नितांत गरज आहे, त्यावेळी समर्पकपणे उभं राहिल्याने नवरा-बायकोतील विश्वास दृढ होतो.
मयुरी महाजन
कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आणि आपल्या पाठीशी असावं, असं प्रत्येकाला वाटत असते, पण मानवी आणि मनाच्या व मानवाच्या कृतीतून ते स्पष्टपणे जाणवत असते, नवरा-बायकोच्या नात्यात जेव्हा ती दोघं नव्याने नातं जोडत असतात, त्या वेळी त्यांच्यातील दृढ विश्वास घट्ट झालेला नसतो, कारण दोघी एकमेकांसाठी नवीन असतात, नातं जरी दोघांचं असलं तरी ती दोघं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतात, व दोघांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला स्वीकारून त्यांना एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात ,तेव्हा त्यांच्यात विश्वास फुलू लागतो,
हल्ली वास्तवाचा विचार केला, तर नातं जोडत असतानाच एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात, किंवा जे नाही ते वरचढपणे सांगितले, किंवा दाखवले जाते, आणि जेव्हा नातं जोडलं जातं, त्यानंतर त्या खऱ्या गोष्टी उघडकीस येतातचं, तेव्हा खरं रूप कळून चुकतं, आणि एकमेकांच्या मनात एकमेंकाप्रती अविश्वास जागा होतो, काही वेळेस टोकाच्या भूमिका सुद्धा घेतल्या जातात ,त्यामुळे जर आपल्याला आपल्या नात्यात नवीन रंग भरायचे असतील, नव्याने नात्याला बहरू द्यावेसे वाटत असेल ,तर आपण कायम एकमेकांचा विश्वास जपणे व त्या विश्वासाला खरे ठरणे व पात्र असणे नितांत गरजेचे आहे,
परिस्थितीच्या पाऊलखुणा कधी आपल्या समोर कोणती संकट, दुःख करतील याचा कधीही काही नेम नसतो, त्यामुळे त्याला सामोरे जाण्याची व आपल्या जोडीदाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता असते, कारण आयुष्यात जोडीदाराचं एक अशी व्यक्ती असते , जी प्रत्येक परिस्थितीला तुमच्या सोबत व प्रत्येक संकटाला तुमच्या बाजूने उभी असते, परिस्थिती कशीही असली तरीही, हा आता त्याला अपवाद असतीलच ती गोष्ट वेगळी, कारण प्रत्येकाची कहाणी येथे वेगळे असते,
पण नवरा बायको म्हणून आपण कायम एकमेकांना जीव लावतो, काळजी घेतो ,तसेच जेव्हा आपल्या जोडीदाराला आपली नितांत गरज आहे, त्यावेळी आपल्या जोडीदाराच्या बाजूने समर्पकपणे उभा राहिल्याने नवरा-बायकोतील विश्वास दृढ होत जातो ,कारण की प्रत्येक वाटेवर आपल्या माणसांचा हात सुटून जातो ,आणि जेव्हा खरंच गरज असते, कुणी तरी आपलं जे आपल्या पाठीशी इतकं समर्पक भावनेने उभा राहिलं की तेव्हा वाटू लागतं ,कुणीतरी आहे आपलं आपल्याला एक आधार आहे ,तो भावनिक असेल ,आर्थिक असेल किंवा आपल्याला आपल्या चुकीच्या जागी समजून सांगणारा आपला हक्काचा माणूस असेल, ज्यामध्ये आपल्या खऱ्या बाजूने आपल्याला पाठिंबा असेल चुकत असताना तितक्याच हक्काने आपल्या चुकांना बोट दाखवण्याचे धाडस करणारा असेलं,
नाते कुठलेही असो जोपर्यंत त्या नात्यात विश्वास असतो ,तोपर्यंत या नात्यातील प्रेम जिवंत असतं एकदा का त्या विश्वासाला तडा गेला, की त्यात पुन्हा ते प्रेम जिवंत तसंच जिवंत होत नाही, जर आपण कोणावर विश्वास ठेवला असेल तर ती व्यक्ती त्या विश्वासाला पात्र आहे का कि नाही हे सुद्धा बघायला हवे ,नाहीतर डोळे बंद करून विश्वास ठेवल्याने जेव्हा विश्वास घात होतो तेव्हा त्या व्यक्तीपेक्षा स्वतः चा जास्त राग येतो,
जोडीदार या नात्याने आपली प्रत्येकाची आपल्या जोडीदाराप्रती काहीतरी भूमिका नक्कीच असते,, व त्या भूमिकेला तितक्याच समर्पपणे निभावत हे आपले कर्तव्य असायला हवे, एकमेकांचा विश्वास जिंकता आला ,तर आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग सुद्धा अगदी हसत हसत निघून जातात, आपण मिळवलेल्या गोष्टीचा आपल्याला एक आनंद असतो व समाधान सुद्धा ,त्यामुळे कुणाचा विश्वास मिळवणं हे सर्वात मोठी श्रीमंती आहे व त्या श्रीमंतीला टिकवून ठेवणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना साथ द्या गरज असेल तेथे ऐकमेंकांसाठी उभे रहा ,व आपल्या नात्याला कायम असेच फुलवत रहा…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
