रोमान्स आपल्या मनाला आणि शरीराला ताजेतवाने ठेवतं.
सोनाली जे.
रोमांस !! काय एकदम गोडवा पसरला ना चेहऱ्यावर !!कसा रोम रोम फुलला ना !! कदाचित रोम रोम फुलंन्यावरून च रोमान्स शब्द आला असावा वाटते. फक्त शब्द उच्चारला तरी अंगावरून जणू मोरपंख फिरवल्याचा आभास होतो, नाही का ? म्हणजे, ऐन तारुण्यात आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहताच मनात होणारी हुरहूर, भेटल्यावर कळत नकळत होणारा अलगद स्पर्श रोमांचित करून टाकतो . आणि मन कसे हवेत तरंगू लागते ना !!नवीनच लग्न ठरल्यानंतर होणार्या भावी जोडीदाराचा तो अपरिचित पण, हवा हवासा वाटणारा स्पर्श तर, नव्यानेच संसाराची सुरुवात करताना सततच असणारी जोडीदाराची सोबत… फक्त विचारानेच तनमनावर रोमांच फुलतात नाही का ?
खरेच जे जोडीदार एकमेकांवर निस्सीम प्रेम करतात, एकमेकात पूर्णपणे involve होतात, सततची ओढ वाटत असते त्यांना हा रोमान्स अधिक अधिक जवळ आणत असतो. आणि हाच रोमान्स ही ओढ अजून वाढवत असतो. एकमेका मध्ये वाद विवाद झाले , गैरसमजूत कधी काही विसराळू वृत्ती तर पटकन मूड बदलण्याकरिता हा रोमान्स कायमच जालीम उपाय ठरतो हुं.
कधी कधी दोघांपैकी एक कोणी कामानिमित्त असेल किंवा जबाबदाऱ्या , कर्तव्य याकरिता दूर जातो. पण हा दुरावा ही तो रोमान्स कमी करू शकत नाही बरं का !! आता बघा कसे हा प्रश्न पडेल तुम्हाला ??
का ? माहिती का हा दुरावा रोमान्स कमी करू शकत नाही माहिती , कारण की दुरावा हा काही कारणाने आलेला असतो. पण जे एकमेकात पूर्ण एकरूप झाले ना त्यांना हा दुरावा ही रोमान्स ने जवळ आणतो. आजकाल फोन , सोशल मीडिया , इंटरनेट या माध्यमातून किती ही दूरवर व्यक्ती असो .ती आपल्याला व्हिडिओ कॉल द्वारे सहज बघता येते. ती कायम जवळच , सोबतच आहे असे होते. आणि विशेष म्हणजे कधी ही . आणि जे खूप रोमँटिक कपल असतात ते या e माध्यमातून, इंटरनेट माध्यम ,गोड , प्रेमाचे संवाद साधून , कधी नजरेतून , कधी तो एक कटाक्ष , कधी ते गोडसे हास्य, तर कधी एखादा हलका फुलका विनोद , तर कधी nonveg बोलणे , गप्पा मारणे , विनोद यातून एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि अजून एकमेकात जवळीक वाढवत रोमँटिक बोलणे , संवाद यातून तो ओलावा टिकवून ठेवतात.
मनू आणि मीत एक असेच रोमँटिक कपल मिळेल त्यातून रोमान्स शोधून कायम उत्साही राहायचे. सतत एकत्र राहण्याची सुवर्णसंधी म्हणजे सोन्याहून पिवळे च . पण कधी तरी काही कारणाने मन नाही पण शरीराने दुरावा स्वीकारावा लागतो.
त्यात असेच हे कपल प्रत्येक गोष्टीत रोमान्स आणि त्याचा आनंद मिळवत होते. अगदी नवरा मीत परदेशात तिकडे cooking करताना व्हिडिओ कॉल वर एखादा पदार्थ करताना त्याचे वर्णन असे रोमँटिक गोष्टींमधून करे की हाय बायको अतिशय सुंदर लाजून, हसून , कधी त्याच भाषेत प्रतिसाद देवून हा रोमान्स अजून जास्त खुलवत असे.
कधी छान आवरून , कपड्यांची विविधता राखत , कधी नवीन हेअरस्टाईल करून , कधी छान मेकअप करून , तो फोटो पाठवून त्यातून आकर्षित होवून अजून रोमांचित..
तर कधी मीत परदेशातल्या विविध ठिकाणी , निसर्गात फिरताना तिथल्या नव्या गोष्टी माहिती करून घेताना , कधी वाहत्या पाण्याचा खळखळाट अनुभवताना , समुद्रकिनारी फिरताना ,तर कधी तिकडच्या संस्कृती मध्ये असलेली विविधता , थोडा मोकळेपणा , कोणत्याही वयात मनसोक्त डान्स मग तो कपल असो , ग्रुप असो अथवा स्ट्रीट डान्स असो. तो बघताना आपल्या जोडीदाराला ही त्याची झलक पाठवून .
कधी तिकडे अनेक नव्या गोष्टी बघताना त्याचे वर्णन करून तर कधी असे काही नवीन बघताना लगेच मनू ला व्हिडिओ कॉल करून तिलाही त्या दाखवून त्यात involve करून घेत असे.मग आपण ही एखादी ती गोष्ट ट्राय करू. एखादे ठिकाण एकत्र बघू अस म्हणताना दोघे एकत्र असू ही fantasy, बोलताना , बघताना सहज दिला जाणारा flying kiss तो रोमान्स सुधा त्यांना अजून जवळ आणत होता .अंतराने मर्यादा आणल्या होत्या दोघात पण मनाने मात्र कधीच ते अंतर येवू दिले नाही. आणि परिणामी दोघेही मानसिक स्थैर्य , स्ट्रेस मुक्त होते. दूर असून सुरक्षित फील करत होते.
तर कधी प्रत्यक्षात जोडीदाराला समवेत घेवून असा dance करताना , कधी निसर्गाच्या सानिध्यात एकत्र फिरताना , रोमान्स करिता कोणतेही वय, जबाबदारी यांचे बंधन नसते तर रोमान्स हा कायम मुक्तपणे , मोकळेपणाने कोणत्याही वयात करता येतो याची हळूच जाणीव करून देताना एकमेकांमध्ये अजून रोमान्स वाढविण्याचा मार्ग किंवा थोडी विचारसरणी. बदलण्याकरिता मार्गदर्शन करून . तशी मानसिकता बदलून बंधनातून थोडे मोकळे होण्याचा प्रयत्न.
आपल्याकडे आपण मुल झाली की काय हे शोभते का असे म्हणून या गोष्टी टाळत असतो. महत्व देत नसतो. तर काही कपल मुले होण्याकरिता केवळ नाईलाज म्हणून एकत्र आलेली.तेही लग्न झाले म्हणून .नंतर किंवा आधी रोमान्स याशी दूरवर संबंध नाही अशी.
पण खरे तर रोमान्स करण्याकरिता मन आणि, शरीर आणि वय कधीच म्हातारे होवू देवू नका. आमच्याच इथे मिलिटरी मधून रिटायर्ड झालेले ब्रिगेडियर आहेत. इतके रसिक आहेत नवरा बायको. रोज एकमेकांना प्रेरित करत असतात आणि इतरांना ही प्रेरणा देत असतात त्यांची mrs इतकी साधी आहे पण तरी ही व्यवस्थित आणि टापटीप राहते.
साडी खूप साधी पण रंगसंगती इतकी आकर्षक , त्यात सुंदर केशरचना , त्यात डोक्यात कायम एखादे सुंदर फुल तेही साडी आणि केश रचनेला साजेसे तेही बागेतले च असते. वेगळे काही बाहेर जावून घेवून येणे नसते. मग कधी कधी ते पांढरे अनंताचे फुल ही सुंदर दिसते आणि त्याचा मंद वास आला किहे ब्रिगेडियर साहेब आपसूकच बायकोच्या कमरेभोवती हात घालून हळूच बायकोला थोडेसे अलगद जवळ ओढून घेतात त्यांचा हा रोमान्स समोरच्या ला हो प्रेरित करतो. शेजारी पाजारी ही कपल आता तेवढ्याच मोकळेपणाने आपल्या जोडीदारासोबत हा रोमान्स अनुभवताना अतिशय उत्साही राहतात. खरेच सैन्यात जीव पणाला लावतात त्यामुळे त्यांना जगण्याची आस असते. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळविण्याची सवय असते. उत्साहित ठेवण्याचे प्रयत्न असतात.आहे हा क्षण भरभरून जगून घ्या असे असतात.
मग आपणच का प्रत्येकवेळी आपल्याच जोडीदारासोबत थोडासा रोमान्स करताना सतत वेळ , काळ , स्थल यांचे विचार करतो ? का बरे ? असे हलके फुलके रोमान्स तर तुम्हाला ही ताजे तवाने ठेवतील ना??
काही वेळेस केवळ अधिक जास्त प्रमाणात ला रोमान्स हा शारीरिक संबंधात अधिक जास्त मानसिक समाधान , सुख , शांतता आणि physically पण एकत्र येण्यातला आनंद द्विगुणित करत असतो. मानसिक आणि शारीरिक स्थैर्य देत देत असतो.
खूप स्ट्रेस असेल, चिंता असतील तर दुसऱ्या जोडीदाराने समजून हळुवार स्पर्श , एखादी घट्ट मिठी मारली, चुंबन तरी हा रोमान्स सगळी चिंता , स्ट्रेस घट्टकेत दूर करतो. अशी ही या रोमान्स ची जादू सुधा आहे.
त्या रोमान्स मध्येविविधता आणा , शोधा , नाविन्यता आणा, दुधात आपण साखर , मध ,तूप ,दही एकत्र करून जसे पंचामृताची एक वेगळी चव , गोडी आणतो तसे अनेक गोष्टी मधून , बोलण्यातून , नव्या गोष्टी बघण्यातून, कधी एखाद्या छानश्या रोमँटिक गाण्यातून , त्या मादक नजरेतून , नाविन्यता वाढवून रोमान्स अधिक खुलवत रहा.कायमच!!! आणि खरे तर शरीर आणि मनःस्वास्थ्य राखण्याचा रोमान्स हा lसर्वोत्तम , साधा , सोपा सहजरीत्या जमणारा मार्ग आहे
अहाहा रोमान्स खुलली ना कळी !!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
