Skip to content

शरीरसंबंध ठेवताना कित्येक महिलांवर आलेल्या अवघडपणावर पुरुषांसाठी मार्गदर्शनपर लेख.

शरीरसंबंध ठेवताना कित्येक महिलांवर आलेल्या अवघडपणावर पुरुषांसाठी मार्गदर्शनपर लेख.


सुधा पाटील


आपल्या भारतीय संस्कृतीत एक स्त्री आणि एक पुरुष लग्न बंधनात अडकतात आणि त्यांचा शरीरसंबंधाचा प्रवास सुरु होतो.तसंही आजकाल काही शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशीप मध्येही काहीजण राहतात.पण जेव्हा स्री आणि पुरुष यांच्यात शरीरसंबंध निर्माण होतात तेव्हा ते अगदी लगेचच किंवा सहजच निर्माण होत नाहीत.

सृष्टीचा नियमच आहे की,ओलावा असेल तरच बीज रुजतं.अगदी तसंच जगातलं कोणतंही नात, प्रेमाच्या,आपुलकीच्या भूमीतंच रुजलं जातं.म्हणूनच शरीरसंबंध ठेवताना पुरुषांनी आपल्या पार्टनरला समजून घेऊन आपले शरीरसंबंध कसे फुलवता येतील याचा आधी विचार करायला हवा.

कारण आपल्या भारतीय मुलींना लै@गिक शिक्षणाची पुसटशी कल्पना असते.तीही कोणाकडून तरी ऐकलेली!कित्येक महिलांना लग्न झाले तरी से@क्स म्हणजे काय हेही माहित नसते.कित्येक नवीन जोडप्यांमध्ये सेक्सच्या अज्ञानावरून भांडणे सुरु होतात.कित्येक लग्ने अज्ञानामुळे सुरवातीच्या काही काळातंच मोडलेली दिसतात. एक तर लग्न झाले म्हणजे लगेचच शरीरसंबंधास सुरवात झालीच पाहिजे असा असणारा लोकांचा समज!

पण अरेंज मॅरेज मध्ये नवरा बायको तसे अनोळखीच असतात. एकमेकांचे स्वभाव अजून तसे माहित नसतात. त्यात जर पुरुषाने अधाशीपणाने तीच्या मनाचा विचार न करता शरीरसंबंध ठेवले तर कदाचित बाईच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतो.म्हणूनच लग्नानंतर शरीरसंबंध ठेवताना असो किंवा एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध ठेवताना असो पुरुषांनी महिलांची मानसिकता समजून घेणे गरजेचे असते.

निसर्गत:च महिला लाजऱ्या असतात.त्यात त्यांना लै@गिक माहिती अपुरीच दिली जाते.या विषयावर महिला देखील एकमेकींशी ओपनली बोलत नाहीत.म्हणूनच पुरुषांनी आधी महिलांचा अवघडलेपणा दूर करणं गरजेच असतं. आधी त्यांच्याशी संवाद साधून,गप्पा मारुन त्यांच्याशी एक भावनिक नात निर्माण करणं गरजेच असतं.

महिलांना से@क्स विषयी नेमकं किती ज्ञान आहे हे माहिती करुन न घेता शरीरसंबंध ठेवले तर त्या हवा तसा प्रतिसाद देणार नाहीत.म्हणूनच सुरवातीला से@क्सविषयीच्या शास्त्रीय माहितीची चर्चा दोघात होण गरजेच असत. निरामय कामजीवन या पुस्तकासारखी पुस्तके कामजीवनाच्या माहितीसाठी खूपच उपयुक्त आहेत.

महिलांचा अवघडेपणा दूर होण्यासाठी अशा पुस्तकाची चर्चा दोघात होण गरजेच आहे. आज अनेकजण याबाबतीत अतृप्त दिसतात.कारण याचा संबंध मानसिकतेशी ,भावनांशी,प्रेमाशी आहे हेच पुरुष समजून घेत नाहीत.

एखादी बाई बुजरेपणामुळे किंवा अज्ञानामुळे प्रतिसाद देत नसेल तर पुरुष लगेच तिच्यावर चिडतात,कधी कधी नको ते आरोप करतात.मग एकदा ठिणगी पडली की,नात्यात वणवा पसरत जातो.विज्ञानाने हे सिद्ध केलंय की,निकोप शरीरसंबंध हे मानसिक नात्यावर आधारित असतात.आणि असे निकोप शरीरसंबंध दोघांनाही सदैव प्रसन्न ठेऊ शकतात.

दोघांच्याही मनावरील ताण कमी करतात. पण यासाठी पुरुषांनी आपला पुरुषी अहंकार या नात्यात आणता कामा नये.जे निसर्गातील पक्षांना समजत ते पुरुषांना समजत नाही. नर पक्षी मादीला खूप छानपणे रिझवतो.बाई आणि पुरुष यात एक फरक आहे. बाई आधी भावनांना महत्व देत असते.

आणि एक पुरुष आधी से@क्सला! त्यामुळे दोघांमधील हे नात आजवर कमकुवत राहिल आहे. पण पुरुषांनी आधी आपल्या पार्टनरशी तिच्या आवडीनिवडी याविषयी गप्पा मारल्या,तिला ऐकून, समजून घेतलं की,हळूहळू त्याच्यात भावनिक ओलावा वाढत जातो.मग स्त्री पार्टनर आपोआपच मोकळी होऊ लागते.तिचा अवघडलेपणा हळूहळू कमी होऊ लागतो.मला इथे एक सत्य उदाहरण सांगावस वाटत….

एक नवीन लग्न झालेल कपल होत.त्यातील नवऱ्याने सुहागरात्री बायकोला पॉ@र्न व्हिडिओ दाखवून तसंच करण्याची मागणी केली.तिला हे सगळ नवीन होत.ती घाबरली.तीने नकार दिला.तो तिच्यावर खूप ओरडला.तीने घरच्यांना हा नवरा नको अस सांगून टाकल….. वाचकहो,मी मागच्या एका लेखात सांगितलं आहे की, से@क्स हा दोन शरीराचा नसतो,तर तो दोन मनांचा असतो.शरीरसंबंध हे केवळ दोन शरीरांवर अवलंबून नसतात.तर ते मोकळेपणाने एकत्र वावरणाऱ्या दोन मनांवर अवलंबून असतात.म्हणूनच सुरवातीच्या काळात महिला ह्या खूपच बुजऱ्या असतात.

कदाचित या विषयाशी अनभिज्ञ असतात. म्हणूनच पुरुषांनी तिला आधी समजून घेण,समजावून सांगणं गरजेच असत.पुरुषांची कामपूर्ती समजून येते.पण बाईची समजूनच येत नाही. कारण कित्येक जणींना स्वत:चा ऑरगॅनिझम म्हणजे काय हेच माहित नसत.म्हणूनच ही माहिती घेऊन दोघांनी यात पुढाकार घ्यावा.यासाठी आधी दोघांमध्ये तेवढ मोकळ नात निर्माण व्हाव लागत.आणि ते नात निर्माण करण्याची जबाबदारी पुरुष वर्गाची असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!