Skip to content

इमोशनल बायको आणि प्रॅक्टिकल नवरा हे गणित कसं जुळवायचं???

इमोशनल बायको आणि प्रॅक्टिकल नवरा हे गणित कसं जुळवायचं???


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“किती रुक्ष आहेस रे तू! जरासुद्धा ओलावा नाही तुझ्यात!” वीणा मयुरला बडबडत होती. पण त्याचा मयूर वर काहीही परिणाम होत नव्हता. तो अगदी शांत डोक्याने त्याच काम करत होता. हे पाहून तिचा पारा अजून चढत होता. तिचा असा अवतार पाहून त्याने आपलं हातातलं काम बाजूला ठेवलं व तिला समोर बसवत म्हणाला, “अग शांत हो, किती हायपर होत आहेस! इतकं काही झालं नाही.” “हो हो तुझ्या दृष्टीने ही शुल्लकच गोष्ट असणार, तुला कुठे भावना समजतात कोणाच्या?” यावर मयूर जरा हसुन म्हणाला, “वीणा अस का म्हणतेस?

आणि का इतकं वाईट वाटून घेतेस. तुला जरी माझा निर्णय चुकीचा वाटत असला, मी रुक्ष वाटत असलो तरी तु जर प्रॅक्टिकली विचार कर ना! आपण दोघंही काम करतो, घरी कोणीही नसत. दुसऱ्या कोणाला कामावर ठेवण्याची आता आपली परिस्थिती नाही. अश्या वेळी त्याला दुसऱ्या कोणाला तरी देणच योग्य वाटलं मला!”

गोष्ट अशी होती की, वीणाला रस्त्यात एक कुत्र्याच पिल्लू सापडलं होत. तिला पहिल्यापासून प्राण्यांची खूप आवड होती. त्यात हे पिल्लू तर खुपच गोंडस होत. रस्त्यात एकटच

होत म्हणून ती त्याला घेऊन आली. तिला प्राण्यांची आवड होती त्यात हे पिल्लू ती घेऊन आली म्हणून मयूर आधी काय बोलला नाही. पण नंतर नंतर त्या पिल्लाचे हाल होऊ लागले. कारण ही दोघंही बाहेर जायची. दिवसभर त्याला कुठे ठेवायच हा प्रश्न पडायचा. वीणाने कि

तीही म्हटल तरी ती काय दिवसभर त्याला सांभाळू शकत नव्हती. म्हणून मयूरने त्या पिल्लाला देऊन टाकायचा निर्णय घेतला व त्यावरून हा वाद चालला होता. दोन चार दिवसात तिला त्या पिल्लाचा खूप लळा लागला होता. म्हणून त्याला देऊन टाकल्याच तिला वाईट वाटत होत. पण याऊहूनही अधिक मयूर शांत आहे हे पाहून तिला अधिक राग येत होता. विरुध्द स्वभावाची ही दोघं मूर्तिमंत उदाहरण होती. वीणा भावनाशील होती तर मयूर प्रॅक्टिकल.

नवरा बायकोच नात हे असच असत. इथे एक कोणतरी इमोशनल असतो तर दुसरा प्रॅक्टिकल. आणि हीच याची मजा असते. दोघांनीही पूर्णपणे भावनाशील असूनही चालत नाही कारण अस झालं तर भावनांचा खेळ होऊन बसतो, खूप जास्त अपेक्षा, टोकाची संवेदनशीलता येते. याउलट दोघंही प्रॅक्टिकल माईंडेड असली तरी नात्यात ओलवा राहत नाही. ते कोरड होऊन जात. म्हणून नात्यात जर मजा हवी असेल तर, स्पार्क हवा असेल तर हे दोन्ही गुण असेल पाहिजेत.

जर यांचा योग्य त्या ठिकाणी, योग्य प्रमाणात वापर करून घेतला तर. यामध्ये समतोल ठेवला तर. कारण हे दोन्ही अगदी विरुद्ध गुण असल्याने बरेचदा गोंधळ निर्माण होतो. बायकोच वागणं नवऱ्याला पटत नाही आणि नवऱ्याच बायकोला. पण दोन्ही गुणांचे काही फायदे असतात तर काही तोटे. ते जर समजून घेतले तर नात छान होत.

इमोशनल बायको आपलं प्रेम, काळजी उघडपणे दाखवेल. नवऱ्याच्या छोट्या छोट्या कामगिरीने खुश होईल, त्याचा कौतुक करेल. Supportive असेल. आता या सर्व गोष्टी असल्या तरी खूप इमोशनल असण्याचे बरेचदा तोटे होतात. ते कोणते? तर अश्या व्यक्ती बरेचदा भावनाशील होऊन चुकीचे निर्णय घेतात. समोरच्या कडून अपेक्षा जास्त असतात. लगेच upset होतात. जिथे खंबीर राहायची गरज असते तिथे कोलमडतात. निराश होतात.

असच प्रॅक्टिकल लोकांच्या बाबतीत असत. यांचे निर्णय कौशल्य चांगले असते. लगेच आवेगाच्या भरत निर्णय घेत नाहीत. नीट विचार केलेला असतो. कठीण प्रसंगी सावरायची क्षमता असते. आता यांची कमकुवत बाजू अशी असते की हे भावना जास्त व्यक्त करत नाहीत. लगेच कोणत्याही गोष्टीने आनंदी, उत्साही होत नाहीत की यांना भरूनही येत नाही. यांना आपलं प्रेम, माया उघडपणे व्यक्त करायची सवयच नसते. ना त्यांना ते आवडत असत. त्यामुळे अशी लोक रुक्ष वाटतात.

आता अश्या दोन व्यक्ती नवरा बायको म्हणून एकत्र येतात तेव्हा तिथे गोंधळ निर्माण होतो. पण तो सावरता येतो. कसा? तर दोघांनीही त्यांच्यामध्ये थोडे बदल केले तर. बायकोला काय हवं असत? तर आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं, आपण काही सांगत असू ते त्याने आपण ऐकावं. नवरा कितीही प्रॅक्टिकल असला तरी या छोट्या छोट्या गोष्टी तो करूच शकतो. आपली बायको आपल्याला काहीतरी हौसेने सांगत असेल तर तिचं ऐकणं, तिला प्रेमाने जवळ घेणं. जरी ती भावनिक होऊन काहीतरी निर्णय घेत असेल तरी तू जे निर्णय घेत आहेस तो कसा मूर्खपणाचा आहे किंवा अवास्तव आहे अस म्हणण्यापेक्षा तिला शांतपणे समजावणं हे करू शकतो. तिच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होऊ शकतो.

बायकोने देखील नवरा त्यांच्या आयुष्यासाठी निर्णय घेत आहे त्याचा आदर ठेवून त्याला त्यात मदत केली पाहिजे. आवेगाने काहीतरी करून न बसता त्याच्या आधी नीट विचार केला पाहिजे. आपण जे काही वागत आहोत ते खरच योग्य आहे का हे तपासले पाहिजे. नवऱ्याचा स्वभाव माहीत असताना त्याच्याकडून आपण म्हणतो तसच त्याने वागावं ही अपेक्षा ठेवणं हे पण रास्त नाही हे आपल्याला समजलं पाहिजे.

नवरा बायकोच नात हे सुद्धा एखाद्या रोपासारख असत. रोपाला ऊन आणि पाऊस दोन्ही लागतो. फक्त ऊन लागलं तर ते जळून जाईल आणि खूप पाऊस आला तर कुसून जाईल. दोन्ही गोष्टी असल्या तरच ते वाढत. त्याचप्रमाणे नात्यात भावनांचा ओलावा पण पाहिजे आणि विचारीपणाचा, व्यावहारिकतेचा आधार पण पाहिजे तरच ते नात फुलतं आणि बहरत.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽क्लिक करा👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “इमोशनल बायको आणि प्रॅक्टिकल नवरा हे गणित कसं जुळवायचं???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!