स्त्री आणि पुरुष एकमेकांना आपली सिक्रेट सांगण्यासाठी एकमेकांची निवड का करतात?
हर्षदा पिंपळे.
‘स्त्री-पुरुष’ म्हणजे पहायला गेलं तर अत्यंत नाजूक विषय.आणि त्यातल्या त्यात तर स्त्री-पुरुष मैत्री म्हणजे तर फारच नाजूक आणि हळवा विषय.आता अजूनही काही ठिकाणी स्त्री-पुरुष मैत्री मान्यच नाही. एका स्त्री आणि पुरुषामध्ये केवळ चांगली मैत्री असू शकते हे आजही कित्येकांना पटत नाही. तसेच काही अंशी समाजात हळुहळू का होईना ही मैत्री स्वीकारतानाही दिसते.परंतु पूर्णतः अजूनही कित्येकांनी स्त्री-पुरूषांची मैत्री ही संकल्पना स्वीकारलेली नाही.स्त्री-पुरुष एकत्र आले म्हणजे त्यांच्यामध्ये मैत्रिपलीकडे जाऊन बरच काही असू शकतं हाच समज अजूनही प्रचलित आहे. वेळेनुसार तसा बदल होतोय परंतु पूर्णतः बदल व्हायला मात्र अजून बराच काळ लोटावा लागेल.
आता मैत्री आली म्हणजे शेअरींग-केअरींग सारख्या गोष्टी येतातच.तर त्यातलाच एक भाग म्हणजे शेअरींग…..
आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात. किंवा दिवसागणिक रोज काही ना काही घडत असतं.त्यातल काही आपण सगळ्यांसमोर सहजपणे बोलून दाखवतो तर काही गोष्टी मनाच्या एका कप्प्यात कुठेतरी लपवून ठेवतो.अर्थात जे आपण सहजासहजी कुणालाही कळू देत नाही किंवा सांगत नाही त्याला गुपित म्हणजेच सिक्रेट असं म्हंटल जातं.मग ते काहीही असो.अजून एक गोष्ट म्हणजे माणूस स्वतःच्या कोणत्याही भावना दीर्घकाळ मनात दाबून ठेवू शकत नाही.त्या कधीतरी ओठांवर येतातच.नाहीतर मग आपण तरी एखादी गोष्ट कुणाला तरी सांगितल्याशिवाय शांत बसत नाही.
आता सिक्रेट म्हंटल तर ते अशाच व्यक्तीला सांगतो ज्याच्यावर आपला विश्वास आहे. जी व्यक्ती आपल्या जवळची आहे. सगळ्यांनाच आपण असे सिक्रेट सांगत फिरत नाही.कारण तसं केल तर सिक्रेट हे सिक्रेटही राहत नाही.तर आता हा विषय एखादा कॉमन सिक्रेट सारखा मुळीच नाही.
तर हा विषय केवळ ‘स्त्री-पुरुष’ यांच्यातील सिक्रेटस् विषयी आहे. दोघांकडेही अशा अनेक गोष्टी असतात ज्या की सिक्रेटस् असतात. तर हे सिक्रेटस् कुणाबरोबर तरी शेअर करावे असं दोघांनाही वाटतं.तर असे सिक्रेटस् शेअर करण्यासाठी अनेकदा ते दोघे एकमेकांची निवड करतात.
कित्येकदा स्त्री एका स्त्रीलाच तिचे सगळे सिक्रेटस् सांंगते असं नाही. आणि एखादा पुरुष केवळ पुरूषालाच सिक्रेटस् सांगतो असही नाही.अनेकदा स्त्री-पुरुष हे स्वतःची सिक्रेट सांगण्यासाठी एकमेकांची निवड करतात.पण मग असे सिक्रेटस् सांगण्यासाठी हे एकमेकांचीच निवड का करतात…? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे.
तर नक्कीच यामागे काही कारणं असू शकतात आणि म्हणूनच ते काही सिक्रेटस् सांगण्यासाठी एकमेकांची निवड करत असावेत. तर अशी काही कारणं आपण पाहूयात.
अर्थात स्त्री आणि पुरुष या दोघांच्या स्वभावात निश्चितच वेगळेपण असते.अनेकदा हाच वेगळेपणा एकमेकांना हवाहवासा वाटणारा असतो.त्याच वेगळेपणामुळे एकमेकांमध्ये संवादाची वाट निर्माण होते. आणि याच वाटेवरती तो स्वभावातील वेगळेपणा पाहून मनातील सिक्रेटस् सांगावेसे वाटतात.
काही स्त्रिया एकमेकींजवळ सगळं बोलूनही टाकतात पण मग त्यातलीच कुणीतरी ते सिक्रेट ‘सिक्रेट’ म्हणून ठेवत नाही.मी फक्त तुलाच सांगतेय हं असं म्हणून चार जणींना त्यांच सांगून झालेलं असतं.इतकच नाही तर याउलट चार गोष्टी वाढत्या सांगून सिक्रेटचा विपर्यासच करून टाकतात.
पुरूषांच्या बाबतीत हे फारसं घडत नाही. फार क्वचितच हे घडून येतं.पुरुष एखादी गोष्ट पसरवतील असं दडपण स्त्रियांना अजिबात नसतं.आणि त्यामुळेच स्त्रिया अनेकदा आपले सिक्रेटस् हे पुरुषांना सांगतात.
आता सिक्रेटस् म्हणजे आयुष्यातील कोणतीही गोष्ट असू शकते.अगदी एखादी गोष्ट विचारणही सिक्रेट असतं.”मी हे तुला विचारलय,कुणाला सांगू नको हं…” हे वाक्य प्रत्येकाने ऐकलच असेल.त्यामुळे सिक्रेटस् मध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो.त्यामुळेच तसा विचार करता…………]
पुरुष हे खूपदा practically विचार करतात.आणि स्त्रिया या कित्येकदा हळव्या मनाने भावनिक विचार करतात.त्यामुळे अनेकदा पुरूषांची practical बाजू स्त्रियांना मान्य असते.आणि स्त्रियांमुळेही एखाद्या गोष्टीची भावनिक बाजू पुरूषांना दिसून येते.
समलिंगी आणि भिन्नलिंगी मैत्रीमध्ये बराच फरक असतो.समलिंगी मैत्रीपेक्षा/नात्यापेक्षा भिन्नलिंगी नातं अजून वेगळं असतं.विचार करण्याची पद्धत, बोलण्यातील, समजून घेण्यातील पद्धत वगैरे वगैरे वैविध्यपूर्ण गोष्टींमुळे स्त्री-पुरुष एकमेकांची निवड करतात.
आयुष्यातील स्त्री-पुरूषांची विचार करण्याची पद्धत जाणून घेता येते.कोण-कसं React होऊ शकतं याचा अंदाज येतो.
एकमेकांच मन जाणून घेता येणे.
भावनिक-वैचारिक साहचर्यातून निर्माण होणारे बंध उमजून घेणे.
अनेकदा पुरूषांना अशा काही गोष्टी असतात ज्या की स्त्रियांनाच सांगाव्याशा वाटतात. आणि स्त्रियांनाही एखादी गोष्ट केवळ पुरूषालाच सांगावीशी वाटते.(या दोन्ही गोष्टींना एखादा अपवाद निश्चितच असू शकतो.)
इतकच नाही तर…..शेअरींगसाठी किंवा केवळ संवादासाठी समलिंगी नातच असायला हवं असं नाही. समलिंगी नात्याप्रमाणेच भिन्नलिंगी नात्यातही शेअरींग असू शकतं.हे नकळतपणे स्त्री-पुरूषाच नातं सांगून जातं.
त्यामुळेच स्त्री आणि पुरुष एकमेकांना आपली सिक्रेट सांगण्यासाठी एकमेकांची निवड करतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
