून नोकरी करणारी असेल तर तिला बाहेर पडत असल्याने वापरायचे ड्रेस भरपूर लागतात. अशावेळी ती काही ना काही खरेदी करत राहते.किंवा काही वस्तू , मेकअप सामान, कधी घरासाठी सतत काही वस्तू घेण्याचे वेडच बायकाना असते. जागा नसेल ठेवण्यासाठी तरी घेतच राहतात. तेव्हा आई वडील जर मुलाला बोलले तर मुलगा बायकोला बोलतो. किंवा मग आई वडिलांना तुम्ही त्यात पडू नका. आणि तरी जर ते त्यात पडत असतील ..सततच त्यांच्यात ढवळाढवळ करत असतील …
३. मुलगा आणि सून यांच्यात जे personal नाते असेल , मग बोलणे , एकमेकांची चौकशी , वागणे , एकमेकांच्या बद्दल आपुलकी , ओढ नसणे , मुलगा आणि सून यांच्यात वाद असणे , शारीरिक संबंध निट नसतील .. बाहेरून घरी उशिरा किंवा कधी ही येणे जाणे असेल. सततची दोघांच्या नात्यातली कुरबुर त्यातून आलेला एकमेक , मुले आणि कुटुंब यांच्यातला दुरावा असेल तर आई वडील जर मध्ये पडत असतील . किंवा दोघांना सतत समजून सांगत असतील .
४. मुलांच्या अभ्यासावरुन जी सततची सून आणि मुलांच्यात होणारी चिडचिड , किंवा मुलगा ही काही बोलत नसेल त्यात किंवा मुलगा ही मुलांना सतत अभ्यासावरुन ओरडत असेल .. त्यातून नातवंडे ही कोणाचे ऐकत नसतात. उलटे बोलणे. काही सांगायला गेल की निघून जाणे . असे घडत असेल. आई वडील सतत सांगत असतात की मुलांना समजून घ्या , तुमच्या बिझी रूटीन मधून त्यांना वेळ द्या , त्यांच्या कलकलाने घ्या . तर मुलगा आणि सून आई वडिलांच्या वर ओरडत असतात तुम्ही मुलांची बाजू घेवू नका. त्यांचे लाड करू नका.
आणि आम्ही जे करतो त्यात मुलांना आम्ही शिस्त च लावण्याचा प्रयत्न करतो .. तुमच्या शिस्तीच्या कल्पना आणि त्या पद्धती जुन्या झाल्या. तुम्ही त्यात पडू नका आमचे आम्ही बघतो . आता इथे एकाच घरात मुलगा सून आई वडील राहत असतील तर विचार केले.
पण मुलगा सून आणि आई वडील वेगळे राहत असतील तर सून कधी बोलावत नाही , विचारत ही नाही. चौकशी करत नसतील आणि बाहेरून इतरांकडून सून किंवा मुलगा यांच्याविषयी काही समजले तर ते मुलाला विचारल्यावर त्याला राग येतो तुम्ही यात नाक खुपसू नका. तुमचे तुम्ही दोघे राहता ना राहा आनंदाने बाकी कोणाबद्दल विचार करू नका. असे मुलगा म्हणतो. मुलाच्या संसारात त्याच्या आई – वडिलांनी नाक खुपसले तर होणारे परिणाम म्हणजे : –
१. मुलगा आई वडिलांच्या पासून कायमचा दुरावतो.
२. काही वेळेस आई वडिलांना आपल्या पासून वेगळे राहण्यास भाग पाडतो किंवा मग कधी वृद्धाआश्रमाचा पर्याय निवडतो.
३.सततच्या आई वडिलांच्या आपल्या संसारात नाक खुपसू नये म्हणून अशी ही काही मुले आहेत जी आई वडिलांच्या इस्टेटी मधून भांडून आपला हक्क मागून घेतात. वेगळे राहतात. आई वडिलांनी इस्टेट दिली नाही त्यात वाटा दिला नाही तर प्रसंगी त्यांचा खून किंवा त्यांना मानसिक त्रास ही देणारे आहेत.
४. अबोल ..काही मुलं अशी असतात की सुरुवातीला आपल्या आई वडिलांना सगळे मोकळेपणाने सांगणारी असतात पण सतत आई वडील. त्यांच्यात नाक खुपसून सततची चौकशी , विचारपूस करत राहून irritate करतात. किंवा आधीच मुलगा त्याचे काम , टेन्शन , स्ट्रेस , त्याच्या responsibilities यात अडकलेला असतो . त्यातून सतत कटकट किंवा मग सारखे काय सांगणार असे प्रश्न पडून मुलं अबोल होतात. बोलणेच टाळतात. भेटणे ही टाळतात.
५. वाद .भांडणे : कोणालाच शांतता लाभणार नाही.. मुलाच्या संसारात त्याच्या आई – वडिलांनी नाक खुपसू नये, नाहीतर सतत वाद , भांडणे , धुसफूस होत राहते. आणि त्यातून कोणालाच शांतता लाभणार नाही.
प्रत्येक आई वडिलांनी हे लक्षात घ्यावे की जरी तुमचा पोटचा गोळा , तुम्ही जन्म दिला असेल मुलाला , त्याचे पालनपोषण केले असेल , शिक्षण , नोकरी याकरिता मदत केली असेल , लग्न ही लावून दिले असेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत त्याच्यावर हक्क गाजवला पाहिजे. त्याचे ही स्वतंत्र आयुष्य ..लाईफ त्याला आहे ..त्याचे आयुष्य तुमच्या मर्जीप्रमाणे नेहमी जगण्यापेक्षा तुम्ही त्याचा विचार करून त्याला ही फ्रीडम दिले पाहिजे.
मुलाचे लग्न झाले की काही दिवस एकत्र राहण्याचा प्रयत्न करून बघावा पण जर काही खटके उडत असतील .किंवा त्यांना स्वातंत्र्य मिळत नसेल तर सगळ्यात उत्तम म्हणजे त्यांचा त्यांचा वेगळा संसार आपणहून थाटून द्यावा किंवा तसे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून , चर्चा करून , मार्ग शोधून काढावे. आणि इतके वर्षात आई वडिलांना ही सतत जबाबदाऱ्या असतात त्यातून मोकेलेपणा मिळून स्वतः करिता जगता येईल. कायमचा कटूपणा घेण्यापेक्षा गोडी मध्ये प्रश्न सोडवावेत. एकमेकांना दुखविण्यापेक्षा कायम थोडे अंतर ठेवून वागावे.
मुलगा आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे व्हावी ही अपेक्षा सोडून द्या. आणि सतत त्याने त्याच्या संसरतल्या गोष्टी आपल्याला सांगाव्या याचा अट्टाहास सोडून द्या. तरच नाती सुंदर राहतील. आणि फुलतील. गरजेला साथ नक्की द्या. पण आई वडील ओझे , जबाबदाऱ्या वाटतील असे वागू नका. कोणीच. मुलाने सुधा हेच लक्षात घेणे गरजेचे.
आई वडिलांचे वय झाले ही गोष्ट लक्षात घेवून काही वेळेस मुलाने , सुनेने ही दुर्लक्ष करणे गरजेचे आणि आई वडील त्यांना आपणहून माहिती दिली तर ते सतत तुमच्या संसारात नाक खुपसत बसणार नाहीत.
लेख आवडला