Skip to content

‘Family Issue’ मुळे असंख्य समस्या भेडसावत आहेत??

आज काल “Family issue” हे अगदीच सार्वत्रिक झाले आहेत.


योगिनी सौरभ पाळंदे

(समुपदेशक)


अगदी आलीकडेच माझ्याकडे समुपदेशन साठी एक जोडपे आले साधारण २७-३० वयोगटातील येण्याचे कारण त्यांना घटस्फोट घ्यायचा होता. पहिल्या भेटी मध्ये मिळालेल्या माहिती नुसार घरात तो मुलगा, ती आणि मुलाचे आई-वडील असे चौघे राहतात. त्या मुलीचे सासू सासरे दोघेही निवृत्त अगदी चांगल्या पदावरून. दोघेही उच्च शिक्षित, तो एका चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये नोकरी करत होता. तिने नुकताच स्वतःचा business‌ करायला सर्वात होती होती. सगळं नीट चालू होत. सगळं तस बरं चला होत. लग्नाला आता ३वर्ष होत आली होती.

मग मी त्या मुलीशी एकांतात बोले. आधी वाटलं त्यांच्याच दोघांचं पटत नाही म्हणून त्यांना वेगळा व्हायचंय पण परिस्थिती आजुन वेगळी होता. त्या दोघांमध्ये काहीच अगदी काहीच प्रॉब्लेम न्हवता. अग मग तुला का वेगळा व्हायचंय असा प्रश्न मी तिला केला ती बोलू लागली…

हे बघा आमच्या लग्नाला ३वर्ष होत आली पण आजूनही मला माझ घर म्हणून कोणतीच गोष्ट करता येत नाही. जरा काही करायचा झालं तरी सासूबाई हा माझा सौसर आहे यात लुडबुड करायची नाही आस म्हणतात. सतत नुसते टोमणे मरायचे सतत फक्त तुमच आमच. कधीच आपलं म्हणत नाहीत. स्वतःच काही करू देत नाहीत. वयस्कर आहेत म्हणून घरी एक कोणीतरी असावं म्हणून मी स्वतःचा बिस्नेस करायचा निर्णय घेतला पण, त्याचं यांना काहीच नाही. बाहेर जाऊन सांगतात मी काहीच करत नाही दिवसभर घरी बसून आसते. स्वतःच काही करू न देणं आणि आता अस बोलणं हे काय बरं अस. फक्त यांचा मी पणा रास्त असं असत का?

यांना सतत मानपान पाहिजे. घरात यांच्यामुळे खूप nigativety आहे कारण कोणाबद्दल च ते चांगलं बोलत नाहीत सतत शिव्या वगेरे देऊन बोलतात. आणि मला म्हणतात “वातावरण बिघडलंय तुझ्या मुळे आमच्या घरातला.” हो मी होते स्पष्ट पुणे व्यक्त पण जेव्हा अगदीच सहन होत नाही तेंव्हा बोलणारच ना. हे फक्त माझ्या सोबत होता आसा ते त्यांच्या मुला सोबत देखील असच वागतात.

सतत अगदी आम्ही मूर्ख असल्यासारखं वागवतात आम्हाला दोघांनाही. कळत्या सावर्त्या मुळलासुद्धा ३-४ वर्षांच्या मुलासारखी वागणूक दिली जाते. त्याला स्वतःच्या हिमतीवर उभा राहा अस सांगण्या ऐवजी कसा तू आमच्यावर अवलंबून आहेस तुला असच रहायचंय हेच सतत सांगतात त्याला. असे यांचे “सौस्कर”. मला अश्या वातावरणाची सवय नाही.

यावरून अनेकदा वाद झाले पण त्यावर त्यांचा एकाच मत आम्ही आसेच वागणार तुम्हाला एवढं त्रास आसेल तर वेगळे व्हा. मी म्हणलं ठीक आहे होऊ वेगळे पण हा नाही म्हणतोय कारण सवय नाही.

आता मी तिच्या नवऱ्याशी बोले एकट्याशी त्याला विचारलं पण त्याच्या ही बोलण्यात हेच आला की आमच्यात सगळं उत्तम चालत पण तीच माझ्या आईवडिलांशी पटत नाही. मी वेगळा नाही होऊ शकत. मग आम्हाला हा पर्याय ना इलाजास्तव निवडावा लागणार अस दिसतय. दुसरा काही मार्ग नाही. दोघेही(आई-बाबा आणि ती) आपल्या मतावर ठाम आहेत.

आता वेळ होती सासू सासऱ्यांशी बोलण्याची ते आले मी काही बोलण्या आधीच त्यांनी सर्वात केली या आजकालच्या मुली जुळवून घ्याला नको. आम्ही तिच्या पेक्षा वयाने मोठे आहोत आम्ही आसच वागणार जमत आसेल तर तुम्हीच तिला समजवा.

आता मला ही फॅमिली लक्षात आली प्रॉब्लेम पण समजला.पण स्वभावाला औषध नसत हे मात्र जाणवलं.त्यावर उपाय झाले सगळं झालं. आता ते दोघ वेगळं राहतात.

माझा या पालक वर्गातील सगळ्यांना सांगणं आहे आपल्या अभिमान जपा पण त्याचा आहांकर ठेऊन जर वागलात तर तुमच्या मुलाचे सौसार होणार नाहीत. आणि असच वागायचं आसेल तर आपल्या मुलांची लग्न करून एका मुलीच्या आयुष्याचं नुकसान करू नका. तुम्ही जसे कष्ट केले तसे मुलांना ही करुद्या.

आपल्या मुलांना स्वावलंबी राहायला शिकवलं पाहिजे. पाठीशी राहा आधार नकोय विश्वास ठेवा. स्वतंत्र राहुद्या. तुमचा निवृत्तीचा काळ आराम करण्याचा, एकमेकांना सोबत वेळ घालवण्याचा, फिरायला जण्याचा आहे. कळत्या सवर्त्या मुलांच्या आयुष्यात, सौसरत ढवळा ढवळ करण्याचा नाही हे जाणून घ्या.

म्हणजे आता वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण कमी हईल आणि सगळेच सुखान आयुष्य जगतील. स्वच्छंदी जगू शकतील, सुखी होतील हे निश्चित.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “‘Family Issue’ मुळे असंख्य समस्या भेडसावत आहेत??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!