प्रेम मिळत नाही, अशा उपेक्षित महिला बाहेरच्या सापळ्यात आणि मोहात अलगद अडकून पडतात.
टीम आपलं मानसशास्त्र
आयुष्यात आपल्याला आपली व्यक्ती पाहिजे असते. जी आपल्यावर आणि आपण जिच्यावर हक्क गाजवू शकू, मोकळेपणाने प्रेम करू शकू आणि करवून घेवू असे. एकमेकांची सुख – दुःख शेअर करू . आपलेपणा पाहिजे असतो. कोणी तरी आपले आहे. आपल्या सोबत आहे. आपली विचारपूस करणारे आहे यात एक समाधान आणि भावनिक सुरक्षितता जाणवत असते. आणि बरेचवेळा Freud यांच्या नियमानुसार दोन opposite gender , व्यक्ती मध्ये हे आकर्षण जास्त असते. साहजिक च ते नैसर्गिक आहे कारण प्रेम हे भावनिक आणि त्यापुढे शारीरिक आकर्षण निर्माण होवून शारीरिक प्रेमात , संबंधातही होते.
आज एखाद्या स्त्री कडे भरपूर संपत्ती आहे , घर , गाडी बंगला , चांगला व्यवसाय किंवा नोकरी आहे. पण तिला प्रेमाची उणीव कायम जाणवत असते.
प्रेम मिळत नाही, अशा उपेक्षित महिला खरेच आहेत. आणि अशा महिला बरेचवेळा असुरक्षित , एकटेपणाची भावना अनुभवतात. आणि अशावेळी जर त्यांचा एखादा जवळचा मित्र , सहकारी , नातेवाईक , शेजारी , सहप्रवासी त्यांच्या रोजच्या संपर्कात असेल , सहवासात असेल किंवा चौकशी करत असेल. फोनवर बोलून , मेसेज करून किंवा भेटून .
मग सुरुवातीला अगदी साधी चौकशी असेल, काय कसे काय , हाय हॅलो, मग जेवण झाले का , ऑफिस ल गेली का , काम कसे सुरू , बिझी का , किती काम करते असे हळूहळू संभाषण वाढत गेले की त्या स्त्रीला जिला कधी प्रेम मिळाले नसते . तिला वाटते की आपली कोणाला तरी काळजी आहे . विचारपूस करणारे , अगदी मनापासून आपली काळजी घेणारे कोणी आहे असे वाटून ती त्याच्या प्रेमात पडते .
तर काही स्त्रियांकडे पैसे ही फारसे नसतात. त्या जगण्याकरीता खूप धडपड करत असतात. कोणाचा support नसतो. तर कधी प्रेमभंग झालेला असतो. त्यातून तर कोणाचं हक्काचं असूनही नवरे इतरत्र गुंतले असतात त्यामुळे किंवा एखाद्याला आवडच नसते. प्रेम , स्त्री भावना समजत नसते. कामाच्या व्यापात एखाद्याला वेळच नसतो.अशा स्त्रिया प्रेमा पासून वंचित असतात. आणि अशावेळी कोणी जवळीक केली , थोडी अस्था दाखविली की त्या त्या मोहपाशात अडकतात. रुस्तुम सिनेमा बघितला असेल तर समजेल ती कशी त्याच्या जाळ्यात , मोहात अडकते.
बरेचदा चांगले ही लोक असतात.
पण काही वेळेस प्रेम मिळत नाही, अशा उपेक्षित महिला बाहेरच्या सापळ्यात आणि मोहात अलगद अडकून पडतात.
माझ्याकडे मीनाक्षी counselling करिता आली.ती माझ्या मुलीच्या मित्राची आई . शाळेत कायम भेटणारे त्यामुळें विश्वासाने आली. कोणाला सांगू नका हुं म्हणाली .पण मला खरेच मदत करा हो. मला समुपदेशनाची खूप गरज आहे.
तिला विचारले काय झाले. तिने सांगण्यास सुरुवात केली. माझे लग्न होवून पंधरा वर्ष झाली. नवरा काहीच करत नाही. घरचे ही सगळे मी करायचे. शिवाय कमवायचे ही मी. कंपनी मध्ये एजंट आहे मी आणि सतत घरचे नाही तर पैसे कमवायचे काम करते. नवऱ्याला काही फरक पडत नाही. कसलीच मदत नाही. दोन प्रेमाचे शब्द ही नाहीत. कधी समजून घेणे नाही. स्वतः कधी काही घरासाठी करण्याची नवऱ्याची इच्छा ही नाही. कसली हौस मौज नाही.
त्यात एजंट म्हणून मी ज्यांच्या हाताखाली काम करते ते सर मला खूप मदत करतात. त्यांनी मला हे सगळे काम शिकविले. आणि अजून ही काही अडले तरी कायम मदत करतात. मला जमत नसेल जाण्यास कुठे तर स्वतः जातात आणि माझ्या client कडून documents करिता सगळे papers , cheque जमा करून पुढे ही पाठवतात.
माझी खूप प्रेमाने चौकशी करतात. आणि खरे तर नवऱ्याकडून प्रेम नाही अगदी उपेक्षित जीवन जगत असताना माझे सर मला मदत करत होते .त्यांच्याशी हळूहळू जवळीक वाढत गेली. त्यातून त्यांचे माझ्यावर खरेच प्रेम आहे असे वाटत गेले. तसेच अनुभव येत गेले. आणि सुरुवातीला सर पण खूप आस्थेने चौकशी आणि मदत करत होते. आणि त्यातून शारीरिक संबंध ही निर्माण झाले. त्यांच्या मोहाच्या जाळ्यात दिवसेंदिवस अजून अडकत च गेले. पण ते सुरुवातीला मला समजले नाही.मला ते खरेच प्रेम वाटत होते. पण आता लक्षात येते की त्यांचे ही लग्न झाले आहे. बायको आहे एक मुलगा आहे. आणि बायकोवर , मुलावर नितांत प्रेम आहे.
माझ्याशी परिचय झाल्यावर हळूहळू आमच्यात संभाषण वाढत गेले. आणि ते प्रेम आहे असे वाटून मी त्यापुढे गेले. पण आता लक्षात येते की ते पाहिजे तेव्हा माझ्या सोबत संबंध ठेवतात. ते म्हणतील तेव्हाच त्यावेळी मी जायचे .आणि सुरुवातीला त्यांचे उपकार म्हणून मग मी त्या ओझ्याखली त्यांना नकार देवू शकत नव्हते. त्याचा गैरफायदा म्हणा किंवा सापळ्यात आणि मोहात अलगद अडकून पडले आहे मी. आता त्यांची म्हणजे सरांची कोणत्याही कामात सवय झाली आहे. त्यांच्या शिवाय माझे मला काम जमत नाही. आणि आजपर्यंत बहुदा त्यांनी मुद्दाम बाकी गोष्टी शिकवल्या किंवा सांगितल्या नाहीत. कारण त्यांच्या वाचून अडलं पाहिजे. आणि इतर कोणी आता ऑफिस मध्ये सांगत ही नाही. ते म्हणतात इतके वर्ष झाली .sir आहेत ते करतील .तुम्ही त्यांना सांगितले की होईल सगळे काळजी करू नका.
त्यामुळे आता सर बिनधास्त झाले आहेत. की त्यांना माझी मानसिकता चांगली समजली आहे. त्यांच्या वाचून काम पूर्ण होत नाही. अडून राहते त्यामुळे ते आत्ता जास्तच अडवणूक करतात. कधी दोन दोन दिवस काम आहे बाहेरगावी असे घरी सांगावे लागते. नाही म्हणले की ते ऑफिस ला येतच नाहीत आणि माझे काम कसे अडकवायचे एव्हढे बघतात. ते काम लवकर व्हायचे असेल तर ते म्हणतील तेव्हा , तिथे आणि तेवढा वेळ , दिवस त्यांना सोबत करायची.
आता खरे तर त्यांचा तो स्वार्थी स्पर्श ही नकोसां वाटतो .पण नाईलाज आहे माझा. भांडले की मग म्हणतात भांडून काय मिळणार त्यापेक्षा गोडी गुलाबी मध्ये होते तेवढे करू दोघांच्या हिताचे आहे. मग तेव्हा खूप गोड बोलतात. मग प्रेमाचे संवाद सुरू होतात त्यांचे. परत त्यांच्या त्या मोहात अडकते मी. आणि परत येणाऱ्या अनुभवातून जेव्हा लक्षात येते की गरज सरो वैद्य मरो असे आपल्या बाबतीत होत आहे. तेव्हा त्या सापळ्यातून आणि मोहातून अलगद बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्यात अजून जास्त अडकत जाते मी.
द्विधा मनस्थिती झाली आहे . काय करू सांगा मॅडम .. मला यातून बाहेर पडायचे आहे.
हिच्या सारख्या अनेक स्त्रिया आज कामाकरीता बाहेर पडतात.आणि अनेक स्त्रिया अशा वेगवेगळ्या पाशात, मोहात तर कधी सापळ्यात अडकतात आणि पुरुष या स्त्रियांची मजा घेत असतात. प्रेम या नावाखाली म्हणजे तसे भासवून बिनधास्त मजा लुटत असतात.
सगळेच पुरुष तसे नसले तरी दुधाने तोंड पोळले की ताक ही फुंकून प्यावे वाटते. तसे एखाद्याच्या सापळ्यात एखादी स्त्री सापडली किंवा त्याच्या मोहपाशात ..त्याच्या गोड बोलण्यात , आपुलकीने वागण्यात , प्रेमाचं बोलणे , काळजियुक्त स्वर यातून स्त्री अडकत जाते.
आणि हे अशाच स्त्री बाबत घडते आजपर्यंत जिला प्रेम मिळाले नाही. ती प्रेमा पासून वंचित राहिली आहे. ती या दिखावा आणि. खोटी आपुलकी , सहनुभती , काळजी तिच्या भावना , दुःख समजून घेणारे कोणी तरी आहे आणि त्याला अजून आपल्या जवळ यायचे आहे , सततचे कॉन्टॅक्ट, प्रेम भाव, गोड बोलणे , समजावून घेणे , कधी. शॉपिंग , तर कधी देण्यात येणारी gifts यातून मात्र या मोहात अलगद अडकून पडते. कारण तिला वाटते की हे खरेच असे आहे. पण भ्रमाचा भोपळा हा कधी ना कधी फुटतो आणि मग त्या मोहाच्या सापल्यातून बाहेर पडणे अवघड नाही अशक्य होते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान.. शिकण्या सारखं