Skip to content

अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे, याचा पुढे मनावर काही धोका होवू शकतो का?

अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे, याचा पुढे मनावर काही धोका होवू शकतो का?


सोनाली जे.


पूर्वीपासून दोन भिन्न लिंगी व्यक्तीनी एकत्र येण्या करिता आणि पुढच्या पिढीची निर्मिती , वंश वृध्दी या मुख्य हेतूने विवाह संस्था ही निर्माण करण्यात आली. पूर्वी आई वडील , घरातले मोठे जिथे ठरवतील तिथे लग्न करावे लागत असे. मग मुलगा असो अथवा मुलगी दोघांना ही मोठ्यांच्या मतानुसार निर्णय घ्यावा लागे. हळूहळू मात्र मुले आणि मुली ही शिक्षण घेवू लागले. त्याकरिता बाहेर जाणे ही गरजेचे होवू लागले. मग नोकरी जिथे मिळेल तिथे जाणे भाग पडे. आजकाल मुलीही मुलांच्या पेक्षा जास्त शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगली नोकरी ही मिळत आहे. बरेचवेळा मुलींना मिळणारा पगार ही चांगला असतो. त्यातून मुलींच्या अपेक्षा ही वाढत जातात. त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला किंवा कमीत कमी त्यांच्या एव्हढा शिकलेला मुलगा पाहिजे असतो. शिवाय पगारही जास्त पाहिजे. घर पाहिजे , घरात वस्तू सगळ्या , स्वातंत्र्य ही पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती नको असते. अशा अनेक अटी मुलींच्या ही वाढत आहेत.

उच्च शिक्षित मुलांना ही त्यांच्या बरोबरीचे स्थळ पाहिजे असते. एक तर शिक्षण झाले की उच्च शिक्षण मग नोकरी किंवा स्वतः चा उद्योग करून , पैसा साठवून , घर घेवून किंवा ठरविलेल्या ambition पुर्ण करून स्थिरस्थावर झाल्यावर या मुला मुलींना लग्न करायचे असते. पण तोपर्यंत वयाची तिशी आलेली किंवा ओलांडलेली असते. अशावेळी वय वाढल्यावर त्यांच्या वयाची किंवा एक दोन वर्ष पुढे मागे अंतर असलेली स्थळे मिळणे अवघडच असते. कारण आजकाल नवीन पिढीला वयात जास्त अंतर ही नको असते. कारण मग त्यांच्या विचारात , राहणीमानात , आवडी निवडी मध्ये ही तेवढ्या अंतराचा gap पडतो. तो ही नको असतो. त्यामुळे वय वाढेल तसे लग्न होणे आजकाल अवघडच झाले आहे. कारण प्रत्येक अपेक्षे मध्ये मग मुलाची असो किंवा मुलीची असे योग्य स्थळ मिळणे अवघडच झाले आहे. त्याचमुळे अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. या व्यतिरिक्त अजून काय कारणे असतील.

१.मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा आणि अटी…मुलाची अपेक्षा असते एवढी वर्ष घराबाहेर असल्याने घरचे सात्विक जेवण मिळावे. पण मुली असतात की आम्ही पण नोकरी करतो . आम्ही पण दमतो मग आम्हीच का स्वैपाक करायचा.त्यामुळे ही अनेक मुले आणि मुली अविवाहित राहतात.

२. जबाबदाऱ्या नको असतात. किंवा कोणाचे वर्चस्व नको.असते. एकत्र कुटुंब नको त्यामुळे कोणाच्या जबाबदाऱ्या किंवा कोणाचे वर्चस्व नको असते. सासू सासरे .नणंद , दिर यांचा अडथळा वाटतो.त्यामुळे लग्नानंतर फक्त दोघेच राहणार अशी ही अट असते. बरेचवेळा मुलांना किंवा त्याच्या घरच्यांना ही अट मान्य नसते. त्यामुळे ते दोघेही दुसरे स्थळ मिळेल म्हणून हे सोडून देतात. अशात अनेक स्थळे हातातून जातात आणि परत प्रयत्न करायला गेले तर त्यांची ठरलेली असतात किंवा एकदा नकार दिला ना मग आता नकोच अशी मनोवृत्ती असते.

३. लग्न झाल्यावर ही करियर ला प्राधान्य देणार असे बऱ्याच मुलींचे मत असते. त्यामुळे त्यांना मुलं होवू देणे , chance घेणे ही मंजूर नसते. आणि जर होवू दिली तरी त्याची जबाबदारी दोघांनी ही घ्यायची आणि ती मात्र प्रसंगी महत्वाचे काम असेल तर मुलांची जबाबदारी तेव्हा ही नवऱ्याने घ्यवी असे मत. जे मुलांना ही काही प्रमाणात पटते .पण त्यांना त्यांचेही करियर असते. त्यामुळे एक तर मुले होवू न देणे किंवा मग लग्नच नको म्हणून अविवाहित राहतात. अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे, याचा पुढे मनावर काही धोका होवू शकतो का? तर नक्कीच .

१. एकटेपणा : — उणीव .. आपले कोणी तरी पाहिजे असे वाटते. आविवाहित राहण्यात सुरुवातीला छान वाटते. मोकळेपणा , स्वातंत्र्य , आपल्याला पाहिजे तसे वागावे हे काही काळ ठीक वाटते. आवडते. पण नंतर एकटेपणा वाटतो .त्यात आई वडिलांचे निधन झाल्यावर तर अगदीच एकटेपणा येतो. कारण समजून घेणारे. साथ देणारे. काही अडले तर मदत करणारे..आपली काळजी घेणारे असे कोणीच नसते. अशावेळी तो एकटेपणा खायला उठतो. जोडीदाराची उणीव भासू लागते. आणि आपले कोणी तरी पाहिजे अशी मानसिकता निर्माण होते.

२.. भीती ही निर्माण होते. : एक तर एकटे आहोत आपल्याला काही झाले तर .. आणि आयुष्यात काही गोष्टी करायच्या राहिल्या आहेत आणि आता त्या कधीच पूर्ण करता येणार नाहीत. याची भीतीही निर्माण होते.

३. अस्वस्थ होणे , बेचैन होणे : एकाग्रता न होणे. काम न होणे. अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला असेल किंवा लग्न जमले नसेल तरी मुले असोत अथवा मुली शरीर हे मात्र त्याच्या गरजा सांगत असते. मग त्यातून दुधाची तहान ताकावर भागवायची असे होते. हस्तमैथुन करणे त्यात ही भीती .शरीरावर काही परिणाम होईल का याची .. आणि दुसरे guilt. आणि जर नाही केले तर मन सतत अस्वस्थ , बेचैन राहते. जोपर्यंत हस्त मैथुन करत नाही तोपर्यंत कामात ही एकाग्रता होत नाही. काम ही होत नाही. आणि जरी हस्त मैथुन केले तरी नैसर्गिक शारीरिक संबंधाची ओढ राहते. आणि ती अस्वस्थ करत राहते कायम.

४. निराशा येते : सुरुवातीला अविवाहित राहणे यात त्रास , दुःख काही होत नसते. पण नंतर मात्र सतत एकटे असतो ..तेच तेच लाईफ. आयुष्यात नवीन घटना काहीच घडत नसतात त्यामुळे त्याचं कंटाळवाण्या रूटीन मधून निराशा निर्माण होते.

५. पोकळी निर्माण होते : – जेव्हा बरोबरीचे मित्र मैत्रिणी त्यांच्या जोडीदारासोबत लाईफ एन्जॉय करत असतात. एकमेकांच्या सोबत सुखात दुःखात असतात. अनेक आनंद celebrate ही करतात हे बघून . किंवा त्यांचे एकमेकांना मदत करणे बघून . त्यांच्यात निर्माण झालेले bounding बघून .जे अविवाहित तरुण तरुणी आहेत त्यांच्यात पोकळी निर्माण होते. आपले हक्काचे कोणीतरी पाहिजे असे सारखे वाटू लागते.

६. मनस्वास्थ्य बिघडते : अविवाहित तरुण तरुणी यांना समाज , नातेवाईक ,आपल्या घरातले , जवळचे असे लोक ही त्यांच्या लग्नवरून टोमणे मारतात. एक तर लगेच विचार येतो की कुठे जमवून घेत नसणार.म्हणून लग्न ठरत नाही. दुसरा विचार म्हणजे इतरांचे सतत आपल्यावर चे टोमणे .. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन यातून आपण काही अपराधी आहोत का ? का आपण कोणती मोठी चूक केली आहे ? या प्रश्नातून मनःस्वास्थ्य बिघडत जाते.

७. बिनधास्त मनोवृत्ती : तर याउलट काही तरुण तरुणीची लग्न होत नाहीत .तेव्हा त्यांची बिनधास्त मनोवृत्ती असते..आपण सगळ्यातून स्वतंत्र आहोत , मुक्त आहोत . आपल्याला पाहिजे ते .आणि पाहिजे तेव्हा करता येते ही बिनधास्त मनोवृत्ती वाढीस लागते. आपले पैसे , पगार मिळतो .भरपूर फिरून घ्या. देश परदेश फिरून घेण्याची वृत्ती निर्माण होते. कोणासाठी काय ठेवायचे म्हणून मिळणाऱ्या पैशातून सुख सोयी , movie बघून , शॉपिंग करून , भरपूर आनंद मिळवितात. कोणाच्या भावना याशी काही देणे घेणे नसते. कोणाचे नियंत्रण नको असते. स्वतंत्र राहणे , विचार , वर्तन याचा पगडा राहतो मनावर.

८. अपराधी ,guilt वाटणे : बरेचदा अविवाहित राहावे लागते कारण वेळेत लग्न जमत नाही. त्याचे कारण आपण च असतो ..आपण ठेवलेल्या अपेक्षा , आवडी निवडी , अटी यामुळे आपले लग्न होत नाही. पण पुढे जावून अपराधी पणाची भावना , guilt निर्माण होतो मनात कारण आपण तेव्हा हो म्हणले असते बरे आले असते. किती छोटी , किरकोळ गोष्ट होती . थोडेसे तर adjust करायचं होते. म्हणजे आज आपण आपल्या पार्टनर सोबत असतो . पण दुर्दैवाने ते शक्य नाही. हा guilt मनात राहतो.

९. जीवनात रस उरत नाही. सगळ्या गोष्टी स्वतः करण्याचा जसे कमाई , खर्च आणि इतर management , स्वैपाक . सतत या गोष्टी करून कंटाळा येतो. काही झाले तरी स्वतः करतच रहायचं पर्याय नसतो. पैसा नसेल तर तो कमावण्यासाठी धडपड सुरू असते. कारण यांची आयुष्यभरसाठी जबाबदारी कोण घेणार ? स्वतः धडपड करणे गरजेचे असते . तर पैसा भरपूर असतो त्यांना साथ कोणाची नसते. मित्र मैत्रिणी , नातेवाईक हे सगळे तात्पुरते मजा करण्यापूर्ते असतात. आणि रोज काय त्यांच्या सोबत enjoyment करणे ही शक्य नसते कारण त्यांचे त्यांना व्याप असतात. नंतर परत एकटे उदास वाटते.

१०. काही वेळेस एकटेपणाचा कंटाळा येवून आत्महत्या करण्याची मानसिकता राहत नाही. काही वेळेस अविवाहित तरुण तरुणीच्या अडचणी , मानसिकता, त्यांचे प्रोब्लेम , त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नसते, साथ देणारे कोणी नसते, समजून घेणारी आणि समजून सांगणारे कोणी नसते. खरेच कोणाला काही देणे घेणे नसते. अशा वेळी त्यांची दुःख , प्रॉब्लेम्स सोडविता न आल्याने आत्महत्या करणारे ही आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर सुशांत सिंग राजपूत एक चांगला ॲक्टर , पैसा , प्रसिध्दी , श्रीमंती सगळे असून ही लग्न नव्हते झाले . आधीचे प्रेमप्रकरण ते success होवू शकले नाही. त्याने अगदी लहान वयात आत्महत्या केली.

११. स्वैराचार वाढीस लागतो. : लग्न , जबाबदाऱ्या , मोठ्यांचा धाक असे काही राहत नाही . त्यामुळे केवळ शारीरिक गरजा भागविण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. तर अविवाहित तरुण तरुणी यांच्यावर कोणते कायद्याचे किंवा ते घालून ही घेत नाहीत आणि कोण काय म्हणेल याशी त्यांना काही देणे घेणे नसते. बंधन नसते त्यातून ते शारीरिक गरज भागविण्यासाठी कधी एक तर कधी वेगवेगळ्या पार्टनर सोबत शारीरिक संबंध ठेवतात. तर कोणी relationship मध्ये ही असतात. मग मुले होवू न देण्याची मानसिकता असते. त्याकरिता ची साधने वापरण्याची मानसिकता. अगदी तरुण मुले मग पोर्न व्हिडिओज , वैश्या गमन ही करतात. मग आजकाल male असो female असो prostitute .. म्हणजे मुली ही असे पुरुष शोधून त्यांच्या बरोबर ते अनुभव घेतात. रात गयी बात गयी असा attitude ही असतो. थोडक्यात स्वैराचार ही मानसिकता वाढत चालली आहे.

१२. व्यसनाधीन : एकटेपणा दूर करण्यासाठी मग दारू , नशा करणे यासारख्या गोष्टींकडे कल वाढत आहे. कोणी तरी सांगते खूप छान , हलके वाटते , सगळे विसरून हवेत जातो आपण असे त्यांचे अनुभव सांगतात म्हणून ते अनुभव घेण्याची मानसिकता वाढीस लागते. अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे, याचा पुढे मनावर काही धोका होवू शकतो का? हो त्या अविवाहित तरुण तरुणीच्या मनावरचे धोके तर सांगितलेच. डिप्रेशन , frustration , anxiety त्यातून पुढे obsessive compulsive behaviour, behaviour problems हे psychological problems येवू शकतात. पण यातून पुढची लहान पिढी जी या गोष्टी सहज बघत असते त्यांच्या मनावर ही परिणाम होतो. शिवाय जी आधीची पिढी आहे ज्यांना अनेक गोष्टी पासून वंचित राहावे लागले, कर्तव्य , जबाबदाऱ्या यात अडकून पडायला होते. त्यांनाही हे असे अविवाहित तरुण तरुणीच्या अनेक गोष्टी बघून स्वातंत्र्य मिळावे वाटते. तेही आता सगळे झाले आहे तर थोडे आपणही काही गोष्टी राहिल्या त्या करून बघाव्या असे वाटते. लहान मुले , कॉलेज मधली मुले यांच्या मनावर ही या अविवाहित तरुण तरुणींच्या वागण्याचा परिणाम होतो. त्यातून तेही चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. आणि हेच असेच वागायचे असते ही मानसिकता ..मनाचे धोके निर्माण होतात.

अविवाहित तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे, जे खरेच मानसिकदृष्ट्या मनावर परिणाम करणारे आहे. त्या व्यक्ती , समाज आणि नवीन पिढी या सगळ्यांना च धोकादायक आहे. तर जे अविवाहित राहून स्वतः वर सगळ्या गोष्टींचे नियंत्रण ठेवणारे. कुठेही आपला balance घालवू न देणारे , साधे , सरळ लोक आहेत त्यांच्या मूळ लोकसंख्या वाढीस आळा निर्माण होतो. लोकसंख्या नियंत्रण ही होवू शकते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!