
विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज!!!
भारतीय संस्कृतीत लग्न हा विषय अतिशय महत्वचा मानला जातो. बदलत्याकाळानूसार मुला- मुलींच्या अपेक्षा देखील बदलत चालल्या आहेत. पूर्वीसारखा लग्न हा विषय फक्त पालकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता मुले आणि मुलीही खुप मोठ्या प्रमाणावर जागरूक झालेले दिसतात. पूर्वी लग्ना बद्दलचा गोष्ट आई – वडिलच ठरवत असत.
आता बदलत्या काळानूसार मुले – मुली स्वतंत्रपणे बाहेर भेटतात. आपल्या विचारांची देवाण- घेवाण करतात. एकमेकांबद्दलाच्याअपेक्षा, आवडी- निवडी, भविष्याचे नियोजन यावर चर्चा केली जाते. हे अगदी महत्वाचे आहे परंतु त्याबरोबरच सध्या मुले/मुली उच्चशिक्षित, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, स्वतःला सिध्द करण्याची धडपड, अतिअपेक्षा यामुळे लग्नाच्या मुद्द्यावर काहीतरी बिनसतय असे दिसून येत आहे. आता मनुश्री व तिच्या कुटुंबाची गोष्ट एेकण्यासारखी आहे.
२९ वर्षाची मनुश्री एम्. कॉम असून एका बँकेत उत्तम पगाराची नोकरी करते. आता तिचे आई – वडील तिच्यासाठी वरसंशोधन करत आहेत. तिने सुरूवातीला माझ्या नवऱ्याबद्द्लच्या अपेक्षा काय आहेत हे संगीतले. मुलाचे वार्षिक उत्पन्न ८-१० लाखाच्या पुढे हवे, मी रहात असलेल्या शहरातलाच हवा, स्वतःचे घर त्याच्या नावावर हवे, अमुक एका क्षेत्रातलाच हवा, स्वतःची चार चाकी हवी ह्या सर्व अपेक्षा मनुश्रीच्या तर तिच्या आई – वडिलांचा अपेक्षा वेगळयाच. माझ्या मुलीला तिला हव तस आयुष्य जगू देणार, तिच्या आयुष्यात ढवळा ढवळ न करणारा, तिला हवे तसे कपडे घालु देणारा, आई – वडील बहीण – भाऊ यांची जबाबदारी नसलेला, एकत्र कुटुंबातील नको, वयातील अंतर अमुक एवढेच हवे, परदेशात असेल तर उत्तम, व्यावसाय नको.
हे झाल मुलींच्या बाबतित पण मुलांच्या बाबतित ही मुलांच्या व त्याच्या आई – वडिलांचा अपेक्षा फार वेगळ्या आहेत अस नाही.
३१ वर्षाचा अमोल एम्. बी. बी. एस्. एम्. डी झाला. स्वतःच घर घेतल, गाडी घेतली, दवाखाना उभा केला, आता आई – वडिलांनी त्याचासाठी वधुसंशोधन सुरू केल. अमोलने त्याच्या बायको बद्दलच्या अपेक्षा सांगितल्या मुलगी कर्त्यव्यदक्ष हवी, माझ्या आई – वडिलांना सांभाळणारी व शक्यतो डॉक्टर असावी, तिने तिची प्रॅक्टिस करावी पण वेळ आली तर तिने प्रॅक्टिस थांबवून घर व मुले यांना प्राधान्य द्यावे तर आई – वडिलांचा अपेक्षा वेगळयाच.तिने तिचे करीअर करावे पण सणवार समारंभ यांचीही सांगाड घालावी, घरात येणाऱ्या पाहुण्याच्या पाहुणचार ही करावा. आम्ही जपलेली माणसे / पाहुणे जपावेत.
आज स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करत आहेत त्याचा अभिमान ही आहे आणि तो असायलाच हवा. या बद्दल दुमत नाही. परंतु मुलापेक्षा मुलीला पगार जास्त आहे म्हणून नकार देणारे ही आहेत समजा एखाद्या मुलीला मुलापेक्षा पगार जास्त असला तर काय फरक पाडतो? परंतु मुलीला पगार जास्त असेल तर घरात तिचे वर्चस्व राहील आणि मुलाचा पुरुषी अहंकार दुखावेल, लोक / समाज काय म्हणेल असे बुरसटलेले विचार आजही २१ व्या शतकात या विचारांशी आपली नाळ इतकी घट्ट जोडली आहे की, २०२० ल ला देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणारे आपणच का असा प्रश्न पडतो?
आज आपण २१ व्या शतका कडे वाटचाल करीत असलो तरी भावनिक आणि वैचारिक दृष्ट्या आपण मागे आहोत हे मान्य करायला हवे. कारण मनुश्रीचे वय ३२ व अमोलचे वय ३५ झाले तरी दोघांचेही अजून लग्न जमलेले नाही कारण ती दोघे व त्यांचे कुटुंबिय तडजोड करायला तयार नाहीत. कारण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होण्यासाठी आयुष्याशी दोन हात करण्याची त्यांची तयारी नसते कारण सगळे कसे मनासारखे आणि लगेच हवे असते.
वास्तविक मुलामुलींच्या आई – वडिलांची ही जबाबदारी आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट संघर्षातून मिळते तेव्हाच त्याचे महत्व आणि गोडी कळते हे त्यांनी समजावून सांगायला हवे.
आज मात्र बाह्यरूपाला आणि अर्थिक परिस्थितीला अवाजवी महत्व दिले जाते. आयुष्यात जोडीदाराचा गुण – दोषां सह स्वीकार करणे महत्त्वाचे असते यासाठी विवाहपूर्व समुपदेशन अतिशय महत्वाचे आहे. आपण किंवा पालक अशा गोष्टींना फार महत्व देत नाही कारण आमच्या वेळी अशा गोष्टी कुठ होत्या आमची लग्न झालीच की आणि टिकली ही परंतु बदलत्या काळानूसार जर आपण आपली जीवनशैली बदलली, शिक्षणाचे महत्व समजून घेतले तर लग्नासारख्या अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा बाबतीत आपली विचारधारा बदलावयाची असेल तर विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे. काही लोकांची मानसिकता अशी आहे कि समुपदेशन म्हणजे फुकटचे सल्ले देण्याचे व्यासपीठ.
परंतु माझ्यातले गुण – अवगुण मला माहित असलेच पाहिजेत. दुसऱ्याचेच गुण – अवगुण पाहुण पसंत करणे किंवा नापसंत करणे कितपत योग्य आहे.
विवाहपूर्व समुपदेशनाचे फायदे, गरज, व महत्व पुढीलप्रमाणे-:
१) माझ्या स्वतःच्या गरजा काय? मी कोण आहे? तपाण्यासाठी
२) स्वतःची वैचारिक, सामाजिक, अर्थिक आणि कुटुंबाची पार्श्वभूमी ओळखण्यासाठी
३) माझ्या आवडी- निवडी काय आहेत, जोडीदार कसा हवा व जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा
४) मी कुठल्या मुद्द्यावर / विचारावर समोरच्याशी पटवून घेऊ शकतो
५) स्त्री – पुरुष समानता म्हणजे काय? त्यातील फरक जणून घेणे महत्वाचे ( नुसतीच अर्थिक समानता नाही)
६) लग्नापूर्वीचा आणि लग्नानंतरच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या
७) लग्न म्हणजे काय? त्यातील भावनिक बदल.
८) स्वप्न व वास्तविकता या दोन्ही मधला फरक. (TV व सिनेमातील जीवन आणि वास्तवातील जीवन यामध्ये खुप फरक आहे हे जाणून घेऊन सिनेमातील आयुष्य मनो रंजनासाठी आणि आपले वास्तवातील व भावनिक आहे.)
९) संसारातील कामाची विभागणी ( स्त्री- पुरुष भेदभाव न करता)
१०) निर्णय घेण्याची क्षमता व त्या वरील मते
११) नवरा – बायको म्हणून एकमेकांचा आदर राखणे
१२) नात्यांमधील विश्वसार्हता जपण्यासाठी
खरे तर लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आणि नव्याने फुलणारा संसार इतकी साधी सोपी गोष्ट आहे. परंतु आपण ती इतकी गुंतागुंतीची करून ठेवली आहे की नात्यातील भावनिकता सोडून इतर सर्व गोष्टींना अवाजवी महत्व आले आहे. पूर्वी एकत्र कुटुंब होती त्यामुळे जबाबदरीची विभागणी होत होती. आता मात्र विभक्त कुटुंबांमुळे लग्नानंतर सर्व जबाबदाऱ्या एकदम अंगावर पडतातव त्याचे ओझे वाटू लागते विवाहपूर्व समुपदेशनामुळे सर्व माहिती शास्त्रोक्त मिळण्यास मदत होईल व वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल.
online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.


कुलकर्णी सर
खूप छान लेख आहे ,आताच्या युगांत मुलगी -मुलगा किंवा दोघांच्या आई वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे मताप्रमाणे लग्न जुळने कठीण झाले आहे.
त्या करीत विवाहपूर्व समुपदेशन हा एक चांगला पर्याय आहे.????
मंदार तुझ्या लेख चा विचार करणे काळाची गरज आहे
हेच सत्य परिस्थिती आहे
हा लेख जेवढा मला जमेल तेवढ्या लोकांना शेर करेन आणि तू ही कर
Nice article. This is something new. Keep it up
Awesome thought bro….
Nice Article keep it up Mandar
Awesome ??
Mandaar first of congratulations! Its Very important article For everyone.
Thanks!!
Well said…..very true.
खुप छान लेख आहे.
खुप छान लेख…..
Well said…..
अधिकाधिक पैसे कमावण्याच्या नादात आणि आयुष्य सुधारण्याच्या चुकीच्या कल्पना मुळे आपण खर जगायलाच विसरत नाही चाललोय ना असा विचार करण्यास लेख प्रवृत्त करतो. तसेच आपलेच विचार आपले अडसर होऊ शकतात आणि त्यामुळेच एका समुपदेशनाची गरज आज सर्रास जाणवते.
Very nice,
Good article, keep it up
Keep It on Mandar, Nice Article
It’s awesome ?
It’s awesome….?
फारचं सुंदर लेख.
अप्रतिम, सुंदर लेख ?
Mandar it’s really good article. Keep it on..
खुपच छान, आई-वडीलांना समुपदेशनाची गरज आहे, हे आपल्या समाजाला नवीन आहे पण ते आवश्यक आहे. खुप छान लेख आहे. विचार करायला लावणारा आहे.
Mstch..????
मोरेश्वर कुलकर्णी, तुमचा लेख उत्तम आहे, यातील विचार ही काळाची गरज आहे. धन्यवाद