समजूतदार पार्टनर भेटला तर ठीक नाहीतर शेवटपर्यंत compromise करावं लागतं.
हर्षदा पिंपळे
क्या खूब रब ने किया
बिन मांगे इतना दिया
वरना है मिलता कहाँ
हम काफिरों को ख़ुदा …
काहीसं याच गाण्यासारखं आपलं आयुष्य असतं.कधी कधी आयुष्यात न मागताही सगळं काही चांगलं आपल्या आयुष्यात येतं.पण कधी कधी कितीही धावा केला तरी काही गोष्टी लवकर मिळत नाही किंवा त्या मिळतही नाही. आयुष्याच्या जोडीदाराचही तसच आहे. आयुष्याचा जोडीदार हा कधी कधी इतका सहज सुंदर असतो तर कधी कधी तोच जोडीदार त्याच्या अगदी विरुद्धही असतो.सहज सुंदर मनाला भावनारा जोडीदार कुणाला नकोसा असेल…? आणि सतत कुरबुरी करणारा जोडीदार तरी कुणाला हवा असेल…?
आयुष्याच्या इतर वळणांप्रमाणेच लाइफ पार्टनर सुद्धा एक आहे. मला समजून घेणारा ,माझी काळजी घेणारा,मला सपोर्ट करणारा जोडीदार हवा असं प्रत्येकाला वाटतं.पण आपल्याला कुणीतरी समजून घ्यावं हे जर आपल्याला कळत असेल तर आपणही समोरच्याला समजून घ्यावं हेही आपल्याला कळायलाच हवं.कारण आपल्यात काहीतरी उणीव असू शकते हे बऱ्याचदा आपण मान्यच करत नाही. नेहमी दुसऱ्याकडून एक्स्ट्रीम लेवलच्या अपेक्षा ठेवतो.जोडीदाराकडून अपेक्षा ठेवणं चुकीच आहे असं बिलकूल नाही.पण आपण अपेक्षा ठेवताना आपण स्वतःही जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो का याचा विचारही करणं आवश्यक आहे.
आता प्रत्येक जोडीदाराची अपेक्षा असते की आपल्याला समजूतदार पार्टनर मिळावा. मिळाला तर नक्कीच ती आनंदाची गोष्ट असते.पण जोडीदाराच्या पलिकडे जाऊन विचार केला तर प्रत्येक जण हा आधी एक मनुष्य असतो.आणि प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.कुणाला समजून घेणं जमतं तर कुणाला ते जमत नाही. कुणाला सहजपणे compromise करायला जमतं तर कुणाला ते जमत नाही आहे आणि कुणी जमवूनही घेत नाही. सातत्याने compromise करणं आणि कधीतरी compromise करणं यामध्ये खूप फरक पडतो.compromise करायचच नाही असं नाही. पण त्याला काही मर्यादा हवी. नातं टिकवण्यासाठी एखादा जोडीदार समजून घेणारा हवा यात शंका नाही. पण वेळ पडली तर कॉम्प्रोमाईज् करणही जमायला हवं.पण एखादा जोडीदार सातत्याने समजून घेतोय,कॉम्प्रोमाईस् करतोय म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये.उस गोड लागला की मूळासकट खाऊ नये असं म्हणतात. हे अगदी तसच आहे.
आता कित्येकजण म्हणतात की , समजून घेणारा पार्टनर नाही. कितीकाळ असं कॉम्प्रो करत जगायच…?आणि समजून घेणारा पार्टनर असेन तर ठीक आहे नाहीतर शेवटपर्यंत कॉम्प्रोमाईजच करावं लागतं. आता किती खरं आहे…..????
खरं तर दोन्ही वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या की थोडंफार इकडच तिकडं होणारच नं…?आणि शेवटी समजून घेणं,कॉम्प्रोमाईस् करणं हे त्या दोघांवर डिपेन्ड करतं.समजून घेतल्याशिवाय नाती टिकूच शकत नाही. त्यामुळे समजून घेणं आवश्यक असतं.मान्य आहे सतत कॉम्प्रोमाईस् करणं जमत नाही पण कधी कधी कॉम्प्रोमाईस् करणं गरजेच असतं.त्यामुळे कधी आणि कुठे समजून घ्यायच,कधी कॉम्प्रोमाईस् करायच हे जाणून घेणं गरजेचं आहे. सातत्याने तुम्हाला वाटत असेल की आपला पार्टनर समजून घेत नाही, त्याच्यामुळे सारखं सारखं कुठे ना कुठे मलाच कॉम्प्रोमाईस् करावं लागतय तर अशा वेळी जोडीदाराला याची जाणीव करून देणं आपलच काम असतं.आपली व्यक्ती चुकतेय तर तिला वाट दाखवणं आपलं काम असतं.आणि एकदा का जाणीवा समृद्ध झाल्या तर कसलीच उणीव राहत नाही. समोरच्याला हळुहळू का होईना जाणीव होऊ लागते.नातं टिकवण्यासाठी खरा जोडीदार नक्कीच प्रयत्न करतो.आणि समजून घेणारा पार्टनर असेल तर तो निश्चितच कधीतरी जोडीदाराच्या सुखासाठी समजून घेतो.थोडं कॉम्प्रोमाईस् त्यालाही करावच लागतं.पण नेहमीच त्याला गृहीत धरणं अत्यंत चुकीच आहे.अशावेळी गृहीत धरू नका.नाहीतर अशा पार्टनर ला गमावण्याची वेळ केव्हाही येऊ शकते.त्यापेक्षा समजून घेणारा पार्टनर असेल तर तुम्हीही थोडं समजून घ्या.याने दोघांच आयुष्य सुरळीत होणार असतं.
आणि जर नसेलच समजून घेणारा पार्टनर तर….सतत कॉम्प्रोमाईस् करायच की समोरच्याला त्याची जाणीव करून द्यायची हे आधी ठरवून घ्यायला हवं. कारण सतत सगळ्याच गोष्टी कॉम्प्रो करायच्या झाल्या तर मनात थोडी खदखद तर जाणवणारच. आपल्याला तो/ती कधीच समजून घेत नाहीये याचं दुःख वाटणारच.म्हणून सतत दुःखीकष्टी रहाण्यापेक्षा जोडीदाराला जाणीव करून द्यायला विसरु नका.मी करतेय /करतोय थोडं…थोडं तुही करून पहा नं….असं म्हणून नातं टिकवायला शिका.असं केल्याने एकट्यावरच कॉम्प्रो करायची वेळ येणार नाही.
जुन्या रूढीच्या पिंपळावर,
आजचं पान ताजं..
थोडं तुझं थोडं माझं
दिवस माझा तुझी रात्र
नाव तुझं तरी माझं गोत्र
नात्याला ती नकोत शास्त्र
नको परंपरेचं ओझं
थोडं तुझं थोडं माझं …
तू आणि मी नाण्याचा बाजू दोन
प्रेम आपलं म्हणजे समद्वीभुज त्रिकोण
ना कुणी जास्त ना कमी कोण
एकत्र संसाराला भिन्नतेचा साजं
थोडं तुझं थोडं माझं …
(कवी-अभिजित गुरू)
ही सुंदर कविता आणि त्यातील अर्थ समजून घ्या.थोडं तुझं-थोडं माझं असच असतं हे नातं.दोघांनी समजून घेतलं तर शेवटपर्यंत सातत्याने एकालाच कॉम्प्रोमाइझ् करण्याची वेळ सहसा येत नाही.
पहा…थोडं तुझं-माझं करून पहा….नातं नव्याने समजून घ्यायची एक संधी नक्कीच मिळेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khupch chhan… Ani jiwnat sadhya khup garjecha