पत्नीचं सौंदर्य फक्त शरीरापूर्तच, असं समजणारा नवरा कधीच तिला जिंकू शकणार नाही.
हर्षदा पिंपळे
लतिक तशी दिसायला सुंदरच.तिचे केसही खूप दाट आणि लांब होते.नाक तर अगदी सरळ होतं.भुवया दाट आणि नाजूक होत्या. कपाळ उंच होतं.डोळे तर एखाद्या मासोळीप्रमाणे नक्षीदार होते.खरतरं तिच्या या सौंदर्यावरच रोहन भाळला होता.त्याला लतिका आवडतही होती.तिच्यावर तो प्रेमही करत होता. आणि म्हणूनच पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतला होता.आणि लग्नही झालं.
आता नाही म्हंटल तरी लतिकासाठी सासर म्हणजे नवीनच होतं.नवं घर नव्या गोष्टी. त्याचप्रमाणे दोघांच्या घरच्या जेवणाची पद्धतही वेगळी.
नवीन नवीन सुरूवातीला या सगळ्याची लतिकाला सवय नव्हती.तिला रूळायला तसा वेळच लागला.आणि तिथल्या वातावरणाचा थोडा फार परिणाम लतिकावर झाला.तिच्या शरिराची सुरूवातीला थोडी फार हेळसांड झाली.दाट केसं कधी विरळ झाली कळलच नाही.
एकतर रोहनला लतिकाचे केस खूप आवडायचे.तो लतिकाच्या स्वभावापेक्षा तिच्या केसांचीच जास्त वाहवा करायाचा.परंतु हळुहळू लतिकामध्ये झालेल्या बदलांमुळे रोहन जरा अधूनमधून नाराजच दिसायचा. तिचे विरळ झालेले केस पाहून तर कधी कधी तो तिच्यावर चिडायचाही.तु हेच करत जा तेच करत जा.असं तो सांगत रहायचा.लतिकाला वाटायचा काळजीपोटी रोहन असं बोलत असेल.
नंतर दोघांच्या आयुष्यात तिसरा नवीन जीव येणार होता.सगळं तसं छान चाललं होतं.घरात आनंदी आनंद पसरला होता. दिवसामागून दिवस कसे भरभर निघून गेले कळलेच नाही. अखेर बाळाचा जन्म झाला. पूर्वा नावाची गोंडस मुलगी दोघांच्या आयुष्यात एक वेगळच सुख घेऊन आली.दोघांनाही आई-बाबा झाल्याचा खूप आनंद झाला होता.
आता प्रेग्नन्सी नंतर स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरिराचा आकार-उकार बदलून जातो.स्टीचेस पडतात. तर त्याच्यामुळे शरीरावर थोडा फार परिणाम हा होतो.तसाच परिणाम हा लतिकावरही झाला.आधीच सुडौल सुबक दिसणारं तिचं अंग आता जरा बेढब दिसू लागलं होतं.ते पाहून रोहन तिला कितीतरी वेळा तिच्या शरीरावरून बोलायचा.पूर्वीच शरीर आणि आत्ताच शरीर यातील अक्षरशः फरक तो सांगायचा. हे कशी दिसतेस वगैरे असं बोलायचा.
आपलाच नवरा बोलतोय म्हणून लतिकाने कैकदा दुर्लक्ष केलं.परंतु कालांतराने रोहनच ते वागणं वाढतच गेलं.नंतर नंतर दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.
“माझे केस विरळ झालेत,माझं शरीर बेढब दिसतय म्हणून तु मला सारखं डिवचतोयस.मान्य आहे शरीरातील बदल तुला स्विकारायला वेळ लागत असेल.पण माझं शरीर बदललं म्हणून माझा स्वभाव नाही बदलला रे,माझ्या शारीरिक सौंदर्यावरून मला बोलणारा तु कोण…?? शारिरीक सौंदर्यापलिकडे जाऊन कधी पाहीलच नाही का…?मला वाटत होतं की तुझं माझ्यावर प्रेम करतोस…माझ्या आंतरिक सौंदर्यावर तुझं नितांत प्रेम आहे. पण नाही रे….आज कळालं मला की तुझ्यासाठी माझं सौंदर्य म्हणजे केवळ ‘शरीर…..’ एकदा का शरीराचं सौंदर्य फिकं होत गेलं की तुझ्यासारखी लोकं दुसरं सौंदर्य शोधायला लागतात. आंतरिक सौंदर्याचा नी तुमचा काही संबंधच नसतो.”
वगैरे वगैरे बरच काही लतिकाने रोहनला सुनावलं. नंतर सगळं असह्य होऊन केवळ शरिर सौंदर्यावर भाळणाऱ्या रोहनसोबत लतीकाने कायमचे संबंध तोडले.पण जाता जाता तिने रोहनला हेच सांगितले की,
“एखाद्या नवऱ्याने केवळ पत्नीच्या शरीर सौंदर्यावर प्रेम करू नये. केवळ शरिराचच सौंदर्य पाहू नये.बाईला शरिरापलिकडेही जाऊन काहीतरी हवं असतं.तिचं आंतरिक सौंदर्यही तिच्या नवऱ्याने विचारात घ्यावं असं तिला वाटतं.आणि शरिराबरोबरच जेव्हा मनाच्या सात्विक सौंदर्याची तो व्याख्या करतो नं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.बायको कुणी शोभेची काचेची बाहुली नाही. तुटली तर तिचं सौंदर्य नष्ट व्हायला.त्यामुळे एक लक्षात ठेव,पत्नीच सौंदर्य म्हणजे केवळ शरीरापूर्त नसतं.त्यापलीकडे बऱ्याच गोष्टी असतात. आणि ज्याची तुझ्यासारख्या कित्येकांना कणभरही कल्पना नसते.
(सगळेच पुरुष असे नसतात. काही पुरुष असेही असतात जे तिच्या शरिरासोबतच तिच्या आंतरिक सौंदर्यालाही तितकच महत्त्व देतात.)
तर……
[कालांतराने लतिका पूर्वासोबत वेगळी राहू लागली.आणि सुखात आयुष्य जगू लागली.]
आता अगदी मान्य आहे, बाईलाही तिच्या शरिराच सौंदर्य हवहवसं असतं.कोणी कौतुक केलं तर ते तिलाही आवडतं.पण याचा अर्थ असा नाही तिचं सौंदर्य म्हणजे केवळ शरिरापूर्तच मर्यादित असतं.तिला जिंकणं म्हणजे तिच्या शरिरसौंदर्याची वाहवा करणे नव्हे. केवळ शरिरसौंदर्यावरून तिचं मन जिंकणं अशक्य आहे.
लालजर्द गुलाबाच्या फुलाला लाजवेल असं तिचं सौंदर्य…! काळेभोर दाट केस,कमनीय बांधा, चाफेकळीसारख नाक,टपोरे डोळे वगैरे वगैरे तिचं सौंदर्य आणि तिच्या शरिराची रचनाच निराळी आहे. शारीरिक सौंदर्य हे जरी निसर्गाने दिलेलं वरदान असलं तरी शारीरिक सौंदर्यापलिकडेही तिच्या सौंदर्याची व्याख्या असूच शकते.तिचं सौंदर्य हे केवळ शरिरापूर्तच नाही हे प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक पुरूषाने समजून घ्यायला हवं.कारण पत्नीच सौंदर्य म्हणजे केवळ शरिर असं समजणारा नवरा कधीच तिला (पत्नी) जिंकू शकणार नाही.
So…सौंदर्याची खरी व्याख्या समजुन घ्यायला हवी.प्रत्येकाने… प्रत्येक स्त्रीने…आणि पुरूषानेही. आणि स्त्रियांनीही लक्षात ठेवा की सगळेच पुरुष हे वाईट नसतात.समजून घेतलं की सगळं सहज सोपं होऊन जातं.थोडं समजून घ्या.(वैवाहिक) आयुष्य नक्कीच सुंदर होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

aprtim