तरुणींनो, तुम्ही आधी प्रेम शोधता, म्हणून फसता… मिळणारा रिस्पेक्ट आधी शोधा.
हर्षदा पिंपळे
रोहन पैशाने श्रीमंत होता.घरचेही चांगले प्रेमळ होते.रोहनच्या घरचे त्याच्या लग्नाच बघत होते. पण रोहनला मात्र रिया नावाची कुणीतरी मुलगी आवडत होती.रियानेसुद्धा रोहनला लग्नासाठी होकार दिला होता. दोघेही एम.फीलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होते.त्यामुळे लेक्चर नंतर दोघं एकत्रच असायचे.रोहन अनेकदा रियाला बाईकवरून, कारमधून लॉंग ड्राईव्ह ला घेऊन जायचा. ती म्हणेल ते सगळं रोहन करायचा. तिला हवं असलेलं सगळं घेऊन द्यायचा.
पण एक दिवस रियाने त्याच्याकडे अत्यंत महागडी गोष्ट मागीतली. तर रोहनने तिला “आपण ते नंतर घेऊयात,आत्ता हट्ट करू नकोस ” असं सांगितलं.तर रिया ऐकायला तयारच नव्हती. हट्टच करत होती.रोहनने तिचा तो हट्ट न पुरवल्यामुळे रिया रोहनशी भांडत होती.”तुझं माझ्यावर प्रेम नाही.. नाहीतर तु असं केलच नसतं” असं रिया रोहनला म्हणू लागली.रोहनला वाटलं रिया मस्करीमध्ये असं बोलतीये.म्हणून त्यानेही इतकं काही रियाच बोलणं मनाला लागून घेतलं नाही.पण त्यावेळी ती तडक गाडीतून निघून गेली. रोहनने तिची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला.इतकच नाही तर दुसऱ्या दिवशी तिला भेटायला तो बाहेर गेला.
पण तिथे त्याला काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालं.रिया त्याच्याच मित्राच्या गळ्यात गळे घालून उभी होती.कारण त्याच्या मित्राने रियाला भेटतानाच एक रिंग गिफ्ट केली होती.झालं मग सगळं संपलं होतं.रोहनने थेट रियाला विचारलं हे काय चाललय म्हणून…? त्यावेळी ती थेट त्याला “तुला हे विचारण्याचा काहीच अधिकार नाहीये,तुझा माझा काहीही संबंध नाहीये” असं म्हणून करनच्या कारमधून निघून गेली. त्यानंतर रोहनला प्रेम करून पश्चाताप झाला होता. घरी काय सांगायच तेही त्याला कळत नव्हतं. रोहन पुरता खचून गेला होता.शेवटी एकच कळालं होतं की रियाने केवळ रोहनच्या पैशावर,श्रीमंतीवर प्रेम केलं होतं.
(खरं तर कित्येक मुलांना तिने असच फसवलं होतं.तिच्या प्रेमात पडणारी मुलं खरच आंधळं प्रेम करत होती.)
पहा,भरभरून प्रेम करणारी जशी माणसं असतात तशीच काही माणसं केवळ पैशावर ऐशो आरामावर प्रेम करणारी,दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणारी माणसं सुद्धा असतात.
प्रेमासारखी सुंदर भावना आजवर कित्येकांना कळली बरं…? ‘आय लव्ह यु’आणि ‘आय लव्ह यु टू’म्हणजे खरच प्रेम असतं का…?सारखं सारखं शोना -बाबू करणं म्हणजे प्रेम..??
खरं तर तरूणींच्या नव्हे तर तरूणांच्या बाबतीतही हाच प्रश्न उपस्थित होतो.केवळ तरूणीच नाही तर तरूणसुद्धा प्रेम शोधतात,त्या प्रेमात फसतात आणि रिस्पेक्ट तर बाजूलाच राहतो.
आयुष्यात प्रेमासारखी सुंदर गोष्ट नाही. प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात.पण असं जरी असलं तरी जिथे विश्वास, आपुलकी आणि एकमेकांबद्दल आदर असतो तिथेच खरं तर प्रेम मोकळेपणाने फुलतं.पण हल्ली प्रेमाच्या व्याख्याच बदलत चालल्या आहेत.आज प्रेमात पडून आठ दिवस मजा करून नवव्या दिवशी भांडून थेट ब्रेकअप करणारं प्रेम म्हणजे प्रेम………???
अशीच आहे नं आजकालच्या प्रेमाची व्याख्या…?
वयानुसार हार्मोन्समध्ये विविध बदल होत असतात.आणि वयाच्या एका टप्प्यावर आपलं कुणीतरी असावं,आपल्याला कुणीतरी सगळ्यात जास्त जीव लावावा,आपल्याला हवं ते करावं असं वाटत असतं.आणि बऱ्याचदा तर काही तरूण-तरूणींना घरातून प्रेमच मिळत नाही. त्यामुळे तर काही तरूण-तरूणी तर बाहेरच प्रेम शोधतात. पण प्रेमाच्या नादात स्वतःची किंमत विसरून जातात. प्रेमापुढे रिस्पेक्ट वगैरे त्यांना बहुधा दिसत नसावा.आणि यामुळेच नंतर जेव्हा प्रेमात फसगत होते तेव्हा मात्र त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. स्वतःची किंमत खऱ्या अर्थाने समजायला लागते.
अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतोय,
एखाद्या मुलीची किंवा मुलाची प्रेमाच्या बाबतीत फसवणूक कशाप्रकारे केली जाते ते आपल्यापैकी कदाचित सगळेच जाणत असतील.
कुणी केवळ पैशासाठी प्रेम करतं तर कुणी फक्त शारीरिक सुखासाठी प्रेम करतं.इतरांना लग्नाच आमीष दाखवून कित्येकदा फसवणूक केली जाते.एखाद्याचं पूर्ण आयुष्य बरबाद होतं.कुणाची तर काही इज्जत राहत नाही.प्रेमाच्या मागे धावता धावता रिस्पेक्ट वगैरे विसरून जाते ही तरूणाई…प्रेमात आपला स्वतःचा रिस्पेक्टही महत्त्वाचा असतो.जो आपला रिस्पेक्ट करू शकत नाही त्या प्रेमाला काय अर्थ असतो…?
कित्येक तरूण तरूणी यात फसले जातात. तरूणींनो आणि तरुणींनो केवळ जवळ घेणं,गोड गोड बोलणं म्हणजे प्रेम नसतं.एखाद्याने लैंगिक सुख दिलं म्हणजे प्रेम नसतं.एखाद्याने पैसा ओतला म्हणजे प्रेम नसतं.घरचे रागावले,ओरडले म्हणजे त्यांना तुमच्याविषयी प्रेम वाटत नाही असं नाही. त्यामुळे उगाचच कुणीतरी जीव लावतय,प्रेमाने बोलतय,महागडे गिफ्ट्स देतय म्हणून कुणाच्याही प्रेमात पडू नका.एखाद्या चांगल्या मुला-मुलींच आयुष्य यामुळे खरच पणाला लागतं.कोण केव्हा फसवेल काही सांगताच येत नाही.त्यामुळे केवळ मुलच मुलींची फसवणूक करतात असं म्हणून अजिबात चालणार नाही. काही मुलीसुद्धा अशा असतात ज्या मुलांची फसवणूक करतात. त्यांच करिअर-आयुष्य बरबाद करून टाकतात.
म्हणून प्रेम शोधण्यापेक्षा रिस्पेक्ट शोधायचा प्रयत्न करा.कारण एखाद्या नात्यात रिस्पेक्ट असेल तर त्या नात्याला अर्थ असतो.जिथे रिस्पेक्ट नाही तिथे असणारं ‘प्रेम’ प्रेम तरी कसं असेल..?केवळ एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होऊन एखादा खोटं खोटं प्रेम करतो.आणि यामध्ये फसगत होते ती खरं प्रेम करणाऱ्यांची.त्यामुळे प्रेमात पडण्याआधी काही गोष्टींचा विचार नक्की करा.आणि आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा जरा डोळे नीट उघडे ठेवून जगाकडे पहा.उगाचच वहावत जाऊन स्वतःचीच फसवणूक करून घेऊ नका.प्रेमात पडायची घाई करू नका.भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रेमाला स्वीकारू नका.आधी गोड बोलून, इमोशनल होऊन स्वतःच्या जाळ्यात ओढणारे तरुण-तरूणी हल्ली कमी नाहीत.
पहा..प्रेमाची परिभाषा समजून घेऊन प्रेम करा.नात्यात रिस्पेक्ट आहे की नाही याचा शोध घ्या.निष्ठा, प्रामाणिकपणा, एकमेकांविषयी असलेला आदर,एकमेकांच्या करिअरला मिळणारं प्रोत्साहन, एकमेकांच्या जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रेमाला गवसणी घाला.इतकच नाही तर घरच्यांच्या जीवावर उगाचच रोमान्स करत फिरू नका.काहीजण असतात असे घरच्यांच्या जीवावर सगळा रोमान्स करून मोकळे होतात आणि एकीकडे आपल्या जोडीदाराची फसवणूकसुद्धा करतात.
म्हणून प्रेम करा ते स्वतःच्या हिमतीवर करा.आणि जिथे आपली कदर नसेल तिथे प्रेमाची भीक मागायला अजिबात जाऊ नका.कारण वापर करून सोडून देणारे अनेकजण आहेत. इतकच नाही तर स्वतः सगळं करून दुसऱ्याच्या आयुष्याला गालबोट लावणारी निर्लज्ज तरूण-तरूणीही आहेत.ज्यांच्यामुळे चांगल्या तरूण-तरूणींच आयुष्य पणाला लागतं.असणारा रिस्पेक्ट कमी होऊ लागतो.
त्यामुळेच प्रेम शोधायची घाई करू नका..त्याआधी स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करा…स्वतःचा रिस्पेक्ट शोधायचा प्रयत्न करा.हल्लीच्या प्रेमाच काही सांगता येत नाही पण रिस्पेक्ट कमवायला खूप वेळ लागतो….तो आधी कमवा….कारण तोच उभं रहायला बळ निर्माण करतो.प्रेमात ताकद असली तरी सन्मानाने जगण्याची गोष्ट काही वेगळीच असते.त्याची ताकद काही औरच असते.
So,प्रेम करा…पण जरा जपून…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
