Skip to content

चाळीशी क्रॉस केलेल्या पती-पत्नींनी आपापसातले मधुर संबंध टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?

चाळीशी क्रॉस केलेल्या पती-पत्नींनी आपापसातले मधुर संबंध टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


पती पत्नी; एकमेकांचे आधारस्तंभ, एकात्मिक अस नात. कारण हे फक्त दोन जीव नसतात तर दोघांचं मिळून झालेलं एक मन असत. म्हणून लग्न झालेल्या व्यक्तींना कधीही वेगळं न संबोधता जोडपं म्हटल जात. एक जोडी. जोडी ही एकमेकांनी बनलेली असते. त्यातल एक जरी खाली वर झालं तरी परिणाम दोघांवर होतो. त्यामुळे पती पत्नी मधील संबंध हे खूप महत्वपूर्ण आणि नाजूक असतात. हा नाजुकपणा त्यांनी टिकवला तर तो भक्कम होतो.

पण अनेकदा अस होताना दिसत की एका विशिष्ठ वयानंतर नवरा बायकोच्या नात्यात थोडाफार फरक जाणवतो. सुरुवातीचा नात्यातील उत्साह, तो नवीनपणा कुठेतरी लोप पावतो. याचा असा अर्थ नाही की त्यांच्यात प्रेम नसत. प्रेम जरी असल तरी ठराविक काळानंतर नाती बदलत गेल्याने प्राधान्य क्रम बदलत जातात. त्याने नवरा बायकोचं म्हणून एक वैयक्तिक विश्व असत ते विस्कळीत झाल्यासारखं होत. विशेषत: दोघांनीही चाळिशी पार केली की नात्यातला हा फरक जाणवू लागतो. या वयात मुल मोठी झालेली असतात, एकमेकांसोबत पण अनेक वर्ष घालवलेली असतात त्यामुळे बराचसा वेळ हा मुलांवर केंद्रित होतो. त्यातून सुरुवातीचा नात्यातला स्पार्क, उत्साह, एक खेळकरपणा, मधुरपणा जाऊन तिथे बऱ्याच अंशी एक पालकत्वाचा पोक्त पणा येतो. अनेकांना तर जे काही आहे ते मुलांभोवती अस वाटू लागत.

याने होत काय पालक म्हणून ते जरी एकत्र असले तरी नवरा बायको म्हणून त्यांच एकत्र अस विश्व राहत नाही.हे बदल त्या नवरा बायकोला स्वतःला पण जाणवत असतात. अस वाटत असत आपले ते जुने दिवस परत यावेत. पण नेमके त्यासाठी काय करावं हे लक्षात येतं नसत आणि तितका वेळही नसतो. म्हणून यावर फक्त विचार करून फायदा नाही तर प्रत्यक्ष रित्या काहीतरी करण्याची आवश्यकता असते. काही नवीन गोष्टी शिकून, काही बदल करून चाळिशी पार केलेले पती पत्नी त्यांच्यातील मधुर संबंध टिकवू शकतात. ते कोणते ते पाहू:

१. दोघांसाठी असा वेगळा वेळ काढा: लग्न होऊन खूप वर्ष झाली की जस आधी म्हटल प्राधान्यक्रम बदलत जातात. नाती, जबाबदाऱ्या वाढत असल्याने नवरा बायकोला एकमेकांशी नीट बोलायला, वेळ घालवायला पण मिळत नाही. सर्व वेळ मुलांमध्ये, ऑफिस किंवा अन्य कामांकडे निघून जातो. यातून एक छान मनमोकळ बोलण राहून जात. म्हणून सर्वात आधी महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर नवरा बायकोने एकमेकांसाठी वेळ काढणे. त्यात तुम्ही मस्त गप्पा मारा, तुम्हाला जे आवडत त्यावर बोला, लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातले क्षण आठवा. त्या आठवणी ताज्या करा. हा जो वेळ असेल तो फक्त तुमचा असेल. यामध्ये मुल, काम, फोन काहीही येणार नाही.

२. एखाद्या लांब सुट्टीवर जा: बऱ्याच जणांना अस वाटत की आता या वयात आम्ही काय फिरायच? हे आमचं वय आहे का? या सर्व तरुण पणात करायच्या गोष्टी. तर हा चुकीचा समज आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसत. ते शेवटपर्यंत टिकत जर आपण तसा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या पार्टनर सोबत एखाद्या छान ट्रिप वर जाण तुम्हाला परत ताजतवान करत. सुरवातीचे दिवस तुम्ही परत एकदा जगता. आनंद घेता. आता इथे मुल काय म्हणतील, आपल्याला हसतील अस वाटून घेण्याचं काही कारण नाही. अनेक मुल तर हौसेने आपल्या आई वडिलांसाठी अशी ट्रिप प्लॅन करतात. त्यामुळे अश्या ट्रीप नक्की कराव्यात.

३. जेवणाच्या तसेच झोपण्याच्या वेळा सारख्या ठेवा: अनेक जोडपी त्यांच्या त्यांच्या कामात इतकी व्यस्त असतात की ते ना जेवताना एकत्र असतात ना झोपायच्या वेळी. कोणाचाच कोणाला ताळमेळ नसतो. अस न करता जाणीवपूर्वक एकाच वेळी जेवण घेण्याचा प्रयत्न करा. या वेळी सर्व एकत्र असतात. मस्त बोलण होत, दिवसभर कोणी काय काय केलं हे समजत. झोपण्याची वेळ एकच असावी कारण हा वेळ फक्त नवरा बायकोचा असतो आणि नवरा बायकोमध्ये लैंगिक जीवन पण असत. तेही तितकच महत्वाचं आहे. त्याने जवळीक वाढत असते. पण जर बेड टाईम च वेगळा असेल तर नवरा बायकोला एकमेकांना वेळच देता येत नाही. ज्याच्या त्याच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होतो.

म्हणून ते चांगलं ठेवण्यासाठी बेड टाईम एक असावा. कारण या वयापर्यंत एकमेकांच्या आवडी निवडी वैगरे समजलेलं असत. त्यामुळे सुरवाती सुरवातीला असणारा लाजेरेबुजरेपणा राहत नाही, नवरा बायको अजून जास्त कंफर्टेबल असतात. आणि या वयात हे असल वागणं आपल्याला शोभत नाही अस वाटून घेण्याची पण काही गरज नसते. कारण जस मनाच प्रेम आहे तसच शारीरिक प्रेम असत आणि तेही गरजेचं असत. ती व्यक्तीपण आपल्या हक्काची असते. म्हणून वय वाढल तरी तुमचं नात हे लग्नाच्या सुरुवातीला जस सळसळ त होत तसच असूद्या.

४. एकमेकांचे छंद पूर्ण करा: लग्न हे वेगवेगळ्या परिस्थिमध्ये झालेले असत. यामध्ये नवरा बायकोचे अनेक छंद अनेक अश्या गोष्टी ज्या त्यांना पूर्ण करायच्या असतात त्या राहून गेलेल्या असतात. म्हणूनच त्या गोष्टी परत जाणून घेऊन नवरा बायकोने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यातून आपण जे काही मागे सोडून दिलं होत, जे अर्धवट राहील होत ते पूर्ण झाल्याची जाणीव होते आणि आपल्या पार्टनर ने ते लक्ष्यात ठेवून आपल्याला पूर्ण करायला मदत केली यासाठी मनात त्याबद्दलच प्रेम वाढत.

५. एकमेकांच्या achivememts सेलिब्रेट करा: आयुष्याच्या या वळणावर अनेक गोष्टी मग ते नवरा बायको म्हणून असेल, मुल म्हणून असेल, पालक म्हणून असेल किंवा एक माणूस म्हणून असेल achieve केलेल्या असतात. पण त्यांना विचारात घेणं, त्यांची प्रशंसा करण राहून गेलेलं असत. कारण गृहीत धरण्याच प्रमाण वाढलेलं असत. हे काय तुझ कर्तव्यच आहे अस म्हणून त्याला कमी महत्त्व दिलं जात. अस न करता या ज्या achivements आहेत. एकेमकानी जे काही मिळवलेले आहे किंवा आता जे काही मिळवत आहेत त्याच सेलेब्रेशन करा. मग तो अगदी वाढदिवस पण असू शकतो. कारण एक निरोगी छान खेळकर आयुष्य जगणं ही पण एक achivement आहे.

ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या आणि जर केल्या तर नक्कीच हे नात त्यातली मधुरता टिकून राहील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on “चाळीशी क्रॉस केलेल्या पती-पत्नींनी आपापसातले मधुर संबंध टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?”

  1. खूपच छान! पण समजूतदार पणाच्या अभावामुळे नाते ताणली जातात.

  2. खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

  3. फारच छान लेख आहे आणि याची नितांत गरज होती .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!