प्रिय व्यक्तीच्या विरहामुळे, आठवणीमुळे सारखं रडू येत असेल तर त्यातून बाहेर कसे पडावे?
मयुरी महाजन
आपण सर्व माणूस म्हणून जन्माला आलो, त्यामध्येचं आपण भावभावनांचा संच आहोत ,हे पक्कं, माणूस हा भावनांचा पुतळा आहे, ज्या त्या वेळेला जी -ती भावना प्रकट होतेच ,आता ते व्यक्ती परत्वे ठरत जाते, तसेच त्या भावनांना व्यक्ती परत्वेही महत्त्व असलेले बघायला मिळते, परंतु व्यक्तीपरत्वे ते त्या त्या पद्धतीनेही किंवा त्या त्या परिस्थितीने सुद्धा ते व्यक्त होत असते ,काही व्यक्तींमध्ये भावनाच नाहीत ,असे बऱ्याच वेळेला म्हटले जाते, परंतु एक सत्य हे सुद्धा आहे ,कुणीही व्यक्ती भावनांशिवाय जगू शकत नाही, मग ती आनंदाची असो ,रागाची प्रेमाची ,किंवा इतरही ,हा काहींच्या बाबतीत त्यांनी आपल्या भावना मारून टाकलेल्या असतात असं ते म्हणतात, परंतु भावना कधीही मारता येत नाही, त्यावरती कंट्रोल करता येते, हे नक्की…
आपण त्याला बोथट झालेल्या भावना म्हणू शकतो, माणसाच्या आयुष्याची सुरुवातच भावनांच्या एका जाळ्यातून झालेली आहे, आणि त्याच भावना आपल्याला आयुष्यभर प्रत्येक बरे वाईट प्रसंगात अनुभवायला मिळतात, फरक फक्त इतकाच असतो की परिस्थितीच्या घातलेल्या घावांनी काही भावना मजबूत झालेल्या असतात ,
आपल्या आयुष्यात जर भावनाच नसत्या तर कोणीच आपले नातेवाईक, मित्रपरिवार व सखे सोयरे असे काही नात्यांचे गुंफण झालेच नसते, त्यामुळेच कुणीतरी आपलं आहे, भावना जुळल्या मन जुळली प्रेम जुळले, हा फक्त भावनांचा खेळ आहे, परंतु या सर्वांमध्ये कुणाच्यातरी मनात आपल्याविषयी निष्पाप व शुद्ध अंतकरणाने जी भावना असेल ,ते ओळखणे गरजेचे आहे ,नाहीतर आयुष्यात कितीतरी माणसे भेटतात ,पण काहींसोबतचं मनाचे तार जोडले जातात,
जर आपल्याला प्रिय व्यक्तीच्या विरहामुळे आठवणींमुळे रडू येत असेल, तर याचा अर्थ आपली त्या व्यक्तीप्रती खूप शुद्ध भावना आहे, आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीचे स्थान खूप मोलाचे आहे, पण सारखं सारखं जर आपण याच भावनेत अडकून राहिलो ,तर ते आपल्यासाठीच एक समस्या होऊ शकते ,त्यामुळे त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे, आता त्यासाठी आपण काय करायला हवे ,
सर्वप्रथम आपण आपल्या भावनांचा अभ्यास करायला हवा, म्हणजे ते कसं तर ,आपण नेमके भावनिक आहोत, की खूपच प्रॅक्टिकली पण आहोत ,आणि प्रिय व्यक्तीचा विरह आठवण आपल्याला जर रडून काढावी लागत असेल, तर आपल्याला काहीतरी गमवण्याची भीतीही आहे ,कुणीही व्यक्तीला आपली प्रिय व्यक्ती कायम आपल्या जवळच असावी असंच वाटतं, परंतु प्रत्येक वेळेस काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतीलच असे नाही, त्यासाठी आपण ज्या कोणत्या परिस्थितीतून जात असणार, त्या परिस्थितीच्या मागे नक्कीच काहीतरी कारणे असतातच….
जसे की मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवतो, तसेच आयुष्यात काही व्यक्ती या खूपच मौल्यवान असतात ,त्यामुळे आपल्याला त्या जपून ठेवाव्याशा वाटतात, कारण जे मौल्यवान असतं त्याला जपावचं लागतं, त्यासाठी आपण लक्षात घ्यायला हवे ,की आपली भावना ही सर्वात मौल्यवान आहे, त्याचे मोल होत नसते, प्रिय व्यक्तीचा विरह आणि आठवण हाच विषय जर आपण घोडत राहिलो, तर आपल्याला त्याच त्याच विषयाने रडूच येत राहणार, आपण ज्या विषयाला जितका चघडणार ,तो तितकाच जास्त मोठा होत जातो, म्हणून त्यासाठी आपण कुणाचेही संपूर्णता होण्याअगोदर ,आपण स्वतःसाठी सुद्धा एक व्यक्ती आहोत ,आपण त्याला स्वीकारायला हवं, आपल्या ज्या प्रकारे दुसऱ्यांप्रति भावना असतात ,त्याच प्रकारे आपल्या आपल्या स्वतः प्रति सुद्धा काहीतरी भावना आहेत, त्या भावनांशी आपली ओळख परिपूर्णतेने व्हायला हवी ,
बघा कधी कधी आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल खूप काही बोलू शकतो ,परंतु स्वतःबद्दल बोलण्याची वेळ आली, तर आपण गप्प बसतो ,किंवा माझ्याबद्दल मी काय सांगायचं असा प्रश्न पडतो?? त्यासाठी आपल्याला आपणच सावरू शकतो, मग ते रडू असो ,किंवा कुठल्याही परिस्थितीचा झालेला घात असो, वेळ लागेल, पण नक्की आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेलं….
कारण भावना नियंत्रणात ठेवणे वाटते तितके सोपे नाही, परंतु रोज जर तुम्ही साधना करत असाल, तर रोजची आपली साधना आपल्याला नक्कीच आपल्या हातात आपली सूत्र दिल्या शिवाय राहत नाही, मग त्यात तुम्ही स्वतःला कामात गुंतवा ,छंद जोपासा ,मेडिटेशन करा ,योगा करा ,काहीही जे आपल्याला आवडते ,तेआपण करू शकतो, फक्त ती साधना असायला हवी, स्वतः सोबतची एकांतातीलं…….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Average
Nice
खुप छान, आणि एक सत्यता
Nice