Skip to content

नवरा नसलेल्या महिलांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना.

नवरा नसलेल्या महिलांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना.


मयुरी महाजन


हा सर्व संसारुपी भवसागर फक्त दोन गोष्टींवर तरलेला आहे, आणि तो म्हणजे स्री व पुरुष, शिव आणि शक्ती सोबत असल्याखेरीज संसाराची व्याख्या पूर्ण होत नाही,

आयुष्यात असं अनेकदा वाटतं, भगवंताने कधी होण्यापासून कुणाची जवळची व्यक्ती हिरावून घेऊ नये, परंतु वास्तव परिस्थिती मात्र जेव्हा आपल्याला वास्तवाचे चटके देऊ लागते, तेव्हा मात्र असलेली परिस्थिती स्वीकारणे यापलीकडे पर्याय नसतो, हा जगण्याचे पर्याय जरी वेगवेगळे असले ,तरी त्या ठिकाणी वास्तव नाकारून मात्र चालतच नाही,

खरं तरं लॉकडाऊनच्या काळात कितीतरी गोष्टींची उलटापालट झाली, पण हे मात्र निमित्त ,कारण अगोदरही या घटना घडत होत्या, परंतु काही अंशी तेव्हा हे प्रमाण कदाचित कमी असेलं, एका मैत्रिणीच्या मैत्रिणीची एक गोष्ट संसारात मैत्रीणच्या संसाराला कुणाची नजर लागली असावी, तिला पाच वर्षांचा छोटा मुलगा आहे, देवाला त्याची सुद्धा हयगय वाटली नसावी का???? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, परंतु नवरा गेल्याच दुःख मात्र त्या माऊलीला बाळापासून वडील गेल्याचं जास्त आहे, ज्या स्त्रियांच्या पाठीशी नवरा नावाची गोष्ट हरवून जाते, तेव्हा मात्र समाजात जीवन जगताना त्यांना बऱ्याच अशा गोष्टींना सामोरे जावे लागते, ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नाही, कारण आज स्रीने कितीही उंची गाठू द्या, परंतु आधाराची गरज ही प्रत्येक माणसाला पडते, मग तो पुरुष असो वा स्री,

आणि समाजाची विचारप्रणाली ईतकी दूषित आहे, की नवरा नसलेल्या महिलेने कधीही आपले मन मोकळे पणाने जगलेले, आयुष्य हे समाजाच्या डोळ्यात खुपते, पुरुषी वर्चस्व कायम टिकून राहायला हवं, यासाठी त्यांच्या समस्या त्यांच्या घरापासून सुरू होतात ,त्यांना कुठेही स्वतंत्रपणे वावरता येत नाही, आपल्या मर्जीने कधीही काही करायला म्हटले, तर त्यांना घरातूनच विरोध असतो, का तर लोक काय म्हणतील ,या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात जर स्री अशिक्षित असेल, तर मात्र तिच्या अडचणी वाढणार्‍या असतात, कारण जग जरी तिचे असले ,तरी त्या जगात मात्र ती कटपुतली सारखी वावरतांना दिसते, ती स्वतःला विसरून जाते,

आपण सर्वांनी कितीही नाकारले, तरी आपल्याला प्रत्येकाला एका विशिष्ट ठिकाणी भावनिक आधाराची गरज असते ,त्यासाठी आपली हक्काची मैत्रीण असू देत, किंवा अन्य कोणी नवरा नसलेल्या महिला ह्या भावनिक आधारापासून कुठेतरी दूर लोटल्या जातात ,आणि त्यांच्या मनातील ह्या गोष्टी त्यांना कुठेही बोलता येत नसल्याने, त्यांच्या मनात त्या गोष्टींचे दमन होत जाते, अशा वेळी जर त्यांना अन्य कोणी प्रेमाने विचारपूस जरी केली, तरी त्यांचे मन भरून आलेले असते,

दुःखाने संकट ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, परंतु त्यातून काय घ्यावं, हे त्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते ,आज आपल्यासमोर दुःखाचे डोंगर असले, तरी आपल्या समोर त्या डोंगराला हसत पार करणाऱ्या जिद्दीच्या प्रत्यक्ष घटना सुद्धा कमी नाहीत, एका महिलेचे भाषण ऐकले ,त्यात तिने आपल्या पतीच्या निधनानंतर तिच्यावर असलेली मुलांची जबाबदारी, आणि हलाखीची परिस्थिती आणि तिच्या या हलाखीच्या परिस्थितीत घरच्या माणसांनी सोडलेली तिची साथ, तिला तिच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारी त्या महिलेने ठरवली,

जेव्हा प्रश्न आपल्या मुलांचा असतो, तेव्हा एक आई संपूर्ण जगाशी लढण्याची जिद्द ठेवते, तिने एका महिलेकडून दोन हजार रुपये उसने घेतले, व चहा विकण्याचे काम केले, परिस्थितीशी झुंज देताना तिने हे केले,ते फक्त आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ,

जेव्हा आपण अशा उदाहरणांकडे बघू… तेव्हा आपल्याला आपली दुःख शुल्लक वाटतील, कारण अडचणी त्यांनाही होत्याच, पण त्यांनी आपल्या अडचणींचे सोहळे मांडले नाहीत, त्यांनी त्याचे भांडवल करून आपल्या आयुष्याला दिशा दिली ,आपल्या आयुष्याची ही कहाणी सांगत असताना,त्या अक्षरशः रडत होत्या, या जगात आई पेक्षा सामर्थ्यशाली कोणीच नसतं,

मला असं वाटतं आपल्या समस्या काय आहेत, यापेक्षा त्या समस्यांना दूर करण्यासाठी आपण एक छोटा प्रयत्न जरी केला ,तरी ती समस्या सुटायला वेळ लागणार नाही ,त्यासाठी समस्या काय काय आहेत, यापेक्षा possibility काय काय आहेत ,यावरती जर आपण भर देऊ शकलो, तर मला वाटतं, आपण कालपेक्षा आज स्वतःला नक्कीच वरं आणू शकणार, समस्या कालही होत्या, आजही आहेत, आणि उद्याही असणार आहेत ,फक्त समस्या आहेत म्हणून थांबून कसं चालेल, त्यासाठी त्यांच्याशी झुंज देण्याची आणि त्या समस्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवली, तर नक्कीच आपण आपल्यातच असणार्‍या क्षमतांना सुद्धा बाहेर काढण्यात मदत करू ,कारण समस्या आहेत, तसेच त्यावर उपायही आहेतच, सर्वप्रथम समस्या आपल्या मनात जन्म घेते, त्या समस्यांना सामोरं जाण्याची शक्ती ही आपल्याला मनातूनचं निर्माण करावी लागेल…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “नवरा नसलेल्या महिलांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना.”

  1. लेखाचे शीर्षक चटका लावणारे आहे. शीर्षक सन्मानजनक हवे होते! उदा. एकल महिलांच्या समस्या व समाधान.

  2. Suryakant Prabhakar Nimbalkar

    खूप छान संदेश…..धन्यवाद शुभ दुपार

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!