Skip to content

संसारातील अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून कसे वाचावे?

संसारातील अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून कसे वाचावे?


संसारात अयशस्वी स्त्री म्हणजे नेमके कोणत्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण स्त्री ही संसारात अयशस्वी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ती आपण थोडक्यात बघू.

१. करिअर मागे धावणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या करियर आणि घर , संसार , पती , मुले रोजच्या जबाबदाऱ्या बरेचवेळा नीट पार पाडू शकत नाहीत. असे म्हणत नाही की पार पाडत नाहीत. पण कसे होते की वेळ, लक्ष , energy ही ऑफिस काम , travelling time, आणि घर संसार , बाहेरची कामे , घरातली कामे , मुलांचा अभ्यास , अगदी स्वतः घेत नसेल तरी tution . तिथे वेळेत गेले का नाही. कधी school meetings, कधी येणारी अचानकच आजारपणे , रोजचे cooking , सगळया कामाना बाई लावणे ही शक्य नसते. आणि लावली तरी स्वतः लक्ष द्यावेच लागते. कपडे धुतले तरी ते वाळल्यावर घड्या करणे , इस्त्री ला टाकणे , युनिफॉर्म वेळेत इस्त्री करून आणणे , अगदी छोटी कामे जसे डबे भरणे , धुणे ,वॉटर bottle भरून ठेवणे , या शिवाय ऑफिस work load, या सगळ्या सगळ्यामध्ये आणि अशा असंख्य छोट्या मोठ्या कामामध्ये स्त्री चा वेळ जात असतो.

मग बरेचवेळा balance होणे मुश्किल असते. या सगळ्या धावपळीत कधी ऑफिस कामात कमी पडते , तर कधी संसारात जसे मुलांचे खाणे पिणे जपणे , त्यांचे अभ्यास घेणे असो किंवा त्यांना निवांत वेळ देणे तेही मुलांना पाहिजे तेव्हा.

तर कधी पती ला वेळ देवू शकत नाहीत. दिवसभर इतकी धावपळ असते की कधी एकदा पाठ टेकू आणि झोपू अशी अवस्था होते कारण परत दुसरे दिवशीसुद्धा तेच चक्र सुरू असते. किंवा जरी त्या energetic असतिल, टापटीप राहणाऱ्या असतील तर नवऱ्याकडून ही तसेच फ्रेश राहणे अपेक्षित करतात. आणि जर त्याच्याकडून तसे झाले नाही , वेळ , energy कमी पडली तर मात्र त्या थोड्या निराश होतात. आणि वारंवार हेच अनुभव येत गेले तर नात्यात नकारात्मकता येत जाते.

२. घरी असणाऱ्या स्त्रिया या सुधा दिवसभर घरचे काम , येणारे जाणारे , बाहेरची काही कामे असतील यातच अडकून पडतात. आणि बरेचदा स्वतः कडे बघायला ही स्त्रियांना वेळ नसतो.

Basically १ आणि २ नंबर दोन्ही स्त्रियांमध्ये वेळेअभावी स्वतः कडे दुर्लक्ष केले जाते. स्वतः ची फिगर ही maintain करणे अवघड जाते. मग बाकी छान आवरणे दूर च. किंवा कायम छान आवरून ही नवरे तेवढा वेळ देवू शकत नसतील ..आणि या नवऱ्याला तसे आकर्षित करू शकत नसतील तर हा त्यांचा दोष. कुठे तरी त्या कमी पडतात.

३. संसार हा एकट्याने होत नसतो त्याकरिता नवरा आणि बायको ही रथाची चाके खंबीर लागतात. मग एकमेकांच्या आवडी निवडी , गरजा समजून घेणे , एकमेकाला वेळ देणे, रोजच्या घटना , समस्या सांगणे त्यावर दोघांच्या डिस्कशन मधून solution काढणे , समस्या सोडविणे , आर्थिक गोष्टीचे पाठबळ , प्रेम , आपुलकी , secure life, विश्वास आणि आदर या गोष्टी असणे महत्वाचे असते.

४. बऱ्याच गोष्टी असून ही मग स्त्री मध्ये सौंदर्य असेल , विद्या विभूषित असेल , मुले असतील, घर असेल तरी काही कारणाने नवऱ्याला सांभाळू शकली नाही, तो व्यसनाधीन असेल , तर कधी बाहेरख्याली , मुलांना चांगले संस्कार देवू शकली नाही. मुले बिघडली, तरीही याचा अर्थ ती स्त्री ही संसारात अयशस्वी असणे हेच.

४.वाद , विवाद , विभक्त होणे, घटस्फोट , किंवा नवऱ्याचा मृत्यू हे सुधा तिचा संसार अयशस्वी होण्याची कारणे आहेत.

आणि आता संसारातील अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून कसे वाचावे? या करिता काही टिप्स बघू.
बरेचवेळा असे होते की संसारात अयशस्वी ठरलेली स्त्री ही एकाकी होते. एकटी पडते. भले ती कुटुंबात राहत असेल तरी ती मनाने एकटी च असते. अनेक समिश्र भावनांचा कल्लोळ मनात असतो. कधी होवून गेलेल्या घटनांचा सतत आठवणीतून मनावर मारा होता होत असतो. तर कधी दुसऱ्याची चूक असेल तरी किंवा स्वतः ची चूक असेल तरी जे सतत स्वतः ला दोषी मानले जाते. मनात सतत चा guilt असतो. तर कधी द्वेष असतो की नवरा , मुले माझ्याशी असे वागले. मग मी ही त्यांना आता बघेन च. किंवा मनातून कोसणे असते. कधी सततची चिडचिड , तर कधी चिंता , भीती , मग ती एकटेपणाची असेल किंवा भविष्याची भीती आणि चिंता असेल . यातून कधी आत्मविश्वास कमी होतो . तर कधी मन खूप हळवे होवून जाते.

अशावेळी संपर्कात येणारे पुरुष मग कधी ऑफिस मधले असतील, जवळचे मित्र असतील , शेजारी असतील, ते जवळीक साधण्याचा , तिच्या हळव्या मनोवृत्तीचा , तिला एकटेपणात आधार देण्याकरिता किंवा काळजी करू नको आम्ही आहोत असा खोटा दिलासा देणारी पुरुष मंडळी मैत्री करू इच्छितात. किंवा आपलीच लोक वेड्या वाकड्या नजरेने बघत असतात.

संसारातील अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून कसे वाचावे?

१. स्त्री ला जन्मजात एक देणगीच आहे म्हणा ना ..स्पर्श , नजर याची तिला चांगली पारख असते. त्यामुळे स्पर्श आणि नजर याच्या खात्री वर अशा मित्रंपासून ,लोकांपासून दूर राहा.

ती ज्या संस्कारात किंवा भारता सारख्या देशात जी संस्कृती आहे त्यात वाढली असते त्यात लहानपणापासून च घरातल्या मोठ्या स्त्रिया या पुरुषांच्या पासून दूर राहण्यास , कपडे अंगभर आणि नीट नेटके घालण्यास सांगत आल्या आहेत. अगदी पूर्वी बाहेरचे कोणी येणार असेल तर स्त्रिया खाणे पिणे देण्याकरिता ही बाहेर येत नसत. आणि आल्याचं तर डोक्यावर पदर . नजर ही खाली.आणि लगेच आत निघून जात.

त्यामुळे एखाद्या वेळी जरी पुरुष असा एकटक किंवा वाकड्या नजरेने बघत असेल तर ते तिला समजते . म्हणून
अशी वाकड्या नजरेचे पुरुष मित्र असोत , शेजारी किंवा ऑफिस मधले , नातेवाईक तरी स्त्री ही पहिल्या पासून त्यांना टाळते. त्यांच्या पासून दूरच असते. शक्यतो बोलणे , त्यांना भेटणे, संपर्क टाळते. दूर राहते .. अंतर ठेवून वागते.

२. बोलण्यास स्पष्ट नकार द्या :

काही वेळेस अशा वाकड्या नजरेने बघणारी पुरुष मंडळी खूप गोड बोलून , तुमची विचारपूस करून काही आधार पाहिजे का , मदत पाहिजे का असेही विचारतात. तर काही अगदी अरेरे वाईट झाले , किंवा एकट्याच तुम्ही किती गोष्टी तुम्हाला एकटीला कराव्या लागतात अशी सहानुभूती दाखवितात.

अशा पुरुषांच्या मैत्रीतून कायम वाचायचे असेल तर त्यांची कोणतीही सहानुभूती , मदत किंवा गोड बोलणे हे सगळे स्पष्टपणे नाकारा. मला गरज नाही मी समर्थ आहे. माझे मी बघून घेईन असा तुमचा खंबीर आणि स्पष्ट स्टँड घ्या त्यांना दाखवा. त्यांना खात्री वाटेल की नाही हीच्यापासून दूर च राहिले पाहिजे.

३. स्वतः च्या भावांनांवर कंट्रोल ठेवा . : संसारात किती ही अयशस्वी झाला तुम्ही तरी तुमच्या भावनांचे प्रदर्शन मांडू नका. मग कोणताही पुरुष असो अथवा स्त्री या कोणालाच कधीं तुमच्या मनाचा थांगपत्ता लागू देवू नका.

४. कोणत्याही दबावाला बळी पडू नका. :

स्त्री एखाद्या ठिकाणी अयशस्वी झाली म्हणजे सगळीकडे असे होत नाही असे समजावंणारे मित्र असतात. किंवा गोड बोलून कधी दबाव आणून तू यातून बाहेर पडले पाहिजेस .मग त्याला काय होते थोडे मित्रांच्या सोबत काही केलेस तरी ते जवळचे आहेत. तुला ही रिलॅक्स होईल वगैरे गोड बोलणारी ही मित्र मंडळी असतात.

तर काही जवळचे मित्र अगदी माझा खांदा तुझ्या आधाराला आहे. टेक आणि मोकळी हो असे म्हणून बळेच जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना दूरच ठेवायचे. आणि कठोर शब्दात एकदाच ठणकावून सांगायचे की , माझे मी बघून घेईन.तुम्ही यात पडू नका. बळेच माझ्या आयुष्यात घुसू नका.

५. काही वेळेस गोड बोलून त्यांच्या मैत्रीतून वाचायचे : प्रत्येक वेळी कटूपणा घेण्याची ही गरज नाही. काही वेळेस वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून गोड बोलून वाचावे. तुला जशी आई ,बहीण आहे तशीच मी बहीण समज. किंवा आपली फक्त मैत्री छान आहे. त्या मर्यादा पाळल्या तर आपली मैत्री अजून चांगली होईल. आणि टिकेल ..

संसारातील अयशस्वी असो अथवा यशस्वी असो कोणत्याही स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून स्वतः ला कसे वाचवावे हे तिच्या खंबीर आणि कठोरपणे वागण्यावर ही आहे. शिवाय ती गोड बोलून कशी परिस्थिती हाताळते यावर ही आहे. सगळ्यात महत्वाचे स्त्री ने स्वतः वर नियंत्रण ठेवणे . स्वतच्या मर्यादा ओळखून , परिस्थिती किती आणि कशी ही असो मनाचा समतोल ढळू देवू नये. तिचा तोल ढळला की सारेजण वाटच बघत असतात.

आणि सगळ्यात महत्वाचे सत्यात जगावे. स्वप्नात किंवा काही भविष्याची चित्र अशी असतील ..असे करू यात गुरफटून जावू नये.

कारण सत्य हेच आहे की तुम्ही तुमच्या संसारात अयशस्वी झाल्या आहात. तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणारे हे पुरुष , मित्र किती ही जवळचे असले तरी तुम्हाला कधीच योग्य स्थान देणार नाहीत. कारण त्यांचे लग्न झाले असेल तर ते कायमच त्यांचा संसार , त्यांची बायको मुले यांचाच विचार करणार , त्यांच्या भविष्याचा विचार करणार. त्यांची family सभाळून ते वेळ आणि प्रायोरिटी ठरवणार. आणि तेही सगळ्यांना लपून छपून . वेळ प्रसंगी तुम्हाला गरज असेल तरी ही प्रायोरिटी ही त्यांचे कुटुंब हीच असणार. भले तुम्हाला तात्पुरते आमिष दाखविले.

वस्तुरुपी असेल किंवा बाहेर घेवून जाणे असेल, जेवण असेल हा खर्च खूप तात्पुरता आणि किरकोळ असणार आहे. किंवा अगदी शरीराची गरज म्हणून शारीरिक संबंध जरी ठेवले .भले ते खूप छान असले तरी तेही कायमचे तुम्हाला नाहीच मिळू शकणार. आयुष्यभर ते तुम्हाला कधीच समाज , नातेवाईक किंवा कायद्याने एक दर्जा किंवा तुमचे स्थान ही देवू शकणार नाहीत .आणि तुमचा मोठा आर्थिक भार ही उचलू शकणार नाहीत. आणि यात तुम्हाला मानसिक त्रास किंवा तुमची भावनिक गुंतागुंत झाली तरी त्याचा विचार ही ते करणार नाहीत. किंवा तसा विचार ही त्यांच्या मनात येणार नाही.

त्यामुळे सत्यात जगणे आणि व्यावहारिक जगात जगणे गरजेचे हे कायम लक्षात ठेवा आणि समिरच्यालही त्याची जाणीव करून द्या.
आणि तरी ही जर एखादा मित्र वेड्यावाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला म्हणव कर एक करार , दे सगळ्यांच्या समक्ष लिहून , जवळच्या तुझ्या आणि माझ्या नातेवाईक मित्र मंडळीना बोलावून सांग की आयुष्यभर मी तुला जपेन , तुला एक स्थान देईन कायमचे. मग सगळ्या जबाबदाऱ्या शारीरिक , मानसिक , भावनिक , कायद्याने , आर्थिक , मुले बाळे त्यांचे शिक्षण त्यांना नाव देणे सगळे करेन . असे कोणी तयार होईल का विचारा तेव्हा तुम्हाला आपसूक सगळी उत्तरे मिळतील.

पण यात परत हेच की स्त्रीने कणखर आणि खंबीर राहणे गरजेचे.

दुसरे जर ते अविवाहित मित्र असतील तर काही काळ तुमच्या सोबत वेळ घालवतील, time pass करतील पण तुम्हाला कायम आपलेसे करणार नाहीत. किंवा लग्न हा विचार ही करणार नाहीत. त्यांचे ते लग्न दुसरीकडे करतील आणि लग्नानंतर तुम्हाला ओळख ही दाखविणार नाहीत.

याचमुळे संसारातील यशस्वी असो अथवा अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून स्वतः ला कायमच वाचवावे. कसे ते प्रत्येक स्त्रीने ठरवावे. कारण तिचे अनुभव , जवळचे मित्र यांना हाताळण्याची किंवा बोलण्याची तिची पद्धत ..यात त्यांना समजावताना तिने स्वतः चा तोल कधी ढळू देवू नये किंवा भावना आणि मानसिकता balanced ठेवाव्यात. आणि एक आहे स्त्री संसारात अयशस्वी ठरली म्हणजे सगळ्याच गोष्टीत ती अयशस्वी आहे असे नाहीच मुळी. ती बऱ्याच गोष्टीत यशस्वी सुधा असते. त्यामुळे ती सुज्ञ ही असते. अनुभवी ही असते. शिकलेली आणि चांगली कमावती ही असते. स्वबळावर खंबीर उभी राहणारी ही असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “संसारातील अयशस्वी स्त्रीने वेडीवाकडी नजरेने पाहणाऱ्या पुरुषांच्या मैत्रीपासून कसे वाचावे?”

  1. खूप छान बरोबर वस्तूस्तिथी दाखवली आहे 🙏

  2. पतीचा मृत्यू झाला तरी ती स्त्री कशी काय अयशस्वी असू शकते??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!