Skip to content

एडल्ट वेब सिरीजचा पतीपत्नीच्या नाते संबंधावर खूप गंभीर परिणाम होत आहेत.

एडल्ट वेब सिरीजचा पतीपत्नीच्या नाते संबंधावर खूप गंभीर परिणाम होत आहेत.


टीम आपलं मानसशास्त्र


वेब सिरीज म्हणजे काय? टीव्ही वर प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी सर्वाधिक पहिला जाणारा कार्यक्रम म्हणजे मालिका (Serials). याच प्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म अथवा इंटरनेटवर प्रसारित केल्या गेलेल्या मालिका म्हणजे वेब सिरीज. टीव्ही वर येणाऱ्या मालिकांचे सहसा एकच पर्व असते, याउलट वेब सिरीजचे अनेक पर्व प्रसारित केले जातात. जसे टीव्ही चॅनेल बघण्यासाठी महिन्याला काही शुल्क आकारले जाते, तसेच वेब सिरीज बघण्यासाठी महिना/वर्ष प्रमाणे काही शुल्क द्यावे लागते.

तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता, अनेक नवनवीन गोष्टी ज्ञानात भर पडतात. त्यातच काही नवीन शब्द वारंवार ऐकायला येतात. यापैकी एक नवीन संकल्पना म्हणजे वेब सिरीज. मोबाईल अप्लिकेशन, इंटरनेट, वेबसाईट यांच्या मदतीने वेब सिरीजचा आनंद लुटता येतो. वेब म्हणजे इंटरनेटचे जाळे आणि सिरीज म्हणजे मालिका. Web Series टीव्ही वर प्रसारित केल्या जात नाहीत, ओटीटी, अँप, वेबसाईट अशा मंचावर प्रसारण केले जाते. अर्थातच Web series पाहण्यासाठी काही पैसे मोजावे लागतात.

अमेझॉन प्राईम , Netflix, hotstar , रोकु, एम एक्स प्लेअर , you tube, ऑल्ट बालाजी हे मंच वेब series करिता प्रसिद्ध आहेत.को रोना काळात थिएटर , मल्टिप्लेक्स पासून entertainment चे सगळे प्लॅटफॉर्म बंद होते त्या काळात हे सगळे OTT मंच ने लोकांना खूप आधार दिले.एडल्ट वेब सिरीजचा पतीपत्नीच्या नाते संबंधावर खूप गंभीर परिणाम होत आहेत. तर नक्कीच हो.

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटे ही असतात. वेब सीरिज मधून बऱ्याच चांगल्या, informative गोष्टी , movies , serials बघण्याची संधी मिळाली.तसेच adult web series बघण्यकरिता OTT हा एक प्लॅटफॉर्म मिळाला. जसे गंधी बात ही आल्ट बालाजी वर दाखविण्यात येत होती. ज्यात प्रत्येक episode मध्ये भरपूर हॉट सीन दाखवण्यात येत होते.

एक्स एक्स एक्स ही पण आल्ट बालाजी वर दाखविण्यात येत होती. ज्यात अगदी मोकळेपणाने सगळे हॉट सीन दाखवण्यात येत होते. लव, लस्ट, रोमांस .बरेच न्यूड सीन ही दाखविण्यात आले. बोल्ड सीन ही. तशीच माया ही वेब सीरिज. जी हॉट आणि बोल्ड सीन घेवून आली .

या एडल्ट वेब सिरीज असोत किंवा हॉट आणि बोल्ड सीरिअल्स यातले कोणतेच सीन कधी सेन्सॉर कडून कट होण्याचा प्रश्न च येत नाही.या  सगळ्या OTT मंचावरून प्रसारित होणारी ही एडल्ट वेब सिरीज अगदी. सेक्स सीन ही खुल्लं खुलला सगळे प्रदार्शित करत असतात.

एडल्ट वेब सिरीजचा पतीपत्नीच्या नाते संबंधावर खूप गंभीर परिणाम होत आहेत.कारण बरेचवेळा पुरुष हे असे web series बोल्ड आणि अगदी सगळेच मोकळेपणाने दाखविले गेलेले हॉट सीन बघून त्यांची मानसिकता अशी होते की आपल्या बायको ने ही असे करावे. आणि ती अपेक्षा तिच्याकडून पूर्ण झाली नाही. ती कुठे कमी पडली तर बरेचवेळा निराशा येते. तर पती पत्नी यातले खरे जे शारीरिक संबंध आहेत त्यात बाधा येते कारण काय तर ते तसे हॉट सीन बघून पुरुष लगेच उत्तेजीत होतात आणि मग बायको सोबत संबंध येण्याआधी च masturbation , अगदी स्वच्छ सांगायचे तर कंट्रोल ही नाही केले जात . हस्तमैथुन म्हणले तरी चालेल. बरेचवेळा बायका ही जर या गोष्टी आवडीने बघत असतील तर त्यांच्यात ही हे प्रमाण वाढते आहे.
आणि यातून नवरा बायको मधले जे शारीरिक संबंध आणि त्यातून मिळणारे मानसिक समाधान हे मात्र दुरावत चालले आहे.

शिवाय हे असे web series मधून विविध प्रकार दाखविले तर ते तसेच आपल्या जोडीदाराने करावे ही अपेक्षा ठेवली जाते. आणि ती पूर्ण केली नाही तर त्यातून वाद ही होतात. तर कधी काहीच न बोलता अपेक्षा पूर्ण न झाल्याने चिडचिड होते. निराशा येते. आणि मनाप्रमाणे घडत नसल्याने आता या गोष्टी नकोच आपले आपण बघून सुख घेवू असेही विचार होतात.

तर बरेचवेळा इच्छा नसताना ही एखाद्या जोडीदाराला हे करावेच लागते. त्यातून अशांतता तर असतेच पण त्यात पाहिजे तशी involvement ही होवू शकत नाही त्यामुळे संबंध चांगले प्रस्थापित होत नाहीत. मग दुसऱ्याची ही इच्छा उडते किंवा ते अर्धवट समाधान मिळाले की अजून मिळावे ही अपेक्षा वाढत जावून ते मिळत नाही तोपर्यंत अस्वस्थता निर्माण होते. कशात मन गुंतत नाही. ऑफिस काम असेल किंवा घरचे काहीच धड होत नाही . कशात लक्ष लागत नाही. आणि एक तर कमी काळात परत परत शारीरिक संबंध ठेवावेत ही इच्छा अस्वस्थ करते. किंवा नकोच हे म्हणून अंतर येते.

सतत असे होत राहिले तर एकमेकांना एकमेकांच्या विषयी मनात अढी निर्माण होते. त्यातून दुरावा येतो. अगदी काही पती आपल्या पत्नी ला या वेब series मधल्या सारखे करायला लावतात.किंवा करतात . मग कधी इच्छेविरुद्ध ही करतात. तर काही अघोरी प्रकार ही ज्यातून आनंद मिळण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक त्रासच होतात.

आणि बायको किंवा नवरा साथ देत नसेल तर एकटेच बसून , एकांतात बसुन ते या वेब series चे मनसोक्त आस्वाद घेतात. त्यातून नवरा बायको हे एकत्र राहत असून ही अंतर निर्माण होते.

तर बायको तयार नसेल आणि मोकळेपणाने बोलणाऱ्या मैत्रिणी , मित्र असतील , जे या वेब series ही मोकळेपणाने बघू शकतात अशा मित्र मैत्रिणींच्या सोबत हे पती किंवा पत्नी बाहेर कुठे ही जावून किंवा अगदी ऑफिस मध्ये मोकळा वेळ असेल , गाडी कुठेही बसून बघू शकतात आणि थोडे फार जवळीक असेल तर मग शारीरिक आकर्षण असेल तर कुठेही physically जवळ येवू शकतात. काही गोष्टी त्यात बाहेर गाडीत करता येतील अशा ही करतात. किंवा मग काही सोय बाहेर करतात.

पण या एडल्ट वेब सिरीज मधून बरेचवेळा केवळ आपल्याला काय पाहिजे , आणि आपला आनंद कसा मिळवायचा याचाचविचार आणि कृती केली जाते. त्यातून जोडीदाराला काय अपेक्षा आहेत याचा विचार केला जात नाही त्यामुळे कुठे तरी जोडीदाराचे असमाधान , असंतुष्ट राहणे वाढते.

बरेचवेळा नात्यात येणारी निराशा यामुळे अस्वस्थता वाढते , भविष्यात नाते राहील का टिकेल का याची चिंता ही वाढते. झोप न लागणे म्हणजे निद्रा नाश मग निराश झाल्यामुळे असेल किंवा वेब series बघून सततची excitement वाढत गेल्याने असेल.

आणि खरे तर हे web series drugs सारखेच काम करते. एकदा व्यसन लागले की वाढतच जाते. मग त्या पूर्ण करण्याकरिता जे काही मार्ग असतील ते स्वीकारले जातात. प्रसंगी जोडीदाराच्या इच्छे विरूद्ध , किंवा जरी जोडीदाराने शब्द आणि कृती मधून विरोध दाखविला नाही तरी involvement नसते, तर काही वेळेस अपेक्षा असते त्याप्रमाणे घडले नाही तर. किंवा मग दुसरे कोणी जवळचे असतील तरी ही कामेच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या सोबत जवळीक करणे. अगदी प्रांगी नवरा बायको यांचे घटस्फोट ही होतात. किंवा एका घरात राहून काहीच बोलणे किंवा जवळीक नाही असेही होते. किंवा अगदी त्यात बघून आपापले केले समाधान मिळविले असेही होते.

खरे तर निसर्ग नियमांना सोडून या डिजिटल गोष्टी मधून तेच खरे असे प्रमाण मानून आपण आपल्या आणि जोडीदाराच्या ही आयुष्याचे नुकसान करून घेत आहोत. जरी यात अनेक गोष्टी सहज आणि बोल्ड दाखविल्या असतील तरी ते एका वेळी शूट केले नसते. आणि आपण एकावेळी असे घडते हे गृहीत धरून तसे चुकीचे काही तरी डोक्यात घेवून करण्याचा प्रयत्न करतो. मग काही वेळेस जबरदस्तीने प्रयत्न करताना. शारीरिक आणि मानसिक त्रास ही होतात.

या शिवाय घरात वडीलधारी मंडळी , मुले आहेत त्यांचे विचार स्त्री नेहमीच करते त्यामुळे तिला मर्यादा संभालाव्याच लागतात. आणि थोडी भीती ही वाटते तिला की घरात सगळे असताना कसे करणार. पण पुरुष या गोष्टी समजून घेत नाहीत. आणि या वेब series प्रमाणे घडावे , आपल्याला ही बायको ने वेळ द्यावा , आपण बघतो तसे आपल्याला आवडते तसे करावे. अशी अपेक्षा करतो. जे स्त्री बघू ही शकत नाही कारण इतर गोष्टी मध्ये गुंतवणूक आणि वेळ ही देवू शकत नाही. तर मुले झाल्यानंतर शरीर रचनेत झालेला बदल यामुळे ही मर्यादा येतात.

या वेब series कधी तरी बघून नक्की काय समजून घेतले तरी ठीक . आणि नवीन असताना जर आपल्या जोडीदाराला काहीच माहिती नसेल तर थोडी माहिती होईल पण तेव्हाही ज्या गोष्टी सहज समजाव्या तेवढ्या करिता याचा माध्यम म्हणून वापर करावा नक्की पण त्याच्या आहारी जावू नये. आणि काही तरी विपरीत करू नये.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!