Skip to content

मुलीला वडिलांचं आणि मुलाला आईचं आकर्षण का निर्माण होतं ??

मुलीला वडिलांचं आणि मुलाला आईचं आकर्षण का निर्माण होतं ??


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मुलींना नेहमी पापा की परी म्हटल जात तसच मुलांना आईचा लाडका, तसच Mama’s boy म्हटलं जातं. हे बऱ्याच अंशी खर देखील आहे. मुलगी ही आपल्या बाबांची लाडकीच असते. आईपेक्षा ती जास्त करून आपल्या वडिलांच्या जवळ असते. तिच्यासाठी तिचे वडिलच जगातील बेस्ट बॉय असतात. म्हणूनच अस म्हटल जातं की प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यात आपल्या वडिलांना पाहत असते. तिला वाटत असत की आपला नवरा पण आपल्या बाबांसारखा असावा. याचं कारणच हे आहे की ती आपल्या बाबांच्या तेवढी जवळ असते. कन्यादानाच्या वेळी एरवी धीरगंभीर तसेच कठोर वाटणारे बाबा ढसाढसा रडतात. अस असत बाप आणि मुलीचं नात.

अश्याच पद्धतीचं आई आणि मुलाचं नात असत. मुलाचं सर्वात पहिलं प्रेम कोण असत तर ती असते त्याची आई तसच आईच शेवटचं प्रेम म्हटल जात ते तिचा मुलगा. मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आईसाठी लहान राहतो आणि तिचा तेवढाच लाडका देखील राहतो.
पण हे आकर्षण, हे प्रेम येत कुठून? मुलीला लहान वयातच आपल्या वडिलांचं आकर्षण का निर्माण होत? तसच मुलाला आपली आई का आकर्षक वाटते?

तर याच उत्तर दडलं आहे फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये. मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्रॉइड याच खूप मोठे योगदान आहे. त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जातात. याचं कारण त्यांनी मानवी मनाचा खूप खोलवर अभ्यास केला. ज्यामध्ये त्याने मनाच्या विविध अवस्था, त्याचे टप्पे तसंच अनेक बऱ्याच गोष्टी मांडल्या. ज्यामध्ये येतात विकासाच्या मनोलैंगिक अवस्था. ज्याला psychosexual stages of development असं म्हटलं जातं. फ्रॉइड च्या मते, जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती या पाच प्रमुख अवस्था मधून जात असते. ज्यात मुख कामुकता, गुद कामुकता, शैश्नवावस्था, काम अव्यक्तता काळ आणि जनन कामुकता अश्या पाच अवस्था असतात. फ्रॉइड च्या मते, प्रत्येक व्यक्ती या पाच अवस्थांमधून जात असते.

तर या मधीलच एक अवस्था म्हणजे शैश्नवावस्था जी वयाच्या ३-६वर्षात विकसित होते. या अवस्थेत बालकाचे लक्ष हे आपल्या लैंगिक इंद्रियाकडे केंद्रित होऊ लागते. ते आपल्या इंद्रियाला हाताळून सुख मिळवू लागते आणि याचा वयात निर्माण होतात पित्रुभाव गंड आणि मातृभावगंड. यामध्ये मुलाला आपल्या आईविषयी आकर्षण निर्माण होऊन बाबा शत्रू वाटू लागतात. तसच मुलीला बाबांविषयी आकर्षण निर्माण होऊन आपली आई प्रतिस्पर्धी तसच शत्रू वाटू लागते.

फ्रॉइड ने पितृभावगंडाला Oedipus complex असे नाव दिले आहे. जे एका ग्रीक पुराणकथेतून येते. ज्यामध्ये अजाणतेपणी तो राजा आपल्या वडिलांना मारून आपल्याच आईशी लग्न करतो. यावरून फ्रॉइड ने याला
Oedipus complex असे म्हटले आहे.

हीच भावना जेव्हा मुलीच्या मनात जेव्हा आपल्या वडिलांविषयी निर्माण होते त्याला कार्ल युंग याने Electra complex म्हटले आहे. वडिलांकडून मिळणाऱ्या प्रेमात आई भागीदार होते अस वाटून इलेक्ट्रा आपल्या भावा करवी आपल्या आईला मारण्यास भाग पाडते अशी एक पुराणकथा आहे. यावरूनच या कॉम्प्लेक्स ला Electra complex असे नाव पडले. फ्रॉइड च्या म्हणण्यानुसार या अवस्था जर नीट पार पडल्या नाहीत. यांचे चुकीच्या पद्धतीने दमन झाले तर त्यातून नंतर मनोविकार निर्माण होतात. जरी फ्रॉइड ने या अवस्था मांडल्या असल्या तरी त्याच्या या सिद्धांतावर बरीच टीकादेखील झाली आहे.

पण तरीदेखील मानसशास्त्रमधील त्याचे योगदान आणि त्याने मनाचा सखोल अभ्यास करण्याची जी एक पायाभरणी केली ती नाकारता येणार नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी अनेक मनोविकार त्यांची कारण, मुळ शोधून काढण्यासाठी ही थिअरी वापरली जाते. त्यामुळे याला अजूनही कुठेतरी महत्त्व आहे अस म्हटल पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मुलीला वडिलांचं आणि मुलाला आईचं आकर्षण का निर्माण होतं ??”

  1. सुंदर ज्ञानवर्धक माहिती, जबरदस्त

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!