तुमच्या दोघांमध्ये नातं संपत चाललय हे दाखवून देणाऱ्या ८ खुणा.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
प्रेमाचं नातं हे जगातील सर्वांत सुंदर आणि पवित्र अस नात आहे. यातून आपण एकटे नसून आपलं हक्काचं अस कोणीतरी आहे अशी जाणीव मनाशी असते. आपल्या सुखदुःखाच वाटेकरी म्हणून कोणीतरी आहे, जरी ती व्यक्ती कायम आपल्या सोबत नसली तरी आपल्याला एकट न वाटणं ही जाणीव या नात्यातून निर्माण होते. पण काहीवेळा अस काही होत, अश्या काही घटना घडतात, काही कारण निर्माण होतात ज्यातून नात्यामध्ये दुरावा येतो, हे नात तुटू लागत, संपू लागत. पण दोघांमधील नात संपलं आहे हे कधीच दोन्ही व्यक्तीकडून लगेच सांगितलं जात नाही किंवा एका दिवसात ते नात तुटत पण नाही. त्याची सुरुवात खूप आधी झालेली असते. वेगवेगळ्या गोष्टींमधून याचे संकेत मिळू लागलेले असतात. त्याच्या खुणा दिसू लागलेल्या असतात. त्यातून हे जाणवू लागतं की नात संपलं आहे. त्या खुणा कोणत्या ते पाहू.
१. संवाद कमी होतो: नात्यामध्ये सवांद खूप गरजेचा असतो. आपल्याला काय वाटतं, आपण काय विचार करतो हे जर आपण बोललो नाही तर ते समोरच्याला समजणार तरी कसं? ते होत नाही. सुरवातीला सुरुवातीला अगदी दिवसभरात काय झालं हे सांगणार जोडपं अगदी महत्त्वाच्या गोष्टी पण सांगत नाही. ते सांगणं फार महत्त्वाचं पण वाटत नाही. साधं नेहमीच बोलण पण कमी होत. मग ते प्रत्यक्ष बोलणं असुदे किंवा मेसेज, फोन. आधी अगदी वेळ काढून बोललं जात असत पण तेच आता टाळलं जात.
२. एकमेकांना भेटणं टाळलं जातं: नात्यात असलेली अनेक जोडपी सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. कारण तो सहवास हावाहवासा असतो. आवडत असतो. तोच सहवास आता नकोसा होतो. म्हणून न भेटण्याची कारणं शोधली जातात. भेटणं टाळल जात. त्याऐवजी एकट राहणं किंवा आपल्या बाकीच्या ओळखीच्या लोकांसोबत वेळ घालवणे व्यक्ती पसंद करते.
३. अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडण होऊ लागतात: नात कोणतही असुदेत त्यात समजूतदारपणा, एकमेकांना समजून घ्यायची वृत्ती, एखादेवेळी चूक झाली तर क्षमा करण्याची वृत्ती असेल तर ते नात छान टिकत. पण जेव्हा नात्यात अडथळे येतात तेव्हा अगदी छोट्या गोष्टी पण गोष्टी मोठ्या वाटू लागतात, गैरसमज वाढतात आणि भांडण होतात. आणि सवांदच कमी झाल्याने त्या भांडणाला अजून बळ मिळते.
४. मनाने व्यक्ती दूर होतातच पण शरिराने पण दूर होतात: प्रेमाच्या नात्यात शारीरिक प्रेम पण असत. एकमेकांना मिठीत घेणे किंवा किंवा डोक्यावर प्रेमाने दिलेले चुंबन असो त्यात जिव्हाळा असतो, माया असते. नात संपत तस या गोष्टी पण कमी होतात आणि असल्या तरी त्या कृत्रिम होऊन जातात. त्या मिठीत प्रेम जाणवत नाही. ती एक फॉर्मलिटी होऊन जाते. याचबरोबर अनेकांचे जे शारीरिक संबंध असतात ते सुद्धा कमी होऊन जातात.
५. नात्याबद्दल मनात शंका येऊ लागते: जेव्हा दोन माणसे नात्यात येतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल तसेच या नात्या बद्दल विश्वास असतो की आपण हे नात चांगल्या पद्धतीने निभावू, यात येणारे अडथळे आपण दोघं पार करू अस अस वाटत असत. पण आता या सगळ्याबद्दल शंका येऊ लागते. या नात्यावर असलेला विश्वास उडून जातो. आपण किती दिवस हे नात टिकवू शकतो अस वाटू लागतं. खरच टिकवू शकतो का हेही समजत नाही. मनात सारखी शंका निर्माण होते.
६. मतभेद वाढतात: सुरुवातीला जी एकमेकांना सहमती दाखवली जात असते ती कमी होते. कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास एकदुसऱ्याचा विचार केला जात असतो. मत विचारात घेतलं जात असत. आता अस होत नाही. उलट मत भेद वाढतात. समोरच्या व्यक्तीने घेतलेला निर्णय चुकीचाच वाटतो आणि आपण कोणता निर्णय घेत असलो तर त्यात त्याला सामील पण केले जात नाही.
७. समोरच्या माणसातील वाईट गोष्टी जास्त दिसू लागतात: प्रेमाच्या नात्यातील सुरुवातीचा एक काळ असा असतो की आपल्याला आपला पार्टनर अगदी परफेक्ट आहे अस वाटत असत. तो चुकुच शकत नाही किंवा त्याने चुका केल्या तरी त्याकडे डोळेझाक केली जाते इतके आपण प्रेमात आकंठ बुडालेले असतो. पण टोकाच्या गोष्टी मग त्या चांगल्या असुदे किंवा वाईट दोन्ही त्रासदायकच असतात. सुरुवातीला ज्या चुकीच्या गोष्टींकडे डोळेझाक केली जाते त्याच गोष्टी आता अजून प्रकर्षाने जाणवतात. त्यांना वाढवलं जात. मग ते बोलणं असुदे, वागणं, एखाद व्यसन या सर्व गोष्टी आता जास्त दिसतात आणि चांगल्या गोष्टी मागे पडतात. सुरुवातीपासूनच जो एक समतोल पाहिजे तो नसल्याने या गोष्टी होतात.
८. विश्वास निघून जातो: नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. म्हणूनच ज्या गोष्टी घरातल्यांना पण अनगत नाही त्या आपण आपल्या या जवळच्या व्यक्तीला सांगतो. पण तो विश्वासच निघून गेल्याने ज्या गोष्टी आपण त्या व्यक्तीला सांगितल्या पाहिजेत त्याही सांगितल्या जात नाहीत. आपलं यश असुदेत किंवा आयुष्यात घडलेली एखादी महत्त्वपूर्ण घटना जी आपण त्यांना सांगितली पाहिजे ती दुसऱ्याच कोणाकडून तरी त्यांना समजते किंवा ऐकायला मिळते. एकत्र असूनही जेव्हा हा दुरावा येतो तेव्हा तो प्रत्यक्ष दूर असण्याहूनही खूप त्रास देतो.
या काही सांकेतिक खुणा आहेत ज्या तुमच्या दोघांमध्ये नात संपत आलय हे दाखवून देतात. पण लक्षात घ्या कोणतही गोष्ट मुळापासून नष्ट होत नाही आपण स्वतः ला आणि समोरच्या व्यक्तीला पुन्हा एक संधी दिली नात्याला पुन्हा एक संधी दिली तर नक्की नात सुधारू शकत. फक्त आपली तेवढी तयारी पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान
हा लेख माझ्या जीवनात हा सर्व प्रकार होत आहे मी खूप प्रयत्न करत आहे नातं टिकविण्याचा पण समोरचा व्यक्ती मला समजूनच घेत नाही आहे
Khup chhan aahe aani khaarr aahe aata pahilya sarkhe nahi rahile kahi ….aata fakt mobile prem rahile
🌹🌹khup chhan 🌹🌹
Chhan aahe
सत्य आहे
हा लेख खूप खूप छान वाटला असेच लेख पाठवा
Lunch chhan aahay lakh
Khupch Chan
खुप सूंदर जी रियालिटी आहे तीच लिखानातून दिसली
Khup chhan