Skip to content

“मुले आणि कार्टून चॅनेल….”

“मुले आणि कार्टून चॅनेल….”


माझ्याच घरी नाही पण घरोघरी जिथे जिथे लहान मुले आहेत तिथे तिथ कार्टून चॅनेल हा आवर्जून बघणारी मुले असतात
आपण मोठे मात्र सारखे त्यांच्यावर ओरडत असतो काय ते सारखे कार्टून बघता , त्याचबरोबर ही मुले अतिशय तलीनतेने हे चॅनेल्स बघत असतात आणि आपण म्हणतो आता बास झाले तुमचे कार्टून आम्हाला आमचे चॅनेल्स बघायचे आहेत.
कधी तरी विचार करा हो , अतिशय एकाग्र होऊन पूर्णपणे त्यात रमून ही मुले ते कार्टून बघत असतात पण थोड्या नाराजीने लगेचच आपल्या आवडता चॅनल बघायचा म्हणून निघून जातात किंवा लगेच रिमोट आपल्याकडे देऊन रिकामे होतात,
मी माझ्या मुलींच्याबरोबरच इतर लहान मुलांना विचारले की हे का आवडते तुम्हाला तर ते व्हिडिओस खूप फनी असतात, गंमत जम्मत असते त्यात , त्या कार्टून मधले हे हे character खूप आवडते , रोज काही तरी वेगळा विषय असतात
पालक आणि आजी आजोबा या सगळ्यांनी विचार करण्याजोगे आहे
1 मुले  अतिशय तल्लीन होऊन बघतात ,म्हणजे एका जागी  बसण्याची सवय लागते तसेच consentration वाढते, आणि सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे कल्पनाशक्ती वाढते
2 आज काल मुले हा क्लास झाला की तो , तो झाला की अजून दुसरा नाही तर होम वर्क यातच गुंतून पडतात, यात त्यांनाही कुठे तरी रिलॅक्स व्हावेसे वाटते , म्हणून ते ही कार्टून चॅनल बघत खूप रिलॅक्स आणि फ्रेश होतात
3 हा हे प्रमाण जर अति झाले तर मात्र मुलांच्या अभ्यासावर , आणि इतर गोष्टींवरही विपरीत परिणाम होतो.
4 मुलांना जर हे चॅनेल बघण्यापासून विरोध केला , चिडचिड केलीत तर ती तशीच रेऍक्ट होणार , एक तर ती पण चिडचिड करतील, तुम्हाला ही आवडते चॅनेल बघू देणार नाहीत किंवा तुमच्या संगण्याकडे दुर्लक्ष करून आवडते चॅनेल बघतच राहणार
5 याउलट थोडा वेळ मोठ्यांनी त्यांना आपणहून ते बघण्यास परवानगी दिलीत , स्वतः त्यांच्या सोबत बसलात आणि एन्जॉय केलेत तर त्यांनाही ते नक्कीच आवडेल आणि ती आपणहून थोड्या वेळाने ते बंद करून अभ्यासाला बसतील , इतर गोष्टी आवडीने करतील
6  कोणती गोष्ट वाईट नसते फक्त त्याचा अतिरेक झाला की मात्र ती घातक ठरू शकते
थोडे मुलांसारखे वागून बघा , त्यांच्या दृष्टीने विचार करून बघा
***
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on ““मुले आणि कार्टून चॅनेल….””

  1. कार्टून बघण्याविषयी काही नाही ते पहावं.पण मला वाटतं आजकाल कार्टून्स चॅनल ला पण सेन्सॉर शिप हवी. Tom and Jerry सारखे कार्टून मध्ये दोंघाची मारामारी होते एकमेकांना लागतं पण ते काही काही कारस्थाने करतात पण पुन्हा उभे राहतात. त्यामुळे मुलांना वाटतं आपण एकमेकांना मारलं तरी लागत नाही असेच वाटतं. आणि डोरेमॉन मधला नोबिता तो ढब्बू मुलगा त्याच्या शिजुका बद्दलची आवड मग आपल्या ला पण कुणीतरी अशी मैत्रीण हवी असे वाटते.ज्या वयात या बद्दल आपल्याला काही माहिती नसते.. माझी मुलगी प्रत्येक कार्ड तयार करताना ♥️ बनवायची कारण ते सीरियल मध्ये दाखवतात.
    वय वर्षे 6 असणारी मुले बॅगेत मुलीला द्यायला रिंग घेऊन येतात .हा सुद्धा एक cartoons पाहण्याचा परिणाम आहे.relax व्हायचे असेल तर आई बाबा खाली खेळायला किंवा घरी त्यांच्या बरोबर बसून टीव्ही पाहताना या गोष्टी समजून सांगायला पाहिजेत

  2. हा लेख वाचून झाल्यावर बरेचशे मुलांनाविषयी चे गैरसमज माझ्या मनातुन दुर झालेत. धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!