देशातील १० पैकी ७ स्त्रियांचे अनैतिक संबंध.. एका ऑनलाईन ॲपचा सर्व्हे, खरंच असेल?
सोनाली जे.
देशातील १० पैकी ७ स्त्रियांचे अनैतिक संबंध.. एका ऑनलाईन ॲपचा सर्व्हे, खरंच असेल? तर हो. म्हणजे जे ॲप वापरले त्यावरून तरी हेच निष्कर्ष निघाले आहेत. .
भारतातील १० पैकी सात स्त्रिया अनैतिक संबंध ठेवतात कारण ते घरगुती कामात भाग घेत नाहीत आणि अशाच संख्येने स्त्रिया विश्वासघातकी ठरल्या कारण त्यांचे लग्न नीरस झाले होते, एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ग्लीडेनने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.
Mirror.co.uk ने तयार केलेल्या यादि नुसार अव्वल स्थानावर असणारे ५६ टक्के अनैतिक संबंध हे थायलंड या देशात नोंदविले गेले आहेत.
Match.com च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की पाचपैकी एका विवाहित पुरुषाचे किमान 10 महिलांशी प्रेमसंबंध होते – स्त्रियांमधील दर सात पटीने जास्त आहे.
फ्रान्स ने तयार केलेले gleeden हे extra marrital dating ॲप भारतात २०१७ साला मध्ये आलें .या app नुसार भारतात ५६ टक्के स्त्रियांचे अनैतिक संबंध आहेत.
Finland मध्ये ३६. % स्त्री आणि पुरुष यांच्यातील अनैतिक संबंध किंवा संपर्कांना ‘समांतर नातेसंबंध’ parallel relationship असे म्हणतात आणि थोडासा बाजूला राहिल्यास समाज तुलनेने मुक्त मनाचा असतो. म्हणजेच open minded असतो.
आणि बहुतेक लोक त्यांचे काम झाले संपले इतर कोणाच्या मध्ये त्यांना काही इंटरेस्ट नसतो. आणि म्हणूनच जगातला सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जातो .
फ्रान्स ४३ टक्के. फ्रान्स हा एकमेव देश आहे ज्यात बहुतेक लोक व्यवहार , अनैतिक संबंध हे नैतिकदृष्ट्या morally स्वीकारार्ह असल्याचे मानतात आणि केवळ 28 टक्के व्यभिचारींनी सांगितले की त्यांना त्यांच्या प्रकरणांबद्दल खेद वाटतो.
तर UK मध्ये ही ३६ टक्के आहे. साधारण युरोप मध्ये हे प्रमाण ४० ते ४६ टक्के पर्यंत आहे.
आता भारत देशातील १० पैकी ७ स्त्रियांचे अनैतिक संबंध.. एका ऑनलाईन ॲपचा सर्व्हे आहे. साधारण ३४ ते ४९ वर्ष याकाळात स्त्री बहुदा आपला नवरा सोडून पर पुरुषाकडे किंवा जो परिचित असेल त्याच्याकडे आकर्षित होते. काय बरे कारणे असतील याची. :
१. भारतीय संस्कृती : –
भारतीय संस्कृती , आणि पुरुष प्रधान संस्कृती यामुळे बरेचदा स्त्रीचे मत विचारात घेतले जात नाही. आणि बरेचदा घरचे , वडीलधारी मंडळी जिथे लग्न ठरवतील तिथे इच्छा असो वा नसो स्त्रीवर ते थोपविले जाते. तेव्हा स्त्री नाईलाजाने ते लग्न स्वीकारते. तिच्या सर्व जबाबदाऱ्या , कर्तव्य पार पाडते. पण मनापासून खरेच तिला जर ते लग्न मान्य नसेल तर सर्व कर्तव्य झाल्यावर स्त्री स्वतच्या सुखाचा शोध घेवू लागते.
आणि भावनिकदृष्ट्या तिला समजून घेणारा पुरुष संपर्कात आला तर तिला कायम complement देणारा, प्रोत्साहन देणारा , समजून घेणारा, तिची तारीफ करणारा पुरुष असेल , तिला वेळ देणारा , तिची आपुलकीने विचारपूस करणारा पुरुष असेल तर स्त्री साहजिकच त्याच्याकडे आकर्षित होते. आणि हे वय असे असते की भावनिक गुंतागुंत झाली की साहजिकच शारीरिक गुंतवणूक ही होतेच.
आणि एकदा शारीरिक संबंध निर्माण झाले की जर ते खरेच मनाप्रमाणे आणि सुखकारक असतील तर ते परत परत पाहिजे असते.
२. पुरुषप्रधान संस्कृती : –
बरेचवेळा पुरुष प्रधान संस्कृती मुळे पुरुष हा स्त्रीवर वर्चस्व गाजवत असतो. स्त्री चे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाही. तिला समजून घेणे तर दूरच केवळ त्याच्या गरजा आणि गोष्टी तिने करणे एवढंच त्या स्त्रीचे विश्व. सतत घर , चूल , मुल यातच अडकून पडायच तिने.
तिच्या मनाप्रमाणे जरा काही वागायला लागली की वाद , भांडणे , मग कधी मारहाण. सततच्या या जाचाला , पुरुषी वर्चस्व , आणि कायम सहन करत राहणे याला स्त्री वैतागते. यातून कधीं एकदा सुटका मिळेल असेही होते. त्यामुळे ही स्त्री तिला संमजून घेणाऱ्या , तिचे ऐकणाऱ्या पुरुषांकडे आकर्षित होते. आणि अर्थात शारीरिक समाधान , सुख देणाऱ्या ही.
३. स्त्रीचे कौतुक करणारे ,तिचे सौंदर्य, गुण , तिचे ड्रेस , साडी , केस , बांधा याची तारीफ करणारे जास्त पुरुष आकर्षित करतात. कारण काय की बरेचदा नवरा हा रोजच बायकोला पाहत असल्यामुळे तिच्यात काही फारसे नवीन त्याला दिसत नाही. आणि रोज काय तिला छान , सुंदर म्हणून तारीफ करायची असे विचार करणारे ही नवरे असतात. किंवा नंतर कर्तव्य , जबाबदाऱ्या, नोकरी , व्यवसाय , मुले यात पुरुष एव्हढे गुंतून पडतात की ते बायकोला वेळ देवू शकत नाहीत. आणि तिची तारीफ तर दूरच.
तिने स्वैपाक ही काही वेगळा केला असेल. चविष्ट पदार्थ तर सुरुवातीला तो छान म्हणेल , रोज तेच झाले की तो ते विसरून ही जाईल की यालाच कधी छान म्हणले होते आपण.आणि स्त्री उगीच अपेक्षा ठेवत राहील.
यातून जो स्त्री ची नेहमी तारीफ करतो .तिला वाह असे शब्दातून , भावना , नजर यातून पावती देतो ती स्त्री नक्कीच त्या पुरुषाच्या प्रेमातच पडते.
४. इति कर्तव्यता संपलेली असते. थोडा स्वतः साठी वेळ काढू शकते आणि विचार ही करू शकते –
इतके वर्ष स्त्री सगळे वडीलधारी , घरच्यांनी ठरवून केलेले लग्न या सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून पार पाडते. आणि जेव्हा मुले मोठी होवू लागतात तेव्हा जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यातून थोडी मोकळीक मिळते, सुटका होते. मुलांचं करणे ,त्यांचे अभ्यास घेणे, वेळेत शाळेत पाठविणे, classes , मित्र मैत्रिणी ,. खाणे पिणे सांभाळणे यातून थोडी सुटका होते. मुले मोठी होवू लागतात तशी त्यांची ती अनेक गोष्टी करू लागतात.
मग स्त्री थोडी मोकळी होते. तिच्या मित्र मैत्रिणी यांना भेटणे , बोलणे , फिरायला जाणे, ट्रीप या गोष्टी करिता वेळ देवू शकते..
या खेरीज आता पर्यंत काही गोष्टी मनाविरुद्ध केल्या असतात. मग आता थोडे आपल्या मनाप्रमाणे जगूया. ज्या गोष्टी आवडतात त्या करूया. ज्या गोष्टींचे आनंद घेता आले नाहीत ते मिळवू असे विचार सुरू होतात. आपण आपले आयुष्य जगले च नाही असे वाटून आपल्या मना प्रमाणे वागू लागतात. बरं इतके वर्ष त्यांनी सगळे घर आणि घरच्या लोकांच्या करिता केले असते.याची जाणीव त्यांना ही थोडी फार असते.
त्यामुळे आता थोडे फ्रीडम ती घेते.घेवू देत. तिला थोडी तिची स्पेस मिळू दे असेही विचार घरातले करतात.
त्यामुळे एव्हढे वर्षानंतर स्त्री असा पर पुरुषाचा विचार करेल असे विचार घरात कोणाच्या मनात येत पण नाहीत.
पण स्त्री..बायको तिला आता इतके वर्षानंतर समजत असते नक्की काय पाहिजे तिला. मग भावनिक , शारीरिक आणि आर्थिक , उत्साही ,तिला भरभरून आनंद देण्याची इच्छा असेल अशी साथ असेल तर ती स्त्री साहजिकच नवरा सोडून एकतर आधीचा परिचित, मित्र किंवा प्रियकर किंवा मग नवीन ओळख झालेला , पण माहिती मधला अशा पुरुषाकडे सहजच आकर्षित होवून त्याच्या सोबत अधिकाअधिक वेळ घालविण्याचा प्रयत्न करते. मग फोन वर संवाद , भेटणे , फिरायला जाणे , शारीरिक संबंध या सर्व गोष्टी ती आनंदाने आणि आतुरतेने करते.
जे जे राहिले करायचे ते करण्याचा आनंद ती मिळवत असते. मग शारीरिक संबंध ही असोत किंवा मोकेळे पणाने भटकंती असो.
काही वेळेस स्त्रियांना , बायकोला आपल्या पती मधील उणिवा समजल्या असतात. पण केवळ समाज , घरचे , नातेवाईक काय म्हणतील म्हणून गप्प बसून बायको सहन करते. पण ही सहनशक्ती कधी तरी संपते. आणि आपल्याला काय पाहिजे याची चांगलीच जाणीव झालेली असते. ती पूर्ण करण्याकरिता स्त्री प्रयत्न करते ..मग तेव्हा ती नवरा , लग्न , मुले , संसार हे सगळे विसरून केवळ स्वतः चे आनंद, सुख यांचा विचार करते. आणि त्या गोष्टी मिळविण्यासाठी धडपडते.
५. होमो sexual : आपल्या सर्वांना hetro sexual ही कॉन्सेप्ट माहिती आहे. म्हणजे opposite gender .. स्त्री पुरुष आकर्षण आणि लग्न.
होमो सेक्स म्हणजे समान लिंगी व्यक्ती सोबत सेक्स ही कल्पना ही कोणी करत नसताना ती एखाद्या स्त्रीची गरज असेल. पुरुषांची ही असते. तरी आपल्या इथे अजून ही कॉन्सेप्ट accept केली गेली नाही त्यामुळे लग्न हे दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती मध्ये केले जाते. त्यांच्या गरजा काय हे समजून ही घेतले जात नाही. पण कालांतराने त्या लग्नाला किंवा नात्याला तेवढे निभावले जात नाही. आणि होमो सेक्स नात्याला प्राधान्य दिले जाते.
हे सुधा अनैतिक सबंध च मानले आहेत.
६. पुरुष हा स्त्रीला फसवून , गोड बोलून किंवा कोणते आमिष दाखवून, तर कधी तिचे विक पॉइंट ओळखून बरोबर त्यानुसार वागतो. आणि तिला खोटी आशा दाखवून , तर कधी जबरदस्ती करून ते ही त्याच्या सोबत संबंध ठेवण्यास भाग पाडतो. इथे स्त्री ही निर्दोष असून ही समाज तिलाच दोषी ठरवतो. तर कधी काही समजण्याच्या आत , किंवा तो समोरचा पुरुष खरेच कसा आहे हे समजून घेण्याच्या आत तो पुरुष स्त्री चा फायदा घेतो . मात्र स्त्री हीच कारणीभूत आणि दोषी ठरते यात.
भारतात अशी अनेक कारणे आहेत जसे अल्प वयीन मुलींची लग्ने , जबरदस्तीने लग्न , वडीलधारी मंडळींचा शेवटचा निर्णय. पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तरी जसे असेल तसे बायकोने राहायचे ही जबरदस्ती , स्त्री ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल आणि अशी इतर अनेक कारणे , सासुरवास असेल ज्यातून स्त्री वर अन्याय होत असतो. हा अन्याय अती झाला असे जेव्हा स्त्रीला वाटते. किंवा असा कोणताही अन्याय नसेल पण स्त्री ला तिचे स्वतंत्र अस्तित्व जपायचे असते. तिच्या मनाप्रमाणे जगायचे असते. तिला आवडेल असा पुरुष साथ पाहिजे अशी अपेक्षा असते. तेव्हा ती कायदा , समाज , नातेवाईक , नवरा या कोणाचे विचार ही न करता स्वतच्या मनाप्रमाणे जगते. आणि मग हाच समाज , नातेवाईक , नवरा त्याला अनैतिक संबंध असे लेबल लावून रिकामे होतात.
सर्व गुणसंपन्न कोणी नसते. पण थोडे फार विचार , आचार , आवडी निवडी जमणाऱ्या जोड्या , भावनिक आणि शारीरिक, भौतिक गरजा समजणाऱ्या , समजून घेणाऱ्या आणि आनंद मिळविणाऱ्या, प्रेमाने बोलणाऱ्या , सुसंवाद साधणाऱ्या जोड्या तसेच आर्थिक दृष्टया एकमेकाला support करणाऱ्या जोड्या सहसा एकमेकाला सोडून जात नाहीत.
देशातील १० पैकी ७ स्त्रियांचे अनैतिक संबंध.. एका ऑनलाईन ॲपचा सर्व्हे, खरंच असेल तरी ही कृपया त्या मागची कारणे समजून घ्या . ती घेतली तर स्त्रीला दोष नक्कीच देणार नाही.
स्त्रीला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मनाप्रमाणे जोडीदार निवडणे , जर सगळे काही सुख , समाधान , शांतता , भावना देवाण घेवाण , आपुलकी ,ओढ ,प्रेम , आदर , आर्थिक स्थैर्य , मानसिक स्थैर्य ,समजूतदारपणा, सगळ्यात महत्वाचे स्त्रीला सर्व दृष्टीने secure feel होणे, आणि आपला नवरा हा कायम आपलाच आहे याची खात्री मिळणे . आणि तिच्या शारीरिक गरजा लक्षात घेवून तसे सुख समाधान देणारे , या सर्व गोष्टी जोडीदार म्हणून पुरुषाला पूर्ण करता आल्या तर स्त्री ही कायम एकनिष्ठ राहील याची खात्री प्रत्येक स्त्री देवू शकेल.
अर्थात काही अशा ही स्त्रिया आहेत ज्या रोज एका नवीन पुरुषाच्या मागे असतात. रोज नव्या ओळखी , मैत्री मधून ओळखी वाढवून पुढे संबंध प्रस्थापित करणाऱ्या असतात. त्यांची एक तर शरीराची भूक जास्त असेल , किंवा त्यांना सतत नावीन्य पाहिजे असेल. किंवा काही श्रीमंत घराण्यातल्या बायका त्यांचे पती वेळ देत नसल्याने असे काही नावीन्य रोज शोधत असतील .त्यात त्यांना वेगळे काहीच वाटत नाही. तर त्या ज्या स्टँडर्ड मध्ये राहतात तिथे या गोष्टी घडतच असतात.
पण असा स्त्री वर्ग ही वेगळा आहे.
सर्वसामान्य स्त्री बाबत विचार केला तर वरील मुद्द्यांचा नक्की विचार करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

परफेक्ट विश्लेषण
खूप खूप वास्तविकता या लेखात आहे असेच लेख देत रहा 👌👍
खूपच छान आहे।
अगदी बरोबर आहे