Skip to content

मुलीच्या / मुलाच्या वाढदिवसाला काय करायचे??

सोनाली जोशी

आजच fb वर search करीत असताना एका आईला पडलेला हा प्रश्न माझ्या समोर अनेक प्रश्न उभे करून गेला.

साधनपणे प्रत्येक आई आणि वडील याना वाटणारे प्रकार म्हणजे आपल्या मुलांच्या वाढदिवसाला नवीन ड्रेस, खेळणी , भारी 1 ते 2 किलोचा केक , मित्र मैत्रीनीना बोलावणे , नाही तर बाहेर एखाद्या एकदम भारी हॉटेल मध्ये जाऊन जेवण म्हणजे celebrate करणे,

अरेरे , आपणच किती बिघडवितो मुलांना?

खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस म्हणजे एक वर्षाने आपले वय , आपली maturity वाढणे हो ना?? म्हणजेच एक वर्ष आयुष्यातला कमी होणे, पण नकारार्थी न घेता आपण हे सकारात्मक घेत असतो म्हणूनच कदाचित या नकाराची सावली पडू नये म्हणून खूप मोठे celebration केक जाते जा???

आपल्या वाढदिवसाला आपल्या आईनी वडिलांनी आपली आवडती गोष्ट केली , आपल्या समवेत वेळ घालवला तिच्या आठवणी share केल्या , तिची सुख दुःखे share केली, त्यांचे लहानपणीचे किस्से , त्यांनी काही गोष्टी मिळविण्याकरिता केलेले त्याग आणि धडपड , या गोष्टींबरोबर आईच्या हातचे आपल्या आवडीचे फक्कड पदार्थ ।।अहाहा , ?

आई वडिलांच्या बरोबर आशा ठिकाणी जा , जिथे खरच जाणीव होईल की नुसती आई वडिलांची सोबत सुद्धा किती मोठी आणि नशिबाची गोष्ट आहे, आशा मुलांच्याकरिता ते पार्टी चे पैसे खर्च करा की छोट्या ice क्रीम सारख्या खाऊ मध्ये ही पराकोटीचा आनंद आहे , प्रत्येक वेळी वाढदिवसाला आपण घेण्यापेक्षा देण्यातला आनंद शिकवा

प्रत्येक आई वडिलांच्या करीता , आजी आजोबांच्या करिता माझी ही मनापासून request आहे की please आपल्या मुलांना जाणीव होऊ देत , सहजासहजी गोष्टी आपण देतो तसेच इतरांना देण्याची सवय , आनंद मिळू देत, एकवेळ तुम्हाला मोठेपणा नको असेल तर गुपचुप , तुमचे नाव पुढे न येऊ देता त्यांच्या करिता हे करा , खेळणी , कपडे , वस्तू , खाऊ पोहचवा,

आणि दुरून पहा तो निरागस , निस्वार्थी आनंद , तुम्ही एक वर्ष अजून तरुण व्हाल नक्कीच??????

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!