Skip to content

नात्यातली मजा म्हणजे सतत एकमेकांसाठी काहीतरी नवीन करत राहणे.

नात्यातली मजा म्हणजे सतत एकमेकांसाठी काहीतरी नवीन करत राहणे.


मयुरी महाजन


नात्यांच्या परिवेशात माणूस बऱ्याच वेळा खचून जातो, आपण इतक्या मनापासून जीव लावूनही , नेमकी आपल्याच बाबतीत माणसं निष्ठुर का होतात, असा प्रश्नही पडतो, आणि इतक्या प्रामाणिकपणे नातं जपूनही नेमकं आपलं काय चुकतंय, हेच कधी कधी कळत नाही,

जेव्हा नातं नवीन असतं, तेव्हा त्या नात्याला तितक्याच नाविन्यतेने जपलं जातं ,आणि आपल्या त्या नात्यासाठी, हे करावं, ते करावं , व काय काय नको ते सर्व काही, देण्याचा उत्साह व ते देत असताना त्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात, परंतु नंतर जसजसे दोघं एकमेकांमध्ये रुडत जातात, तसतसे एकमेकांची ओळख पूर्ण होत जाते, एकमेकांमधील बरेवाईट गुण-अवगुण सर्व काही स्पष्ट होत जातात, व त्या वेळेस आपण आपल्या सुद्धा काहीतरी कमतरता नक्कीच आहे, हे मात्र विसरून जातो,

आपण सर्व जसे आहोत, तसेच खूप छान असतो ,परंतु त्यामध्ये जर नाविन्यता नसेल, तर जगण्यात सुद्धा बोर वाटायला लागतं , जेव्हा आपला जोडीदार आपल्यासाठी काहीतरी नवीन गोष्ट करतो, त्याचा आनंद फार निराळा असतो, मग त्यामध्ये आपल्या पार्टनरला जमत नसतांना सुद्धा त्यांनी आपल्यासाठी केलेल्या साधा चहा असुद्या काय फरक पडतो, गोष्ट कुठलीही असो, हे महत्त्वाचं नाही, पण आपल्यासाठी काहीतरी करणे हे महत्त्वाचे आहे, हे माणसाला सुखावणारं असतं, त्यामुळे अशी अपेक्षा ही असली तरी ती समोरच्या व्यक्तीकडूनचं नेहमी का हवी ,कारण नात्यातील मजा अनुभवायची असेल, तर आपणही आपल्या नात्यासाठी काहीतरी नवीन करत राहायला हवं,

नाविन्यता हा माणसाच्या ठायी असलेला महत्त्वाचा गुण मानला जातो, व त्यासाठी खूप काही मोठा शोध घेण्याची आवश्यकता नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मोठा आनंद देणार्‍या असतात, त्यामुळे त्या छोट्या-छोट्या गोष्टींचाचं आपण नाविन्य तेने वापरायला हव्यात, एक लहान मूल सुद्धा सोबत जास्त वेळ एक खेळण्यासोबत खेळत नाही ,ते काहीतरी नवीन व दुसरे बघत असते, असे आपण भरपूर दादा बघितले असेल, परंतु असे का ?असा प्रश्न पडला पडला का ? त्या खेळण्यासोबत खेळून खेळून त्यातील नाविन्य संपलेले असते ,

आपल्या प्रत्येकाला आपलं नातं फुलवायचं असतं, स्वच्छंदपणे बहरू द्यायचं असतं, आणि त्यासाठी आपण काय करायला हवं ,हे मात्र कोड ऊलगडलेलं नसतं ,त्यावेळी इतकं लक्षात असू द्याव की नातं कायम बहरलेलं हवं असेल, तर त्यातील नाविन्य कायम जपलं पाहिजे ,ज्या प्रकारे आपण गंजलेली भांडी घासून काढतो, त्याप्रमाणे नात्याला लागलेला गंज ही वेळोवेळी घासून काढायला हवा , मग नातं सुद्धा त्या घासलेल्या भांड्या प्रमाणे चमकेल, यात शंका नाही,

फक्त नातं आहे ,त्याचं नाव आहे, म्हणून जपायचं नसतं ,तर नात्याला एकमेकांची साथ हवी असते, एकमेकांचे प्रेम हवे असते, एकमेकांसाठी दोघेही आहेत ,कायम हा विश्वास हवा असतो, याचा अर्थ असा नाही एकमेकांसाठी काहीतरी नवीन करणे म्हणजेच फक्त काहीतरी नवीन वस्तू घेणे, हॉटेल ला,जाणे, फिरायला नेणे, असा नाही जर एखाद्याला चांगली ड्रॉइंग येत असेल ,तर बघ मी तुझ्यासाठी हे छोटसं चित्रकाढले आहे, ह्या सुद्धा आनंद देणाऱ्या गोष्टी असतात ,ह्यात सुद्धा कोणीतरी शब्दांचा उपवास असेल, तर त्यांनी आपल्या जोडीदारासाठी शब्दांची गुंफलेली माळा जेव्हा कोणी वाचून दाखवतो ,लिहून सांगतो ,तेव्हा त्याला कसलीच तोड नसते ,

आपल्या आधुनिक जगात आपण खूप वेगाने एकमेकांना मेसेज टाकतो ,परंतु त्या सोशल जगातील फसवणूक सुद्धा खूप वेगाने वाढत आहेत, त्यासाठी आपल्याला खऱ्या भावना ओळखता येणेही नितांत गरजेचे आहे, फक्त एकमेकांसाठी असणे पुरेसे नाही, तर एकमेकांना जाणवणे ही नितांत आवश्यक आहे, नात्यातील मजा एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यातही आहे, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांची साथ असणे ही खूप मोलाचे ठरते, करायला घेतलं तर आपल्याकडे एकमेकांसाठी काहीतरी करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात, परंतु आपणच नकळत कधी कधी त्या दुर्लक्षित करतो त्यासाठी जिवंत आहे ,तोपर्यंत आपल्या नात्यांना वेळ द्यायला हवा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “नात्यातली मजा म्हणजे सतत एकमेकांसाठी काहीतरी नवीन करत राहणे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!