सासरच्या लोकांमुळे तुमच्या दोघांच्या नात्यात अडथळा येऊ नये म्हणून हे करून पहा.
मयुरी महाजन
हा विषय म्हणजे आजच्या घडीला प्रत्येक घरातील समस्या आहे, नात्यांच्या चक्रव्यूह मध्ये कोण ,कधी आणि कसा अडकेलं, हे सांगताचं येत नाही, कारण हल्ली प्रत्येक चेहर्यामागे मुखवटे दडलेले आहेत ,आतून आणि बाहेरून मोकळी असणारी व्यक्ती तशी फारच कमी, प्रत्येक नात्याला जोडून ठेवणारी गोष्ट म्हणजे त्यां नात्याची मुळ, त्या नात्यांच्या उद्देशाची एक बाजू जी प्रत्येकाच्या लक्षात येईलचं, असं मात्र नाही, आणि जेव्हा लक्षात येते, तेव्हा ती वेळ सुटलेली असते.
नातं मग ते कुठलेही असोत, त्या नात्याची आवश्यकता ही दोघांनाही असावी लागते, ती एकाला असून चालतच नाही, नाहीतर त्यात एकाचा जीव गुदमरतो, आज कोणी कितीही म्हटलं तरी एखादे वेळी, एखादा प्रसंग ,घडतोचं, जेव्हा नात्यांचा असण्याचा आणि नसण्याचा प्रश्न उद्भवतो, पण खरं तर समजूतदारपणा दाखवूनही काही उपयोग नसतो ,कारण प्रत्येक वेळी जर आपणचं समजून घेत असू, तरं लोक आपल्याला जास्तीचं समजूतदार समजतात, किंवा गृहीत धरायला लागतात, त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, जितकं ती व्यक्ती डिझव्ह करत असेल,
दोन लोकांच्या मध्ये नेहमीच परिवाराच्या बाबतीत खटके उडतात, कारण की इथे प्रत्येकजण वेगळा आहे ,आणि आपल्या वयाच्या या टप्प्यावर ती ती व्यक्ती स्वतःला तितक्या चांगल्या पद्धतीने बदलायला तयार असतील असे मात्र नाही, कारण की त्यांच्यावर झालेले संस्कार वेगळे असतात, त्यांची नितीमत्ता वेगळी असते, तसेच आम्ही मोठे म्हणून आम्ही, चार पावसाळे जास्त बघितलेले आहे, हा एक त्यामध्ये पाँइंट असतो, जो की मी पणाच्या भावनेला ठेच लागू नये ,म्हणून जोपासला जातो, आणि जुन्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी घरातील वयस्कर मंडळी नवीन विचारांच्या विरोधात उभी असते, काही ठिकाणी जरी काही गोष्टी मान्य असल्या तरी, पण पूर्णतः मात्र ते मान्य करायला मन स्विकार नसते,
सासरच्या लोकांमुळे दोघांच्या नात्यात अडथळा येण्याचे हे सुद्धा एक कारण असते, की नातं जरी दोघांचं असलं, तरी त्या दोघांनी काय करायला हवं ,व काय करायला नको, या गोष्टीत घरातल्यांची होणारी लुडबुड,व हे प्रत्येक वेळी होणारी असेल, तर मात्र भांडणाला वारा लागल्याशिवाय राहत नाही, आणि मग घरातल्या गोष्टींवरून दोघांच्या नात्यात वादविवाद होतात, नात्यातील गोडवा संपुष्टात आणायला कारणीभूत ठरतात ,
गोष्ट कुठलीही असेल, प्रसंग कुठलाही असेल, परंतु प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात, एक आपली,दुसरी समोरच्या व्यक्तीची, व एक सत्याची , परंतु होते असे की प्रत्येक जण आपापली बाजू लावून धरतो, दोघांच्या विचारांती एक ठराविक निर्णय घेणे योग्यचं, कारण हे जग जरी एक असले ,तरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे,
कधी कधी असं वाटतं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागेवर बरोबर आहे, परंतु या सर्वा मध्ये आपली मात्र त्रेधातिरपीट उडते, कारण आपल्यासाठी आपला परिवारही महत्त्वाचा असतो, आणि ज्या व्यक्तीशी आपलं नव्याने नाते जुळले ती व्यक्तीही महत्त्वाची असते ,परंतु कधीकधी नवरा अशा परिस्थितीत अडकतो, की नेमकी बाजू कोणाची घ्यावी, आपल्या जन्मदात्या आईची किंवा जे आपल्यासाठी सर्व काही सोडून आली त्या आपल्या पत्नीची, तेव्हा व्यक्तीने डोळसपणे पाहणे गरजेचे आहे,व कोणाचीही बाजू न घेता, जी सत्याची बाजू असेलं, ते सांगणे महत्वाचे ठरते,
यासाठी आपण काय करायला हवे,
जेणेकरून आपण काही समस्या थांबू शकतो, आतापर्यंत आपल्यासाठी आपली आईचं सर्वस्व असते, परंतु लग्नानंतर पत्नी येते, तेव्हा त्या आईला असं नको वाटायला की माझ्यावरचे प्रेम आता कमी झाले, माझे घरांतील वर्चस्व कमी झाले, खरं तर नव्याने येणारी ती पत्नीही त्या गोष्टीची तितकीच भागिदार असते, त्यामुळे या दोघांमध्ये सुवर्णमध्य साधता यायला हवा,
नातं दोघांचंही असतं, त्यामुळे त्यांचे दोघांचे विचार, विचारात घ्यायला हवे,मग ते आर्थिक व्यवहार असो,वा भविष्याचे नियोजन, दोघेही एकमेकांसाठी सर्वस्व असतात, हे फक्त दाखवायचे नसून जाणवायला हवे,
आपल्याला आपला परिवार हा अगोदर पासून चं माहिती असतो, परंतु नव्याने येणारी मुलगी, तिच्यासाठी ते सर्व नवीन असतं, त्यामुळे काही गोष्टींमध्ये रूडायला वेळ लागू शकतो , मग कोणाला जास्त तर कोणाला कमी अशी वेळेची मर्यादा असू शकते, त्यामुळे त्या ठिकाणी आपण काही सामंजस्याने घ्यायला हव्यात,.
नात्यांच्या पवित्र बंधनात आपला ईगो कधीच आड येऊ देऊ नका, कारण माणूस नेहमीच
“बेहतर की तलाश में
बेहतरीन को खो देता है.…”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
