तुझं-माझं करता करता दोघांमधली दरी वाढत गेली…
सोनाली जे.
मानस शास्त्र म्हणले की मन , व्यक्ती , तिचे विचार, तिचे व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सभोवतालचे वातावरण , ती व्यक्ती संस्कारात वाढली आहे ते संस्कार शिवाय घरातल्या लोकांची मनस्थिती त्यांची विचारसरणी , मित्र मैत्रिणी त्यांचे विचार ,, सहकारी किंवा जोडीदार त्यांचे वागणे , विचार ,अनुभव या सगळ्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडत असतो.
आपण जेव्हा आपला जोडीदार निवडतो , मैत्री करतो तेव्हा त्या विषयी आपल्या काही कल्पना असतात. तो / ती असा असेल , तसा / तशी असेल. स्वभावाने , विचार असे असतील , आपल्या आणि जोडीदाराच्या आवडी निवडी सारख्या असतील , खाण्यात ही गोष्ट आवडत असेल, हा रंग आवडता असेल, हा पोशाख आवडेल. असे वेगवेगळे तर्क , कल्पना आपण करत असतो. मैत्री मध्ये तसे आपण रोजचा सहवास , मदत , एकमेकांची काळजी घेणे , शेअरिंग आणि केरिंग जास्त असते. मैत्री ठरवून होत नाही पण ती ही येणाऱ्या बर्या वाईट अनुभवातून पक्की होत जाते.
पण बरेचवेळा आपण जी कल्पना करतो तसे आपला जोडीदार, मित्र मैत्रिणी प्रत्यक्षात नसतो. नसते.तेव्हा मात्र भ्रमनिरास होतो. स्वप्नांच्या दुनिये मधून आपण सत्यात येतो.
आणि मग बरेचदा तुझे माझे सुरू होते. होय तेच ते तू तू मैं मैं.
मला असे वाटले होते तू अशी असशील , तू असा आहेस. इथपासून तुझी नोकरी , माझी नोकरी , इन्कम , स्वभाव , आवडी निवडी , तुझे माझे नातेवाईक , मित्र मैत्रिणी सगल्यावरून कुरबुर सुरू होते. मैत्री मध्ये कधी एखादी गोष्ट पटत नाही . किंवा खूप जुनी अगदी खास दोस्ती असेल तरी काही वेळेस तुझे माझे होतेच. आणि तिथे कितीही मुरलेल्या लोणच्या सारखी मैत्री असेल तरी ही त्यात एखाद्या नाजूक विषयावरून कुरबुर सुरू होते. आणि तुझं-माझं करता करता दोघांमधली दरी वाढत गेली… सुरुवातीला थोड्या adjustment ची अपेक्षा असते. केली ही जाते. पण एकमेक जसे पूर्णपणे एकमेकाला ओळखू लागतात तेव्हा मात्र आपल्या मतावर ठाम राहतात. त्यातून तुझं-माझं करणे सुरू होते आणि ते सामंजस्याने , बोलून , भेटून कमी होण्याऐवजी अजून वाढतच जाते.आणि दोघांमधला ती एक दरी निर्माण होते .. आणि वेळीच त्याकरिता उपाय केले नाही तर ती वाढतच जाते.
उदय आणि हेमंत असेच खूप जवळचे आणि खूप चांगले मित्र. कॉलेज मध्ये असल्यापासून एकत्र. छोटी सुख दुःख असतील, खाणे पिणे असेल किंवा शैक्षणिक आणि पुढे नोकरी , लग्न यासारख्या सगळ्या स्टेज मध्ये एकमेकांची सोबत आणि प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार. शून्यातून वर आलेले म्हणले तरी चालेल. उदय ची शेती गावाकडे. दोघेही कलाकार. साक्षात सरस्वती देवीचे आणि गणपती बाप्पाचे वरदान . एखादे पेंटिंग करावे तर हिऱ्याची पारख जसे जोहरी करतो तसे उदय ने केले तर हेमंत जोहरी. हेमंत ने केले तर उदय जोहरी. आयुष्यातले प्रत्येक चढ उतार एकमेकांच्या साथीने , सोबतीने पार पाडत आज कुठे आयुष्यात स्थिरावले. दोघांची लग्न ही एकमेकांच्या साक्षीने , त्यात उत्साहाने मदत करत झाली. दोन्ही कुटुंबे कायम एकत्र . पुढे मुले झाली तरी भेटणे कायम ..एकमेकांच्या घरचे सदस्य च. वेगळे असे काही नव्हते. एवढी मैत्री की एकमेकांचा शब्द अक्षरशः झेलतील. बाहेर फिरायला एकत्र , बोलणे मनमोकळेपणाने , घरच्या कौटुंबिक अडचणी असतील , आर्थिक , व्यवसायीक असतील एकमेकांना भेटून , बोलून सांगून मार्ग ही काढत. अतिशय उत्साही दोघेही. आणि एकमेकांची दृढ आणि गाढ मैत्री. २५ वर्षापेक्षा जास्त मैत्री. घट्ट आणि दृढ. यांची मैत्री खरेच दृष्ट लागण्यासारखी. कधी कोणते गैरसमज नाहीत. कधी भांडणे झाली तरी ती तात्विक . क्षणात विसरून एकमेकांना हसून , चिडवून , टोपण नावाने बोलून तर कधी चार शिव्या त्या ही गमतीने घालून परत खेळीमेळीने एकत्र येत हे दोघे.
हेमंत ऑफिस कामाकरीता परदेशी गेला. onsite गेला . एक वर्षभर तिकडे होता पण उदय त्याची बायको अनू , हेमंत त्याची बायको आदू सगळ्यांची मैत्री तशीच टिकून होती. हेमंत नसेल तरी घरी जाणे येणे सुरू होते. खावू पार्सल पाठविणे , इकडून तिकडे painting करण्याकरिता मटेरियल पाठविणे हे सगळे उदय पुढाकार घेवून आपलेपणाने करीत होता. अंतर आणि शरीर याने दुरावा असेल तरी सुसंवाद , मैत्री , मैत्री मधला ओलावा कायम टिकून होता.
हेमंत परदेशातून परत आल्यावर त्याच दिवशी उदय आणि संपूर्ण कुटुंब भेटले. Celebration ही केले.
उदय ने त्याच्या बायको करिता एक नवीन बिझनेस सुरू केला होता. संपूर्ण वेळ ती त्यात असायची . हळूहळू तिला खूपच वेळ होवू लागला. बिझनेस मुळे अनेक लोकांच्या सोबत meeting , भेटणे यात पूर्णपणे बिझी झाली. त्यातून उदय चे आणि अनु चे वाद होवू लागले. तू तू मैं मैं कुठे संपेना.
तुझं-माझं करता करता दोघांमधली दरी वाढत गेली…
अचानक उदय काही दिवस गावाकडे गेला हे समजले. पण त्याचे कारण कोणालाच माहिती नव्हते. हेमंत नी ही कॉन्टॅक्ट केला तर तो शेतीच्या कामासाठी गावाकडे आहे हेच उत्तर असे. आणि अचानक फ्रेंडशिप डे वेळी एक दिवस उदय हेमंत ला भेटला पिकनिक जावू म्हणून दोघे च मस्त पावसात पिकनिक ला गेले. आणि दोघांनी भरपूर मजा ही केली.
जाताना वाटेत मस्त पावसात भिजत , कुठे कणीस , भजी खात त्यांच्या बुकिंग ठिकाणी गेले. ते असे एकांतात .या दोघांच्या व्यतिरिक्त कोणी नाही तिथे. मस्त गप्पा , दंगा मस्ती मूड मध्ये . दोघांनी रात्री मस्त ड्रिंक प्लॅन ही केला तिथल्या हॉटेल मध्ये डान्स music याचा आनंद घेत मस्त मुड मध्ये होते . उत्साही होते आणि तेव्हा उदय ने हेमंत ला त्यांचा divorce झाला हे सांगितले. क्षणभर काही सुचेना . सगळे डोके बधीर झाले. तरी हेमंत अतिशय संयमी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये आपला तोल जावू न देणारा असल्याने त्याने शांत राहून उदयच सगळ बोलणे ऐकून घेतलं. केवळ एकदाच निर्णय घेण्यापूर्वी का बोलला नाही तू . असे काही तुझ्या आयुष्यात घडत आहे हे का सांगावे ही वाटले नाही तुला. काही तरी करता आले असते. यावर उदय ठामपणे म्हणाला की यात कोणीच काही करू शकले नसते. निर्णय मी घेतला होता आणि तो ठाम होता.
हेमंत ला खूप वाईट वाटले एवढ्या जवळचा असणारा आपला मित्र एव्हढा कसा बदलला . आश्चर्य ही वाटले.
उदय ला एव्हढे ही म्हणाला तुझी बाजू तशी अनु ची बाजू ही महत्वाची ती समजून घेता आली असती.
थोडे फार तुझं-माझं झालं. कुठे तरी ती दरी पडण्याची सुरुवात होती. लक्षात येत होत पण इलाज नव्हता. किंवा दरी वाढेल असे कधी वाटले नव्हते.
या नंतर तरी हेमंत आणि उदय नेहमी भेटत . मोकळेपणाने बोलत. त्यांचे भेटणे जास्त वाढू लागले. त्याचे कारण ही खरे तर उदय आणि अनु यांचा divorce. त्यांचे relations खरे खूप चांगले असून त्यांच्या नात्यात .त्यांच्यात होणाऱ्या तू तू मैं मैं मध्ये .त्तुझी बाजू माझी बाजू यातून दरी वाढली होती. ती आता कधीच कमी होणार नव्हती. याचे दुःख , त्रास उदय करून घेत होताच पण हेमंत ही . असे काही अपेक्षित ही नव्हते.
दोघे मित्र वरचेवर भेटत दुःख विसरण्यासाठी ड्रिंक्स ही घेत. हेमंत केवळ उदय सोबतच घेत असे. तेही त्याला एकटे वाटू नये. त्याचे दुःख हलके होवून रिलॅक्स होवून तो मोकळेपणाने बोलवा म्हणून.
पण हळूहळू उदय चे ड्रिंक्स घेणे जास्त वाढू लागले. हेमंत नसेल तरी ही तो एकटा किंवा इतर कोणाच्या सोबत घेवू लागला.तरी ही हेमंत त्याला साथ देत होता. पण कसे काय माहिती हे उदयच्या भावाला , वहिनीला समजले . उदयच्या बहिणीला समजले .तेव्हा तिने उदय ला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उदय ने तिच्याशी बोलणे बंद केले.
उदय ला असे वाटले की हे हेमंत नी सांगितले घरी. पण तसे नव्हते. हेमंत ला ही मेसेज केला की तू मैत्री निभावली नाहीस. तूच घरी सांगितले. मी एक चांगला मित्र म्हणून तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होतो. तू मात्र मैत्रीला जागला नाहीस. तुझी मैत्री तुटली. माझ्या सोबत आणि घरच्यांच्या सोबत कोणतेही संबंध ठेवू नको
परत तोंड दाखवू नको. आणि मेसेज करू नको. असे म्हणून हेमंत ला ब्लॉक केले.
आपली कोणतीही चूक नसताना. आपल्याच मित्राने ..ज्याने आपल्या सोबत आपले आयुष्य जगले अर्थात दोघांनी ही चांगले वाईट दिवस , चढ उतार बघितले त्या आपल्या खास व्यक्तीने आपल्याला आपल्या मैत्रीला ही समजून घेतले नाही. विश्वास ठेवला नाही. किंवा बोलण्याची ही संधी दिली नाही याचे खूप वाईट ही वाटलें आणि त्रास ही झाला.
तुझं-माझं करता करता दोघांमधली दरी वाढत गेली…हेमंत ने आपली चूक नसताना आपल्या मित्राचा शब्द म्हणून तो पाळला त्याला कधी भेटला नाही. फोन नाही. संपर्क नाही.
उदय ने परत दुसरे लग्न केले तरी हेमंत ला सांगितले ही नाही. त्याला नव्याने आयुष्याची सुरुवात करताना जुन्या आठवणी , व्यक्ती ही नको होत्या. सगळे मित्रांचे ग्रुप लेफ्ट केले.
हेमंत ही परत ऑफिस कामा करिता परदेशी गेला. जाण्यापूर्वी भेटावे उदयला वाटत असून त्याने मनावर खूप कंट्रोल केला.
उदय ने हेमंत वर केलेले आरोप त्यात खरे खोटे हे सुधा विचार केले नाहीत. किंवा जरी असे केले असते तर ते आपल्या भल्यासाठी , आपण कोणत्याही व्यसनी जावू नये. आपल्यावर लहान मुलाची जबाबदारी आहे . आपल्या जीवाची काळजी म्हणून केले असेल हा विचार ही उदय नी केला नाही. केवळ तू असे केलेस तसे केलेस हे आरोप करून मोकळा झाला.
उदय ने तरी त्याच्या बाजूने परत कधी हेमंत ला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि हेमंत ने केवळ उदय चां शब्द शेवटपर्यंत पाळला. मैत्री ला जागला. पण
तुझं-माझं करता करता दोघांमधली दरी वाढत गेली…ती कायमची. आता माहिती नाही कधी उदय ने जर ब्लॉक काढला आणि बोलण्याचा प्रयत्न केला तरच काही होईल. कारण हेमंत नी तर कधी त्याला मोबाईल मध्ये ही ब्लॉक केले नाही. किंवा मनातून ही कधी ब्लॉक केले नाही.
आपण ही बरेचवेळा तुझं-माझं करता करता आपल्या लोकांना खूप दुखावतो आणि कायमची दरी निर्माण करतो.
खरे तर विचार केला तर सगळ्या गोष्टी क्षणिक असतात. आणि त्या त्या क्षणी असलेल्या मूड वर अवलंबून असतात. पण आपण त्या गोष्टी ताणून धरतो . प्रत्येक गोष्टीला तात्कालिक प्रतिक्रिया देतो. यापेक्षा क्षणिक गोष्टी , त्या वेळी रागावले असताना , किंवा अति प्रेमात आणि अती दुःखात कोणतेच निर्णय घेवू नये . तेव्हा शांतता आणि संयम राखणे गरजेचे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very nice message
Thanku…🙏🙏😊😊