Skip to content

डोळ्यात प्रेम दिसायचं, पण मनात फक्त वासना होती !

डोळ्यात प्रेम दिसायचं, पण मनात फक्त वासना होती !


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर समुपदेशक)
संचालक, आपलं मानसशास्त्र


नुकतंच नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून तिने पुण्याच्या सरकारी रुग्णालयात नोकरी सुरू केली. अधनं-मधनं मुंबईहून तो यायचा तिला भेटायला. आणि २ ते ३ तास एकांतात भेटून लगेचच निघायचा. हवं ते गिफ्ट मिळायचं तिला, खाण्या-फिरण्याची तर त्यात अजून भर पडायची. त्यांची ओळख दिड वर्षांपूर्वीचीच. पण लग्नाची अर्धी जिंदगी जाऊनही बऱ्याच जोडप्यांना एकमेकांच्या मनाचा अंदाज आलेला नसतो, अशा दिड वर्षाच्या कालावधीत तिने त्याला जणू सर्व अर्पणच केलेलं होतं.

रुग्णालयात ४४ वर्षाच्या एका मावशीसोबत (सिनियर नर्स) तिची खूप चांगली गट्टी जुळायची. तिने ठरवलं की मावशीला त्याची ओळख करून द्यायची. तो आला, भेटला आणि निघून गेला. पण मावशीला त्याचं व्यक्तिमत्व काहीसं पटत नव्हतं. मावशीने तिला सांगितले…..

त्यात ती उत्तरली, अगं मावशे – त्यानं मला लग्नाचं वचन केव्हाच दिलंय आणि माझ्या बा पेक्षाही जास्त काळजी घेतो तो माझी. त्याच्या डोळ्यात नेहमी मला प्रेमच दिसतंय बघ.

मावशीला तिच्या डोळ्यात अदृढ विश्वासाची एक वेगळीच चमक दिसली. आणि ती चमक मावशीला ब्रेक करायची नव्हती. मावशीने स्वतःची समजूत काढून तो विषय थांबवला.

दोन महिन्याने मावशीची बदली झाली. तोपर्यंत मावशीने तिला जराही हटकलं नाही.

आज ४ वर्षानंतर मावशी तिला स्वारगेटला भेटली. प्रथमदर्शी मावशीला ती ओळखताच येईना. डोळे कुरूप, खोल आणि फार बारीक झाली होती ती.

अजूनही लग्न झालं नव्हतं. मावशीने हटकलं,

तेव्हा उत्तरली….

त्याच्या डोळ्यात फक्त प्रेम दिसायचं, पण मनात फक्त वासना होती !!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “डोळ्यात प्रेम दिसायचं, पण मनात फक्त वासना होती !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!