नवरा बायकोचं नातं उत्तम व्हावं म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या.
मिनल वरपे
कोणतंही नातं असो आणि खास करून नवरा बायकोचं ते कायमस्वरूपी उत्तम राहावं म्हणून सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे त्या दोघांमधील असलेला संवाद..
आता संवाद म्हणजे नक्की काय हे सुद्धा कळण तेवढच गरजेचं आहे कारण संवाद म्हणजे वरवर दिसणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगणे असा काहींचा गैरसमज असतो… फक्त मला काय हवंय.. मला काय आवडते.. मला कशातून आनंद मिळतो.. मला कोणत्या गोष्टी नाही आवडत हे आपल्या जोडीदाराला सांगणे म्हणजे संवाद नसतो…
अर्थात हे सर्व तर सहज सांगितलं जाते… पण संवाद हा समोरच्याला सतत सांगण्यापेक्षा समोरच्याच ऐकून ते समजण्यातून सुद्धा होतो…
पूर्वी ना मोबाईल होता ना दुसरं अस कोणतं साधन ज्याने सहज एकमेकांशी संपर्क साधता येईल.. पत्र पाठवत जरी असतील तरी त्यालासुद्धा वेळ लागायचा.. आणि हो पत्रात आजसारखी प्रत्येक मिनट ची माहिती देता येत नव्हती..
तरीसुद्धा इतके सुंदर संसार सुरू असायचे.. नाही कोणते गैरसमज आणि नकोतो गोंधळ नसायचा.. कारण शब्दाने नसला तरी मनाचा मनाशी सुरेख संवाद असायचा..
आता आपण सहज म्हणू.. या जुन्या गोष्टी पण आजच्या काळात सुद्धा असाच संवाद पाहायला मिळेल तो आई मुलांमधे.. आईला प्रत्येक गोष्ट सांगितली तरच कळते असे नसते ती बऱ्याच गोष्टी न सांगता समजून घेते.. मोठ झाल्यावर तर बोलणं होतेच पण बाळ असताना न बोलता प्रत्येक आईला आपल्या मुलाचं सार काही कळते आणि यालाच खरा संवाद म्हणतात..
जिथे प्रत्येक क्षणाला कारण.. स्पष्टीकरण.. प्रश्न.. उत्तर नाही तर शांत राहून सुद्धा न बोलता समोरच्याच्या मनातल ओळखून समजून घेतलं जाते तो खरा संवाद…
हल्ली लग्न जमत नाही तर एकमेकांशी तासन तास फोनवर बोललं जाते… प्रेम विवाह मधे तर एकमेकांचे मन आणि विचार तर आधीच जुळलेले असतात पण तरीसुद्धा लग्न झालं की वादाच्या ठिणग्या उडायला अगदी क्षुल्लक कारण सुद्धा कमी पडते…. कारण वरचेवर गप्पा .. वरचेवर संवाद हा असाच असतो अगदी पोकळ…
जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी खरा संवाद साधतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या भावना.. त्या व्यक्तीच्या अपेक्षा.. तिचा स्वभाव.. त्या व्यक्तीचं वागणं हे सर्व जाणून असतो आणि त्यामुळेच कुठेही आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यात कमी पडत नाही ..
तू हेच का केलंस.. तू असाच का वागलास.. तू अशीच का बोलतेस या प्रकारच्या तक्रारी ज्या मोठ्या वादाला कारणीभूत ठरतील अशा तक्रारी उद्भवणारच नाहीत.. कारण समोरचा का आणि कशासाठी बोलतोय.. समोरची व्यक्ती कोणत्या भावनेतून बोलतेय.. कोणत्या परिस्थितीतून बोलतेय याची जाणीव असल्याने राग.. वैताग.. चिडचिड याला संधीच मिळत नाही…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

फारच प्रगल्भ विचार आहेत, अत्युत्कृष्ट,👍
हा लेख अगदीच छान व तंतोतंत सत्य सांगणारा वाटला .
असे च
लिखाण आपल्या हातून व्हावे. हीच. सदिच्छा.
🙏🙏
Khup chan
Very nice. It explained in true sense how the conversation between two should be.