प्रेम, लग्न आणि शरीरसंबंध यावर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या काय feelings असू शकतात.
सोनाली जे.
एका ठराविक वयात मुलांच्या आणि मुलींच्या शारीरिक रचनेत बदल घडतो. मुलांना दाढी , मिशी येवू लागते. उंची वाढते . तारुण्याची चाहूल लागते. तसेच मुलींच्या मध्ये ही बदल दिसून येतात.वक्ष , नितंब यांना शेप येवू लागतो. अंतर्गत बदल म्हणजे harmonal changes होवू लागतात. आणि त्यामुळे मुला मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. काही खास feelings निर्माण होतात. पझेसिव्ह असतात. आपला आहे ती आपली आहे या feelings निर्माण होतात. मग सतत एकमेकांकडे बघणे , काही कारणाने बोलणे असे सुरू होते.सतत तो किंवा ती आपल्या नजरे समोर असावेत असे वाटते. आणि बरेचदा ही तरुण पिढी यालाच प्रेम असे म्हणते. पण हे काही अंशाने शारीरिक आकर्षण म्हणले तरी चालेल.
पण थोड्या पुढच्या स्टेज मध्ये गेले म्हणजे कॉलेज किंवा नोकरी करताना तर सहवासात किंवा संपर्कात येणारे मित्र मैत्रीण, सहकारी यांच्यात मैत्री होते. त्यांचे स्वभाव एकमेकांना आवडू लागतात. एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. अभ्यास , कामात मदत , आवडी निवडी समजून घेतात. आवडते छंद जपतात. असे ते जास्त प्रमाणत एकत्र राहू लागतात. एकमेक कायम सोबत असावे . साथ असावी अशी इच्छा वाटू लागते आणि त्यातून प्रेम निर्माण होते पण हलकासा स्पर्श ही त्यांना आवडू लागतो. रोमांचित करतो. यातून पुढे प्रेम विवाह करणारी कपल आहेत आणि त्यात ही बरीच कपल ही एकमेकांना अजून जास्त चांगली साथ देणारी , प्रेम , आपुलकी , ओढ असलेली , एकमेकांना जपत असलेली. नवीन नवीन गोष्टी उत्साहाने करणारी आहेत. त्यांच्यात शारीरिक संबंध ही खूप उत्कृष्ट प्रकारचे निर्माण झाले कारण पहिल्यापासून एकत्र असल्याने आवडी निवडी , स्वभाव समजत गेला असतो . त्यानुसार मूड ही चांगला समजत असतो.आणि प्रेम , आकर्षण , लग्न यातून शारीरिक संबंध ही अतिशय वरच्या पातळीचे निर्माण होतात.
तर प्रेमविवाह होवून ही एकमेकांना समजू शकले नसतात. लग्नानंतर काही तरी कुरबुरी सुरू होतात. पण काही कपल मध्ये शारीरिक संबंध चांगले असतात आणि त्यामुळे ते परत परत एकत्र येवून सगळे विसरून पुढे जात असतात. तर काही कपल मात्र सतत वाद , एकमेकांशी पटवून घेवू शकत नाहीत . त्यांच्यात शारीरिक संबंध ही चांगले प्रस्थापित होत नाहीत. असे मात्र पुढे विभक्त होतात. मुले असतील तर काही वेळेस adjust करून तसेच एकत्र राहतात. पण काही वेळेस मुलांची कोणी तरी जबाबदारी घेते आणि विभक्त ही होणारे आहेत.
Arrange marriage होवून त्यांच्यात खूप चांगले tunning ही होणारे कपल आहेत. तर त्यांच्यात चांगले शारीरिक संबंध ही असतात.
याउलट काही कपल मात्र कधीच adjust करू शकत नाहीत. आणि त्यांच्यात फारसे शारीरिक संबंध ही नसतात. प्रेम, लग्न आणि शरीरसंबंध यावर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या काय feelings असू शकतात. याचा थोडा विचार करूयात.
स्त्रीच्या दृष्टीने विचार करता प्रेमातली एक हुरहूर , आकर्षण , मग एकमेकांशी बोलण्याची उत्सुकता , एकमेकांच्या आवडी निवडी काय आहेत हे समजून घेताना काही आवडी मिळत्या जुळत्या असतील तर आनंद होतो तिला. ज्याच्यावर प्रेम जडते त्याला तिचा कोणता पेहराव आवडतो , तिच्यावर कोणता रंग खुलून दिसतो .मग ती कशी दिसते यावर ही त्याच्या compliment तिला पाहिजे असतात. त्यातून तिचे मन आजुन उत्साही होते. प्रफुल्लित होते. तिचे वागणे , बोलणे कसे आहे. त्याला आवडते का हे सगळे तिला जाणून घ्यायचे असते. आणि त्यानुसार तिच्यात बदल घडवून आणणं ही तिला आवडते.
थोडक्यात प्रेम हा त्यांच्या एकत्र जीवनाचा खंबीर पाया ..फाउंडेशन , base निर्माण करणे म्हणले तरी चालेल. तो जेवढा strong तेवढे त्यांच्या नात्याची वीण घट्ट. कोणत्याही स्त्री ला लग्नापूर्वी शरीर संबंध फारसे आवडत नाहीत. पण तिला कळत नकळतच हलका स्पर्श खूप आवडतो. त्यातून रोमांचित व्हायला एक गोड भावना निर्माण होते ती आवडते. बहुतांशी स्त्रिया शारीरिक संबंध याला विरोध च करतात. किंवा मर्यादा पाळतात. पण आजकाल पिढी आणि विचार बदलत आहेत. त्यांच्या विचारांमध्ये ही खूप फरक आहे. मर्यादा कशाला पाळायच्या पुढे जावून हे शारीरिक संबंध होणारच आहेत तर आजच त्याची थोडी excitement अनुभव घेवू असे विचार करणारी ही पिढी आहेच. अर्थात हे घरचे संस्कार , मर्यादा आणि मुलींना शिकविण्यात आलेल्या मर्यादा यावर ही अवलंबून आहे.
याउलट मुलांचं कसे असते.. प्रेम हे बरेचदा बाह्यरूप , ती मुलगी दिसते किती सुंदर , राहते कशी , आपल्याशी आपणहून बोलते , जवळीक करते यावर बरेचदा अवलंबून असते. आणि ते प्रेमात सुरुवातीला ही मुलींच्या सोबत जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. तेही मुलींना आपलेसे करण्याकरिता काही गिफ्ट मग त्या निवडून आवडतील अशा देतात. कधी तिला बाहेर कॅन्टीन , हॉटेल मध्ये खाणे पिने , तर कधी बाईक वरून , गाडीतून लाँग ड्राईव्ह करिता घेवून जातील . पण मग त्यांना शारीरिक स्पर्श जास्त आवडतो. घट्ट मिठी , चुंबन याची सुरुवात नेहमी मुले च करतात. आणि यातून पुढे जावून लग्नापूर्वी सुधा त्यांना शारीरिक संबंध आवडतात. उलट ते त्याची डिमांड ही करतात. काही अट्टाहास करून मुलींना ते करण्यास भाग ही पाडतात.
तर काही मुले जवळीक करतात ते केवळ शारीरिक गोष्टीत समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतात. पण मुलींना वाटते की हे प्रेम आहे म्हणूनच ते ही जवळीक करतात. पण अशा मुलांना खरेच काही वेळेस तिच्या बद्दल काहीच feelings नसतात. खरे प्रेम करणारे जे असतात मग मुली असोत अथवा मुले एकमेकांची काळजी घेणारे असतात. जसे गुलाबाची फुले तोडण्या पेक्षा सुकलेल्या झाडाला पाणी घालून ते अजून ताजेतवाने करणारी, जपणारी ही प्रेम करणारी मुले मुली असतात. त्यांना एकमेकांपासून काही लपविणे आवडत नाही. एकमेकांची दुःख ते वाटून घेतात. मदत करतात. आनंद असेल तर आनंदात सहभागी होतात.
लग्न हा स्त्री पुरुष यांना एकत्र येण्याकरीता मिळालेला परवाना. लग्न झाल्यावर शरीर संबंध योग्य हे प्रत्येक स्त्रीला आवडते. पण पुरुषांना थोडी नेहमीच घाई असते. लग्नापूर्वी ही त्यांना ती ओढ असते. लग्नानंतर स्त्रीच्या feelings या संमिश्र असतात. हुरहूर, भीती कसे होईल कसे जमेल , पटेल का ,जरी आधी भेटले असतील तरी ही एकत्र येण्याची , राहण्याची पहिलीच वेळ असते. सगळ्यात महत्वाचे लग्नानंतर पुरुष , पती हाच सर्वस्व म्हणजे त्याच्यावर भरोसा , विश्वास ठेवूनच ती सासरी आलेली असते. त्यामुळे त्याच्यावर आपला च अधिकार, हक्क आहे ही भावना असते तिची. पण त्याला मात्र वेगळे असे काही वाटत नसते. हुरहूर असते. ओढ असते. दोघांना ही excitement असते नक्कीच.
लग्नानंतर प्रत्येक च स्त्रीच्या खूप सुंदर feelings असतात. तिने काही कल्पना केल्या असतात. काही गोष्टी मैत्रिणी , मोठ्या वहिनी , बहिणी यांच्याकडून समजल्या असतात. तर काही गोष्टी सोशल मीडिया मधून मिळाल्या असतात. मग पहिल्या शारीरिक मिलना भेटीत कोणता पेहराव असावा , अगदीं नवऱ्याचा ही काय असावा , बाह्य तसेच अंतर्गत ही यावर आजकाल खूप जागरूकता आली आहे. कसे वातावरण असावे , मग सुगंधित परफ्यूम , सुवासिक प्रसन्न करणार रूम freshner असेल, चाफा , मोगरा किंवा निशिगंधा ची सुवासिक सोबत असेल . एखादे हीलस्टेशन असेल , निसर्गरम्य ठिकाण असेल , दोघांना एकांत मिळेल अशी जागा पसंत करतात. मग तेव्हा candle light ,rose पेटल्स हे बघितलेले आपल्याला ही अनुभवायला मिळावे या हेतूने तशा arrangments म्हणजे हे रसिकतेचे प्रतीकच. आणि ते खूप महत्वाचे असते आयुष्यात. कारण सकारात्मक , उत्साही नाते निर्माण करण्यास हे गरजेचे असते.
जेव्हा पहिल्यांदा शरीर संबंध होतात तेव्हा स्त्री ला आधी थोडे मुड निर्मिती होणे गरजेचे वाटते. तिची शरीर रचना तशी असते बहुदा की तिला फुलवण्याची गरज जास्त वाटते. मग आधी गप्पा टप्पा , हलके फुलके विनोद , हलके स्पर्श , तिला डायरेक्ट शरीरसंबंध करण्यापेक्षा रोमान्स , फोर प्ले मध्ये आवड जास्त असते. आणि ही आवड किंवा गरज हळूहळू ती तिचा जोडीदार जर खरेच समजून घेणारा असेल तर नक्कीच आत्मसात करतो आणि तिला खुलविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यातून दोघांना ही परमोच्च आनंद , सुख आणि शांतता आणि एक भावनिक , शारीरिक सुरक्षितता , मिळावी याकरिता ते प्रयत्न करतात.
अगदी मग स्त्री ही पुरुषाच्या भारदस्त छातीवर नुसते डोके टेकून किंवा त्याच्या घट्ट मिठीत ही स्वतः ला खूप सुरक्षित समजत असते. आणि पुरुष ही तिला ही सुरक्षितता , तिचा हा रोमान्स मधून आनंद वाढवत तिला कसे पाहिजे कसे आवडेल हे समजून घेवून मग शारीरिक संबंध ठेवून अजून जास्त सुख , समाधान देण्याचा प्रयत्न करतो . आणि असे कपल खरेच खूप आनंदी आणि सुखी असतात. आणि त्यांच्यात परमोच्च बिंदुवरचे शारीरिक संबंध असतात. आणि इतर गोष्टीत वाद झाले . विचार असतील किंवा घरातल्या इतर कारणामुळे काही भांडणे असतील तरी ती या शारीरिक संबंध आणि भावनिक attachment यातून आपोआप विसरून , किंवा प्रयत्नपूर्वक मिटवून परत एकत्र येवून शांतता निर्माण करतात मग ती शरीराची असेल किंवा मनाची. ती एक cycle असते. जी शारीरिक संबंधात पूर्ण होते. मग रोजचे रूटीन , धावपळ असेल , पुरुषाचे ऑफिस , कामाचा ताण असेल , स्त्रीचे ही घरातले काम , कष्ट , ताण , रुसवे फुगवे , एकमेकांचा प्रोग्रेस असेल तर हे सगळे आनंद मिळविणे किंवा स्ट्रेस विसरून , निराशा विसरून यातून मुक्त होणे, रिलॅक्स होणे किंवा अगदी आनंदी गोष्टींचे सेलिब्रेशन म्हणले तर त्याचा शेवट ही शारीरिक cycle पूर्ण होण्यात असतो. आणि मग दोघेही उत्साही , आनंदी , कायम फ्रेश राहतात.
याउलट काही पुरुष लग्न झाले म्हणजे कधी एकदा शारीरिक सबंध होतात याचीच वाट बघत असतात. स्त्री ची , बायकोची गरज काय हे लक्षात ही घेत नाहीत. तिला काय आवडते कसे आवडते याचे कोणतेही विचार न करता स्वतः ची गरज भागवून लगेच गाढ झोपी जाणारे ही आहेत. यात केवळ त्यांना त्यांचे सुख आणि गरज भागविणे याच भावना असतात. बाकी विचारही नसतात. जेव्हा कधी आम्ही pre marital counselling करतो तेव्हा सुरुवातीला स्त्री चे एक वेगळे आणि पुरुषाचे एक वेगळे कौन्सिल session घेतो. त्यानंतर दोघांचे एकत्र counselling करतो. दोघांना वाटणाऱ्या अडचणी , काही प्रश्न असतील तर त्याचे मोकळेपणाने डिस्कशन ही करतो. यातून दोघात ही बर्या पैकी understanding निर्माण होते. एक विशिष्ट bound निर्माण होतो. दोघात काही तणाव असेल, समस्या असतील तर तो तणाव कमी होवून समस्या निराकरणासाठी मदत होते. दोघांच्यात एकदम मोकळेपणा येतो.
सगळ्यात स्त्री पुरुष यांनी प्रेमात ,, लग्नापूर्वी , लग्नानंतर , आणि शारीरिक संबंधात एकमेकांना समजून घेणे , काही गोष्टी समजत नसतील, माहिती नसतील तर त्याची माहिती करून देणे ,सामंजस्य , पेशंस , एकमेकांवर विश्वास , आदर , प्रेम , आपुलकी , ओढ आणि सुखी आनंदी ठेवण्याचे प्रयत्न किंवा तशा भावना ठेवून प्रयत्न करणे गरजेचे असते. आणि या गोष्टीची आवड आणि सवड काढणे ही गरजेचे आस्ते.भावना या दोघांना ही असतात. मग , प्रेम , pleasure सुख , शांती , समाधान ,म्हणजे ते भावनिक समाधान आणि sexual satisfaction दोन्ही आले. सुरक्षितता , आपलेपणा या दोघांना ही भावना असतात.एकमेकांच्या feelings समजून घेणे महत्वाचे असते. त्या जपणे आणि वाढीस नेणे गरजेचे असते. काही कमतरता असतील तर त्या दोघांनी सामंजस्याने सोडविणे त्याकरिता योग्य उपाययोजना करणे त्याकरिता दोघात तेवढी मोकळीक ही निर्माण करणे गरजेचे असते. समजून घेतले तर खरेच सगळ्यांची आयुष्य सुखी , समाधानी आणि आनंदी होतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
