Skip to content

नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी असतात.

नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी असतात.


सोनाली जे.


आयुष्य सुखी , समाधानी , आनंदी , उत्साही , शांततापूर्ण , जावे असे प्रत्येकालाच वाटत असते.

आपली लाईफ लाईन जर बघितली तर ती सरळ कधी होते?  जेव्हा व्यक्तीचा जीव किंवा प्राण जातो. पण जिवंत असताना जर ECG बघितला तर सतत चढ उतार सुरू असतो. म्हणजेच ते जिवंतपणाचे लक्षण .

We don’t grow when things are easy; we grow when we face challenges.

खर तर आहे आपण जेव्हा गोष्टी सोप्या असतात तेव्हा आपण प्रगती करत नाही असे नाही पण मग ती विचारांची असो , प्रगल्भता असो किंवा शैक्षणिक , व्यावसायिक , कौटुंबिक कोणतीही प्रगती असो.  ; जेव्हा आपण आव्हानांचा सामना करतो तेव्हा आपण जास्त प्रगती  करतो .कारण चांगल्या वाईट अनुभवांचा प्रत्यय येत असतो.

जन्म आणि मृत्यू यांच्यामधला प्रवास , अंतर म्हणजे आयुष्य किंवा जीवन जगणे.. मग हे आयुष्य कसे जगायचे हे प्रत्येकाने ठरवायचे . कारण हा कालावधी कोणालाच किती आहे हे माहिती नाही. म्हणूनच प्रत्येकाने मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगावा आणि आपल्या सोबत इतरांनाही जगू द्यावा.

निरीक्षण , संशोधन आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन यातून बघितल्यास , नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी असतात.

आता कसे आहे या सगळ्या गोष्टी इंटर related आहेत.  कसे बघा जोडपी लग्ननानंतर एकत्र येतात. तोपर्यंत ती ज्या कुटुंबात जन्मतात , वाढतात तिथले संस्कार , आचार – विचार सरणी , तिथले वातावरण या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो.

सुरुवातीला सगळ्यांचं जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्यास वेळ लागतो ..वेळ पाहिजे असतो. आणि जवळीक साधण्यास काही कारणे पाहिजे असतात. अशावेळी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे असते. मग वातावरण निर्मिती कशी करायची ? तर हास्य विनोद , विविध खेळ . आपण बघितले की हम आपके है कौन मध्ये कसे  passing the parcel madhun ते गाण्याच्या माध्यमातून एकदम हसरे , खेळकर वातावरण तयार करतात. असेच जोडपी ही खेळणारी , हसणारी , मौज मजा करणारी असतील तर त्यांच्या मध्ये तणाव नसतो. भविष्याचा विचार , चिंता , आर्थिक समस्या सगळ्यांनाच असतात. पण हे सगळे विसरून छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी , निर्माण करणारी जोडपी ही अधिक समाधानी असतात.

निशा आणि राज दोघेही खूप हसत खेळत मौजमजा करत जगणारे जोडपे. आणि दोघांच्या मध्ये शरीर संबंध ही खूप उच्च प्रतीचे. त्या नियमित शरीर संबधातून ही ते  अधिक समाधानी असतात.

आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते- आणि बरेचदा जाणते अजाणतेपणी अनेक जोडपी याचा वापर योग्य प्रकारे करून घेतात. आणि नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी राहत. कारण मन आणि शरीर या दोघानाही त्यांनी एकरूप करून टाकले होते.

राज आणि निशा नेहमी काही ना काही विनोद करून एकमेकांना हसवत. उत्साही ठेवत.
चार संप्रेरके खरेच ते वाढविण्यासाठी , आनंद निर्मिती करण्यासाठी वापरत.
१. एंडॉर्फिंस
२. डोपामाईन
३. सेरोटोनिन
४. ऑक्सिटोसिन
आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

इंडॉर्फिंस

राज रोज सकाळी नियमित व्यायाम करत असे. आणि त्याने ती सवय निशा ला ही लावली होती. निशा बरेचवेळा काही तरी करणे सांगून टाळत असे. पण राज तिला बरोबर पटवत असे. तू बरोबर असलीस की माझा व्यायाम होतो. मला उत्साह येतो .तुझ्या शिवाय नकोच वाटते ग. मग तू नाही आलीस तर माझा ही व्यायाम राहील.  मग निशा ही त्याच्या या गोड बोलण्याने आणि खरेच आपल्यामुळे त्याचा व्यायाम राहायला नको म्हणून लगेच आनंदाने तयार होत असे. व्यायाम झाला की दोघेही प्रफुल्लित आणि उत्साही. कारण इंडॉर्फिंस हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग निशा आणि राज मध्ये काही कुरबुर आसो.घरातल्या , बाहेरच्या कामाच्या काही कटकटी असोत , त्रास असोत . या सगळ्याचा विसर पडून त्या दोघांना हसत खेळत आनंदी ठेवत.

हसणे हा इंडॉर्फिंस निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे. मग राजच्या अशा खोट्या स्तुती ने किंवा निशाला पटविण्याचा मार्ग यातून आपोआपच दोघांना हसू येई. आणि व्यायामाच्या निमित्ताने दोघे एकत्र जात , येत , मधल्या काळात काहिगोष्टिंवर चर्चा ही होत असे. आणि एकमेकांचा सहवास तो ही अगदी दिवसाच्या सुरुवातीपासून . ही अशी आनंदी आणि उत्साही सुरुवात त्यांना दिवसभर फ्रेश  ..प्रफुल्लित ठेवत. आणि secure feel करत. आपल्या जोडीदाराचे आपल्या सोबत असणे हे मन आणि शरीराला ताजे तवाने ठेवत.

आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.

डोपामाइन

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

राज कायम निशा ला छान compliment देत असे. कधी तिच्या छान अवरण्यावरून , ड्रेसिंग sense वरून , कधी दिसण्यावरून , कधी तिच्या मस्त yummy स्वैपाक आणि नवीन recipe दाद देवून ..मजा आली जेवणात असे कौतुकाचे शब्द बोलुन तिला उत्साही करत असे.

घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या निशा ला  अनेकदा निराश वाटते. असेच अनेक स्त्रियांना वाटते   कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.  पण राज नेहमी निषाचे कौतुक करत असे. त्यामुळे ती आनंदी राहत असे.

आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. निशा ही राज चे त्याच्या कामावरून , त्याने पगार आला सांगितले मी त्याचे कायम कौतुक करे. तू आहेसच मेहनती आणि कामात एक्स्पर्ट. निशा आणि राज एखादी छान गरजेची गोष्ट खरेदी करत. किंवा एकमेकांच्या गरजा काय ते समजून घेवून खरेदी करत. त्यामुळे तो उत्साह आनंद वाढत असे. आणि एकमेकांच्या गरजा , आवडी निवडी समजून घेण्यास मदत होत असे.

सेरोटोनिन

जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.

राज  कायमच निशाचे लिखाण वाचत असे आणि तिला अजून  छान लेखन कसे होईल याकरिता काही नवनवीन मुद्दे , reference देत असे.

तसेच निशा ही राजच्या प्रोजेक्ट करिता त्याला नवनवीन ideas देत असे.यातून दोघांच्या मध्ये serotonin निर्मिती होवून दोघेही आनंदी राहत.

ऑक्सिटोसिन

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते. मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते. तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.

राज नेहमीच ऑफिस ला जाताना ,आल्यावर हळूच निशाला मिठीत घेई. तिच्या कपाळाचे छान चुंबन देवून तिला आपल्या स्पर्शाच्या जादू मध्ये एकदम मोरपिसासारखे हलके तरंग उठवीत असे.

एखाद्या दिवशी राज गडबडीत असेल तेव्हा निशा आठवण करून देत असे .राज काही विसरलास का? मग राज आणि निशा पटकन त्या क्षणात एकमकाना जवळ घेवून कामाची गडबड , व्याप, ताण  ही दूर करुन एकदम रिलॅक्स मूड मध्ये परत आणत.

यातून च त्यांची शारीरिक  संबंध वाढीस कारणीभूत संप्रेरके , एस्ट्रोजन , प्रोजेस्टेरोन, टेस्टोस्टेरोन ही वाढीस लागत. आणि ती व्यवस्थित maintain राहिल्याने त्यांच्या मधले संबंध ही समाधानकारक राहत.

सुट्टीच्या दिवशी कधी राज निशाला बाहेर फिरायला , ट्रीप करिता पिकनिक ला घेवून जाई. तर कधी Sunday special breakfast स्वतः करून, बाहेर जेवायला घेवून जावून  निशाला थोडा आराम देत असे. तर कधी candle light dinner  मुळे खास वातावरण निर्मिती होत असे.  तर कधी राज चे आवडते पदार्थ त्याला surprise म्हणून करत असे. त्याच त्याच वातावरणातून बदल काय मिळेल याकरिता प्रयत्न करत असतात दोघे.

तर कधी घरी राहून काय काय कामे करायची आहेत याची लिस्ट आणि मदत एकमेकांना करत. दोघेही एकमेकांना खूप समजून घेवून काम करत .मदत करत. एकमेकांचे सल्ले घेत. अडचणी काय आहेत त्या समजून घेवून मार्ग काढत.  दोघांच्या मध्ये घरी तर संभाषण उत्कृष्ट असेच. पण बाहेर गेले. ऑफिस मध्ये तरी फोन करून एकमेकांची विचारपूस करत. जेवण केले का .काय चालले आहे.असे काही ना काही कारणाने एकमेकांच्या संपर्कात राहात. एकमेकांना वेळ प्रसंगी आधार देत. सहवास हा एकमेकांना जवळ आणत असे. आपुलकी आणि एकमेकांची ओढ त्यांना कायम सुखी आणि समाधानी , शांत ठेवत असे. आणि इतरांची कधी ही तुलना न करणे हा स्वभाव त्यांना स्वार्थ , चिडचिड , भांडणे यापासून दूर ठेवत असे.

राज आणि निशा. सारखी अनेक जोडपी नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी असतात. कारण ते एकमेकांना वेळ ही देतात.समजून ही घेतात. प्रसंगी समजावून सांगतात. आणि साथ , आधार , स्थैर्य देतात. आणि एकमेकांनी आनंदी राहावे म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.

आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…

१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा.-इंडॉर्फिन
२. आपल्या जोडीदाराचं  छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका.-डोपामाइन
३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते जोडीदाराला ही  मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा.-सेरोटोनिन
४.जोडीदाराला विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो…ऑक्सिटोसिन

आयुष्य सुंदर आहे. भरभरभरून जगा ..आनंदी राहा आणि इतरांना ही आनंदी ठेवा .स्वस्थ राहा आणि मस्त जगा!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “नियमितपणे खेळणारी, हसणारी, मौजमजा करणारी आणि शरीर संबंध ठेवणारी जोडपी अधिक समाधानी असतात.”

  1. Pradeep Hushanna Dikondawar

    खूप छान लेख.. नक्कीच छोट्या छोट्या गोष्टीतून पण पती पत्नीला आनंदी ठेऊ शकतात.. एकमेकांच्या भावना, सुख दुःख सहजपणे व्यक्त करणे. एकमेकांना काय आवडत आणि आवडत नाही हे स्पष्ट व मनमोकळेपणाने बोलणं हे एकमेकांना समजून घ्यायला नक्कीच फायदेशीर होतात. जेवढे आपण खेळकर व हसरे राहू तेवढे घरचे वातावरण अगदी छान राहते. स्पर्शसूख, सेक्सच्या भावना न दडपता त्या मनमोकळेपणाने संपूर्ण आनंद घेणे, हे सर्वात महत्वाचे. ज्यांचं बेडवर पटत त्यांचं सगळीकडं पटत हे वाक्य तर अनेकांनी अनुभवले असेलच. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपले कपडे व इतर राहणीमानाचा दोघांनीही खर्च केल्यास, जमेल तसे फिरायला जाणे, एकमेकांना जसे जमेल तसे स्पेसियल वेळ देणं हे जोडीदाराच्या आयुष्यात खूप आनंदी राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे मदोघांचेही मन प्रसन्न राहून, उत्साह व चैतन्य वाढून त्यांच्या अधिक आर्थिक प्रगतीसाठी, आपली मानसिक व शारीरिक क्षमता वाढवीण्यास नक्कीच मदत होते..

  2. खूप खूप छान वाटला.असे काही लेख ,असतील तर पोस्ट करा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!