आपल्या आयुष्याची लंका आपणच जाळतोय.
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक रावण दडलेला आहे, जो सोयीनुसार प्रकट होतो आणि शांतही होतो. जेव्हा हा रावण आपल्याकडून दुर्लक्षित होतो आणि त्याचा व्याप वाढतो, तेव्हा इतरही नम्र व्यक्ती आपल्याला रावणासारखे दिसायला आणि वागायला लागतात. आणि मग इथूनच सुरुवात होते, आयुष्य ढळण्याची!
नेमकं होतं काय…की समोरच्यातला रावण आपल्या रावणाला खुनावतोय, आपल्याला उत्तेजित करतोय, छळतोय, वाभाडे काढतोय….त्यामुळे आपल्यातलाही रावण जागृत होऊन प्रकट होतो आणि मग निर्माण होतो संघर्ष, वाद, भांडणे! मग हे असे कटू अनुभव वारंवार येऊन जीवनच नकोसं वाटतं, त्यापेक्षा मेलेलं आपण पसंत करतो. कारण आपल्यातला रावण आता आपला पिच्छा सोडत नाही. अहंकार इतका वाढतो की समोरच्याला ऐकण्याची-समजून घेण्याची मनःस्थितीच संपते.
ज्या व्यक्ती शांत आहेत, नम्र आहेत त्या आपला रावण कधीही प्रकट होऊ नये याच प्रयत्नात असतात. परंतु आजकाल वातावरण इतकं बिकट झालंय, विद्रुप झालंय की त्याच्यापुढे सय्यमीपणा हरवलाय. म्हणूनच की काय शांत स्वभावाच्या व्यक्ती ही आजकाल अशांत वाटू लागले आहेत.
कारण मना-मनातला रावण हळूहळू रौद्र रूप धारण करतोय.
म्हणून येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्ती निराश असेल, दुःखी असेल, यातना सहन करणारी असेल, डिप्रेशन मध्ये गेलेली असेल, क्रोधीत असेल…आणि अशा प्रत्येक व्यक्तीला समुपदेशनाची गरज भासणार आहे, यात दुमत नाही.
यावर काय उपाय…
मनातला रावण शांत करा. जेव्हा आपल्याला दुसऱ्यांमध्ये रावण दिसेल, याचाच अर्थ तो अगोदर आपल्या मनात वसलाय, वाढलाय म्हणूनच तो आता इतरांमध्येही दिसतोय…हे इतकं सोपं आहे ओळखण्यासाठी!
कारण आपले डोळे तेच पाहतात जे आपलं मन दाखवतं आणि आपले कान सुद्धा तेच ऐकतात जे आपलं मन ऐकवतं.
म्हणून आपण जास्तीत जास्त काय बघण्याकडे आणि ऐकण्याकडे आकर्षित होतोय, हा आपल्यासाठी फार आत्मचिंतन करावा असा विषय आहे.
थोडक्यात दुसरं-तिसरं कोणीही नाही, आपल्या आयुष्याची लंका ही आपण स्वतःच जाळतोय. आणि अहंकाराने समोरच्यावर बोट ठेवतोय.
चला आजच्या दिवशी तरी बाहेरचा नको, पण आतला रावण जाळून टाकूया आणि आयुष्याची लंका हिरवीगार करूया!
दसऱ्याच्या अनंत शुभेच्छा !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.
Khoop chan