आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय त्याला स्त्रिया जबाबदार आहेत असं लोकांना का वाटतं?
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत बऱ्याच गोष्टींना स्त्रियांनाच जबाबदार धरलं जात. खरा गुन्हेगार कोण याची शहानिशा न करता स्त्रियांबाबतीत जे गुन्हे घडतात त्याला स्त्रियाच कशा जबाबदार आहेत, त्याच कशा परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतात हे सांगितलं जातं.
जसं लग्न टिकणं न टिकणं हे त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे घटस्फोटाला जबाबदार ही त्याच दोन व्यक्ती असतात. पूर्वी स्त्रिया शिक्षित नसायच्या, ‘चूल आणि मूल’ यातच त्यांचं सारं आयुष्य जायचं. घर सांभाळणं, नवरा, मुले, सासरकडची इतर मंडळी यांचं करण्यातच त्यांचं सारं आयुष्य गुरफ़टलेलं असायचं. शिक्षण नसल्याने नोकरी नाही, बाहेरच्या जगाचा अनुभव नाही, आणि आपल्या हक्कांबद्दलच अज्ञान यामुळे त्या मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या पूर्णतः नवऱ्यावर अवलंबून असायच्या. लहानपणापासूनच लग्न, नवरा, सासर हेच तुझं आयुष्य ,
या गोष्टी म्हणजेच खरं आयुष्यं, याशिवाय तुझ्या आयुष्याला अर्थ नाही, अशा गोष्टी मनावर बिंबवल्या जायच्या. त्या ही अशा पद्धतीने की, नवरा म्हणजे खरंच पती-परमेश्वर आणि तो करेल, किंवा सांगेल ते सगळं योग्य अशी त्यांची धारणा होऊन जायची. भले मग तो रोज मारझोड जरी करणारा असला, दारू पिऊन मुलाबाळांना दोन वेळच अन्न ही पुरवता येणार नसला तरी तिथेच राहायचं , त्याला सोडायचं नाही. तो करेल ते सगळे अत्याचार, अन्याय मूक गिळून सहन करायचं पण माहेरी निघून जायचा विचार किंवा नवऱ्याला सोडायचा विचार मात्र करायचा नाही.
पण आता काळ बदलला आहे. अहवालानुसार, गेल्या दोन दशकांमध्ये घटस्फोटांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून घटस्फोटाची सर्वाधिक प्रकरणे भारतातील शहरी भागात घडत आहेत. कौटुंबिक ढवळाढवळ असो, स्त्रियांचे वाढते स्वातंत्र्य असो, मानवी हक्कांबद्दलची जागरुकता असो किंवा शिक्षण असो, असे अनेक घटक या वाढीस कारणीभूत आहेत. आता हे जे घटक घटस्फोटाला कारणीभूत आहेत ते वाचून ते चुकीचे आहेत की बरोबर हे तुमचं तुम्हीच ठरवा. अन्याय करणारा काल ही होता आणि आजही आहे. पण अन्यायाला वाचा फोडण्याचं प्रमाण आजकाल जास्त झालंय ही चुकीची गोष्ट कशी म्हणायची? त्यापेक्षा अन्याय करणाऱ्यानेच जरा सुधारलं, आपण वागतोय ते बरोबर की चुकीचं याचा विचार केला तरी देखील ताटातुटीच प्रमाण कमी होईलच की. समोरचा माणूस आपलं वाईट वागणं सहन करत नाही यासाठी त्याला दोष देत बसणं हे कुठलं शहाणपण?
घटस्फोटाची काही मुख्य कारणे पुढीलप्रमाणे पाहुयात:-
१. Abuse and Trauma – जुन्या काळापासून स्त्रियांना पुरुषांकडून किंवा सासरच्या माणसांकडून मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळाला सामोरं जावं लागलं आहे.पण आजच्या बदलत्या काळात आपल्या नैतिक हक्कांबद्दलची जागरूकता स्त्रियांमध्ये वाढली आहे. माणूस म्हणूनही आपल्याला काही हक्क आहेत, आणि आपल्याला ही त्याप्रमाणे वागणूक मिळालीच पाहिजे हे विचार त्यांच्यात रुजू लागले आहेत. स्त्रियांचे हक्क , कायदे , आपलं स्वातंत्र्य या बद्दल त्या अधिक सजग झाल्या आहेत. आणि त्यामुळेच त्या अन्याय जुगारून लावतात, चुकीच्या गोष्टी सहन करत बसत नाहीत.
आपल्या देशात ‘घरगुती हिंसा’ आपल्याला काही नवीन संकल्पना नाही. खूप वर्षांपासून चालत आलेली आणि अजून ही काही ठिकाणी चालू असलेली ही एक छळवणुकीची पद्धत आहे. आता या गोष्टी सहन करणं जर योग्य असतं तर नक्कीच स्त्रिया घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाला जबाबदार आहेत असं आपण म्हटलं असतं. पण तास नाहीए हे आपल्याला माहित आहे त्यामुळे अशा कारणांसाठी स्त्रियांना जबाबदार धारण सोडून द्यायला हवं.
२. महिलांची बदलती स्थिती- आजकालच्या स्त्रिया आर्थिक, मानसिक आणि सामाजिक रित्या मजबूत आहेत. त्या कोणत्याच प्रकारे कोणावरही अवलंबून नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी त्या पुरुषांवर अवलंबून नाहीत. काही स्त्रिया तर त्यांच्या पार्टनर पेक्षा ही जास्त पैसे कमावतात, आणि त्याचमुळे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला हे रुचत नाही आणि पुरुषी अहंकार वर डोके काढतो आणि त्यामुळे भांडणांचं प्रमाण वाढतं आणि भांडण विकोपाला गेलं की त्याचे परिणाम आपल्याला घटस्फोटरूपी पाहायला मिळतात.
३. लग्न झालेल्या कपल मध्ये कोणी एकानेच श्रेष्ठ किंवा एकाचाच वर्चस्व जास्त असणे. जिथे बेडरूम वर वर्चस्व एकाच्या हाती नसेल ते कपल सुखी आणि आनंदी राहतं. पण बऱ्याच कुटुंबांत पुरुषांना महिलांपेक्षा श्रेष्ठ समजलं जातं, आणि तशीच वागणूक ही दिली जाते. आत्ताच्या महिलांना स्वतःचा आवाज, विचार आणि मते असल्याने त्या अशी वागणूक सहन करत नाहीत. तसेच हीच गोष्ट पुरुषांना ही लागू पडते. जिथे स्त्रिया नियंत्रक , manipulative असतील तिथे पुरुषांना ही स्वतःचा आवाज, मते आणि विचार असणं आणि ते मांडणं गरजेचं आहे.
४. नात्यांमधला अविश्वास – जिथे विश्वासाचा अभाव असतो तिथे एकत्र राहणं काहीच कामाचं नाही. विवाहबाह्य संबंध आजकाल कॉमन झालेले आहेत. मग ते महिलांचे असोत किंवा पुरुषांचे. पण फरक फक्त हाच आहे की, जेव्हा असे संबंध पुरुषांचे असतात आणि ते उघडकीस येतात तेव्हा स्त्री ने तिच्या पतीला माफ करून एक चान्स देण्याची अपेक्षा तिच्याकडून केली जाते. पण तेच महिलेचे विवाहबाह्य असलेले संबंध समाज कधीही मान्य करीत नाही.तिला माफ करून एक चान्स देण्यात यावा असे कोणालाच वाटतं नाही. पूर्वी अशा केसेस मध्ये बऱ्याचशा महिला पतीला माफ करून स्वतःच्या स्वाभिमानाविरुद्द्ध निर्णय घेताना पाहायवयास मिळायच्या. पण आजकाल त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसून येत आणि त्यामुळेच अशा केसेसमुळे देखील डिवोर्स च्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते. खरंतर या गोष्टी इतक्या खाजगी असतात की कोणी कोणाला माफ करावं आणि करू नये हे त्या माणसाच्या जेण्डर वरून ठरता काम नये. हा पूर्णपणे त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो.
डिवोर्स च्या वाढत्या प्रमाणात अजून बऱ्याच गोष्टींचं काँट्रीब्युशन असतं, जसं की, सेक्शुअल प्रॉब्लेम्स, communication प्रॉब्लेम इत्यादी. कारण कोणतं ही का असेना पण जेवढे डिवोर्स केसेस असतात त्यात स्त्रिया, त्यांचं शिक्षण हेच जबाबदार असू शकत नाही. काही ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृतीचे बुरसटलेले विचार, घरगुती हिंसा, तर काही ठिकाणी स्त्रियांचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असे वेगवेगळे मुद्दे घटस्फोटास कारणीभूत असू शकतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

घटस्फोट… हा शब्द जरा मजेशीर आहे…एक घटकाचा स्फोट होऊन घटक विभक्त होणे म्हणजे घटस्फोट… थोडंफार वैज्ञानिक वाटतं पण असो.विवाहविच्छेद असं हि आपण बोलू शकतो… शब्द तसा कठीण आहे पण काय करणार त्याचा उगमच मोठ्या भांडणतंट्यातून झालाय त्याला तो तरी काय करणार… गमतीदार पण आता पुरेसं झालं असं मला वाटतं क्षमस्व…
पूर्वी विवाह टिकत होते आता टिकत नाहीत त्याला बरीच कारणं आहेत त्यापैकी मॅडमने बऱ्यापैकी सांगितली… त्याबद्दल त्यांचे आभार.
पूर्वी बऱ्याच स्त्रीया निरक्षर होत्या… आणि त्यामुळे विवाह टिकत होते आणि आज स्त्रीया साक्षर झाल्यात आणि त्यामुळे विवाह टिकत नाहीत…असं जर आपण म्हटलं तर ते मला चुकीचं वाटतं… कारण निर्बल,हिन,दुबळी आणि मागास स्त्रीपेक्षा कणखर, सामर्थ्यशाली, विकसित स्त्री ही खूप महत्त्वाची…विवाहापूरतं स्त्रीला चौकटीत अडकवण्यात काही उपयोगाचं नाही… कुटुंब,समाज,देश विकसित करायचा असेल तर तिला डावलून ते शक्य नाही… खरं सांगायचं तर स्त्री हि पूर्वी पण आणि आजही अडाणी नव्हती… काही अपवाद वगळता.कारण एकच तिनं मानलेल्या स्वतःच्या कुटुंबांचा स्वार्थ कधी सुटलेला नाही…मग तो माहेरचा असो किंवा सासरचा.
मजेशीर गोष्ट अशी आहे किंवा स्त्रीला अनेकदा सत्तेच्या चाव्या तिच्या हातात दिल्या गेल्या पण ती स्वतःबद्दलचा निर्णय किंवा विकास साध्य करू शकली नाही…म्हणजे ती कमजोर आहे असं होतं नाही.त्यामागे फक्त त्याग भावना एवढीच मधे येते.भारताचं संविधान बनविताना ५०% आरक्षण नाकारणारी स्त्रीच होती…परत पंतप्रधान, राष्ट्रपती झाली तरी स्वतःबद्दल निर्णय घेऊ शकली नाही….याचा अर्थ त्या निरक्षर होत्या का…की आजची स्त्री हि त्याच्यापेक्षा हुशार आहेत.
मुळात घटस्फोट होण्यामागे आपलं शैक्षणिक धोरण बऱ्यापैकी जबाबदार आहे… समानता, समता, कर्तव्य याबाबतीत खूप कमी प्रमाणात शिकवलं जातं…. संविधानातील मूलभूत अधिकारांची अर्धवट माहिती सांगितली जाते….त्याच टोक पकडून समाज चुकीचं मार्गाला लागतोय आणि स्वतःच नुकसान करून घेतोय… लग्न म्हणजे काय,त्याची गरज काय, कशासाठी करतात लग्न, लग्न करण्यासाठी काय हवं असतं आणि लग्नानंतर काय करणं गरजेचं आहे,त्यांचे चांगले वाईट परिणाम… याबाबत खूप कमी प्रमाणात चर्चा केली जाते…
घटस्फोट न होण्यासाठी मुलामुलींनी आपली बौद्धिक परिपक्वता वर जोर देणं गरजेचं आहे. भविष्यातील संकटांचा विचार करणं गरजेचं आहे… घटस्फोटाचे, अविवाहितादंदुष्परिणाम माहिती असणं गरजेचं आहे.. अधिक काही लिहितं नाही…
स्त्रिया बाहेर लैंगिक संबध ठेवतात हे खर आहे मुलं बाळ होत नसेल तर 100%
Vary nice
Very nice reality