Skip to content

शरीर संबंधातील असमजूतदारपणा घटस्फोट होण्यामागे मुख्य कारण बनला आहे का?

शरीर संबंधातील असमजूतदारपणा घटस्फोट होण्यामागे मुख्य कारण बनला आहे का?


टीम आपलं मानसशास्त्र


शरीर संबंध हा विवाह संस्थेचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे मन असेल , भावना , शरीर , सामाजिक गोष्टी , आर्थिक स्थैर्य नसेल , नोकरी नसेल , शिक्षण नसेल , घराचे स्थैर्य नसेल तरी त्या सगळ्याचा परिणाम हा शेवटीं शरीर संबंधावर होत असतो. शरीर संबंधातील असमजूतदारपणा घटस्फोट होण्यामागे मुख्य कारण बनला आहे का? तर ते एक मुख्य कारण आणि त्यासोबत इतर अनेक कारणांचा ही त्यात समावेश असतो. मग घटस्फोट होण्याची अशी काय कारणं आहेत ?

१. शरीर संबंधातील असमजुतदरपणा : हे काही अंशी कारण आहे घटस्फोटाचे . पण असमजुतदरपणा म्हणजे कसा आणि कोणत्या बाबतीत.

A. लज्जा ..बरेचदा स्त्री ही मर्यादाशिल आणि आजपर्यंत झालेले संस्कार यातून थोडी लाजरी , बुजरी असते. आणि पुरुषांच्या अपेक्षेप्रमाणे पटकन शरीरसंबंध आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करत नाही. काही वेळेस तिची इच्छा असेल तरी स्त्री ने कसा पुढाकार घ्यायचा असा विचार करून ती मागे राहते. आणि बरेचवेळा पुरुष या संभ्रमात राहतात की, बायकांना आवडत नाही , त्या पुढाकार घेत नाहीत. दरवेळी मीच का पुढाकार घ्यायचा.

यातून दोघांची इच्छा असून ही शरीर संबंध मोकळेपणाने होत नाहीत.

B. वेळेचा अभाव : काही वेळेस जॉइंट family असते. घरातली सर्व कामे करून स्त्री दमते अशावेळी नवऱ्याला जरी संबंध पाहिजे असतील तरी स्त्री तिथे कमी पडते. जरी झाले तरी असे फ्रेश मूड मध्ये नसते. अशावेळी बरेचदा पुरुषांकडून असमजूतदारपणा दिसून येतो. त्यांना त्या क्षणी इच्छापूर्ती होणे गरजेचे असते.

या शिवाय जागेचा अभाव असेल , घरी मोठी वडीलधारी असतील तरी तेवढा मोकळेपणा आणि वेळ ही मिळत नाही. पण कोणी एकाने जरी ही गोष्ट समजून घेतली नाही तरी वाद विवाद होतात आणि ते विकोपाला गेले तर घटस्फोटाचे कारण नक्कीच बनतात.

C. शरीर संबंधांमध्ये आवड निवड लक्षात घेणे जरुरीचे असते. अगदी सुरुवातीला गप्पा , विनोद , दैनंदिन बोलणे सुरू करत , हळूच हलका स्पर्श , जवळ घेणे , आलिंगन , फोर प्ले , रोमान्स यातून शरीर आणि मन ही तयार होत जाते. आणि मग दोघानाही आनंद आणि अजून उत्साह येतो. हे जर झाले नाही..केवळ जवळ आले लगेच संबंध हे कडकडून भूक लागल्यावर बकाबका खात सुटणे असे नसते. तसे जर झाले. उरकून मोकळे व्हा ही एका कोणाची जरी वृत्ती असेल तरी शरीर संबंधातील असमजूतदारपणा निर्माण होवून घटस्फोट होतात.

D. Social मीडिया वर उपलब्ध असणारे व्हिडिओज , पोर्न बघून त्याप्रमाणे नावीन्य असावे , जोडीदाराने साथ द्यावी ही अपेक्षा असेल . आणि एक कोणी जोडीदार त्या पद्धतीने , अपेक्षेप्रमाणे करण्यास तयार नसेल , कमी पडत असेल किंवा दोघेही समजुतीने मध्य गाठण्यास तयार नसतील तरी हे कारण घटस्फोटाच कारण होवू शकते.

२. मन , भावना ,गरजा समजून घेण्यास कमी पडत असतील , वैचारिक मतभेद असतील , स्वभाव :

एकमेकांची मने जुळत नसतील ..थोडक्यात ट्युनिंग जमत नसेल. एकमेकांच्या भावना समजून घेणे जमत नसेल. गरजा काय आहेत ..अगदी एकमेकांना एकांत वेळ मिळणे असेल किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या गरजा तिथे समजून घेण्यास कमी पडले..किंवा एकमेकांच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील . तरी त्यातून मध्य गाठणे गरजेचे असते. पण आपल्याच विचारावर दोघेही किंवा एक कोणी अडकून राहिले .ठाम राहिले तरी असमजूतदारपणा वाढतो.आणि या सगळ्याचा परिणाम मनावर , भावनांवर झाला की आपसूक च शरीर संबंधांवर ही परिणाम होतो. मनात कुठे तरी एक तक्रार ,असमाधान असते. त्याचा शरीर संबंधांवर आपोआप च परिणाम होतो. एकमेक स्वभाव जुळवून घेत नसतील तरी ही घटस्फोट घेण्याकरिता हे कारण पुरेसे असते.

३. आर्थिक स्थैर्य नसेल तरी सतत insecure फिलिंग येत असते. आणि वारंवार तेच घडत असेल तर समजून घेण्याची मानसिकता राहत नाही.

४. व्यसन : – दोघांपैकी एक कोणी व्यसनी असेल मग कधी दारू , जुगार असेल तर कधी बाहेर संबंध दोघांपैकी कोणाचेही. तरी त्याचा परिणाम शरीर संबंधातील असमजूतदारपणा निर्माण होण्यास कारणीभूत होतो.

५. दोन भिन्न कुटुंबीय असल्याने संस्कार , आणि राहणीमान यात फरक असतो. काही वेळेस प्रेम विवाह असेल , जाती , पोटजाती यातला फरक ही अनेकवेळा तफावत निर्माण करतो.

व्यक्ती मग ती स्त्री असो पुरुष असो त्यात केवळ शरीर असे नसते. मन, भावना , आवडी निवडी , स्वभाव , सहनशीलता, आपलेपणा , ओढ अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात असतो. पण सगळ्या गोष्टी मिळून परिणाम हा मेंदू मधील प्रक्रियेवर होत असतो. आणि मेंदू कडून सकारात्मक किंवा नकारात्मक सूचना मिळत असतात. त्यामुळे जर मन , स्वभाव , भावना यांच्यात असमतोल असेल तर त्याचा परिणाम शरीर संबंधांवर होतोच आणि त्यातून ते घटस्फोट घेण्याचे मुख्य कारण बनते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “शरीर संबंधातील असमजूतदारपणा घटस्फोट होण्यामागे मुख्य कारण बनला आहे का?”

  1. खूप छान अतिशय वास्तविकता दाखवली आहे बरोबर आहे कारणे

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: