Skip to content

व्यक्त न होणं, ही आपली एक भयंकर मोठी समस्या!!!

व्यक्त न होणं, ही आपली एक भयंकर मोठी समस्या!!!


मनातलं व्यक्त होताना !

वाटतं नं कधीकधी ,

मनात जे खोलवर रुजलं आहे ते स्वच्छन्दपणे कोणाजवळ तरी व्यक्त व्हावं,
नाहीतर मनातलं सगळं लेखणीच्या रुपात कागदावर भराभर उतरवावं,
खूपदा वाटत असेल भडाभडा सांगून टाकावं सगळं ,

बोलून मोकळं व्हावं एकदाचं,

पण सतत मनाला वाटतं , अशी कोणी हक्काची व्यक्ती नसते,
आपलं मन ऐकून घेईल तेही सल्ले नं देता,

निश्चिंतपणे बोलावं ,

नि तिने ऐकून घ्यावं,

असं आपलं कोणीच नसतं आजूबाजूला,
अशी हक्काची जागा नसते,
म्हणायला sharing भरपूर,
Social media चं म्हणालं तर त्यात तर आपण सगळेच भरभरून व्यक्त होताना दिसतो,

पण social media वर व्यक्त होताना जरा जपूनच बरं का,
कारण त्यात फक्त दिसते ती profile आणि chatting मधले शब्द,

समोरच्या च्या मनात काय चाललंय हे कोणालाच कळत नाही,
पण मग मनाला अनेकदा असं का वाटतं की,
मनापासून अगदी मनातलं share करावं,
इतपत असं कुणीच नाही आपलं,
कोणाजवळ व्यक्त व्हावं तर एक भीती मनात ,

गंमत उडवतील का ?

अगदी जुन्या विचारातील म्हणतील का ?

अरे ! हा नं ,खूप boar करतोय ,असं म्हणतील का ?

कोणाजवळ व्यक्त होताना ची हि भीती अधिकच संभ्रमात टाकते,
त्यामुळे आपण काय करतो,

आपलं सगळं मजेत चाललं आहे ,
मस्त happining आहे सारं,
एकदम 3 idiots मधल्या रँचो सारखं “all is well” .

नेहमीच असं साऱ्यांसमोर स्वतःला happning ठेवतो ,

स्वतःला आनंदी ,उत्साही,चिअरफुल,तेच ते चिर्पि असतो एकदम कुल !
असंच भासवतो नं आपण जगाला,
पण खरंच सारं तसं असतं, नाही नं ,ते मुळीच तसं नसतं ,ज

छळतं ,सलतं ,टोचत , आतल्या आत ते खरंच असतं तरी काय ?

ते कुणाशी बोलायचं ?
कसं सांगायचं ?

कुणी आपल्याला जज तर नाही करणार त्यावरून ?

हे सारे प्रश्न , या भावना हि सारी कालवा कालव प्रत्येकाच्या मनात होत असते,

तुम्हालाही बोलायचं असेल मनातलं सारं काही ,
व्यक्त व्हायचं असेल तर
आपलं शोधा आपलं हक्काचं माणूस,
कदाचित समोरच्याच्या मनातही हीच प्रश्नांची घालमेल होत असेल तर ……..?

आणि हक्काची माणसं असूनही दिसत नसतील तर वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.

कारण निराशेच्या गर्तेत खोलवर जाऊन मानसिक समस्या आणि पुढे आजार यांना निमंत्रण देऊ नका.

आता तुम्ही जितके ok वाटत आहात, अशीच स्थिती तुमच्यासोबत कायम राहिल्यास तुम्ही अजून भरकटत जाल.



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!