“आत्महत्या- विचार मंथन”
प्राजक्ता कुलकर्णी
१३/०६/१८
असे म्हणतात की मानवी जन्म मिळायला खूप वाट बघावी लागते आणि एकदाच मिळालेला हा जन्म आपण भरभरून जगलो पाहिजे आणि इतर लोकांचे आयुष्य पण भरभरून फुलवले पाहिजे…असो हे झाले Ideal भाषण types वाक्य,जरी कितीही खरे असले तरी तितकेसे सोपे नाही राहिले आता साधे सरळ जगणे.
Social मीडिया,TV (crime पेट्रोल, CID, सावधान इंडिया,न्युज वरचे फालतू रात्री 10 वाजता चे crime reports) ,वाढत जाणारी compitiotion (10वी मध्ये 80% गुण असून पण मुलं आत्महत्या करत आहेत!??)
बदलत चाललेली मानसिकता,दृष्टिकोन ,अपेक्षांचे ओझे, सतत होणारे comparison, आणि असे खूप खूप negative शब्द मी ह्या यादी मध्ये add करू शकते.. मानसिक आजार,विकृती या मुळे मनावर होणारा परिणाम आणि सुटत चाललेला तोल, उथळ विचार हे सगळं खूपच भयंकर आहे, पूर्ण २-३ पिढ्या ह्या जाळ्यात आहेत.. बाहेर काढणारे कोण?
अध्यत्मिक गुरू पण ह्यातून सुटत नाहीत संत म्हणजे ज्याने षड्रिपू वर विजय मिळवलाय, त्यांना कसली आसक्ती नसते पण ते सुद्धा आत्महत्या करण्यास उदयुक्त होतात तेव्हा खरच खडबडून जागे व्हायची वेळ झालीये.
शेतकरी, कर्जबाजारी, विद्यार्थी, सिने कलावंत, गायक, एकतर्फी प्रेमी,हुंडा बळी, पोलीस,मोठे ऑफिसर्स सगळे सगळे ह्या भयानक dipression मधून जातात आणि जिकडे पुढचा रास्ता दिसत नाही त्यांना हे जीवन च संपवणे जास्त सोई चे होते..इतका तिढा होई पर्यंत का वाट बघावी आपले आयुष्य आजूबाजूला जिवंत माणसं आहेत …
मन मोकळं करणं आणि समोरच्याने योग्य पोसिटीव्ह विचार देऊन त्या डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसा ला बाहेर काढणं(बऱ्याच वेळा उलटं होतं कोणा शी बोलून माणूस अधिक च खचू शकतो) आपल्या बोलण्याचा इतरांच्या वर काय परिणाम होईल आपण सांगू शकत नाही, आपण निखळ आनंद आणि positivity पसरवू शकतो इतका जरी केलं तरी आजूबाजूला मानसिक रोग फिरकणारच नाहीत…
आजूबाजूच्या आपल्या निकटवर्तीयां मधील वागण्यातला फरक वेळीच ओळखा त्यांना ह्या अंतिम निर्णया पर्यंत जाऊ देऊ नका, योग्य medical/psychological सल्ला घ्या त्या साठी लाजू नका..
खरंच आयुष्य एकदाच मिळतं आणि ते खूपच सुंदर आहे!!
देवा ने आपला शेवट आधीच लिहून ठेवला आहे, स्वतः आपला शेवट करून आपल्या प्रीय लोकांना या दुःखात लोटू नका??
online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.
खुप सुंदर ,,मात्र अजुन माहित हवी होती
Khupch chan