Skip to content

आयुष्य एकदाच मिळतं…जगुया तर मग !!

आयुष्य एकदाच मिळतं…जगुया तर मग !!


सर्व महीलांना समर्पित!!!!!

निडर_मन_झाले…..?

कित्ती बदल होतात ना आपल्यात काळानुसार… वेळेनुसार.
नविन लग्न झालेलं असतं तेव्हा कसं सशा सारखं रहात असतो आपण.. कुणी काही बोलु नाही म्हणुन जीवाचा आटापिटा करून सगळ्यांना खुश ठेवायचो…. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे…. मनात कायम एक भिती ठेवुन जगत होती आपली पिढी.

पण हे सगळं करुन करुन मन कधी निर्ढावतं ते आपल्यालाच कळत नाही..?आपण कितीही केलं तरी लोक स्वतःचं स्वतःलाच चांगलं म्हणुन घेतात हे जेव्हा आपल्याला कळतं ना मग आपणही निर्ढावतो,आणि आपल्या लाही हे एकच आयुष्य मिळालं आहे जगण्यासाठी ते ही जर दुसर्‍याच्या मर्जीने जगलं तर मग उपयोग काय या जन्म मरणाच्या फेऱ्याचा…?? ?

असं म्हणत बिनधास्त जगते मी हल्ली….
पुर्वी सडा रांगोळी वगैरे करायचे.. आता सणावाराला करते……सकाळीच उठले पाहिजे हा नियम मोडुन आता सुट्टीच्या दिवशी थोडं झोपलं पाहिजे हा नविन नियम अंगिकारलाय मी.. कारण जन्म चाललाय अपुर्ण झोप सोडुन उठण्यात… मग एका सुट्टीच्या दिवशी नाही मी उठत सकाळी….इतकं छान वाटतं म्हणुन सांगु… ?

लवकर आंघोळ करावी.. शिकले होते कधीतरी… अर्ध स्वच्छतेचं काम आंघोळ झाल्यावर करायचे.. पुन्हा घामाघुम होऊन जायचे पण आता सगळं स्वच्छतेचं काम करुन बिनधास्त दुपारी एक वाजता आंघोळ करते रविवारी…

आधि काही खावंसं वाटलं तरी कसं कुणाला सांगावं असं वाटायचं.. आता नवऱ्याशी भांडुन काय हवं ते खाते…. कुणाशीही शेअर न करता…. ?कारण त्याच्या बरोबरीने किंबहुना जास्तच कष्ट करतो आपण संसारात…
कोण काय म्हणेल..?? हा प्रश्नच मनात येत नाही माझ्या हल्ली…. कोणाला काय म्हणायच म्हणा.. जे आहे ते असं आहे…. जे नाही ते दाखवायचा अजिबात प्रयत्न करत नाही आता…..

पुर्वी हे खुप वाटायचं…….
सुट्टी असली कि मस्त पेपर वाचते.
नवरा म्हणाला नाश्ता बनवु का??? बिनधास्त हो म्हणते…… आपल्यालाही पाहिजे कि हो कधीतरी बदल…..

आधि सगळ्यांना गरमागरम खायला घालायचे नी मी सगळं झालं कि खायचे आता आधि गरमागरम खाऊन घेते मग बाकिचं बघते… ?
आवरावं वाटेल तेव्हा आवरते… प्रत्येक काम झालं कि थोडा ब्रेक घेते.. ?टेरेसवर फेरफटका मारुन येते… खुर्ची वर निवांत डोळे बंद करून बसते……
जुने गाणे लागले की बिनधास्त मोठा आवाज करुन ऐकते…. ?…
आहेत तरी काय हो आपल्या अपेक्षा……??

“दिल है छोटासा छोटिसी आशा…”
असं तर आहे…….

पुर्वी आपल्या जीवावर सगळे आरामात जगायचे आता मी पण तकतकच करत नाही…. निवांत जगते…. सगळे करत असतील तरच स्वच्छता करते… नाहीतर जे आहे ते मस्तच आहे म्हणते… ?
आणि मस्त गाणे म्हणते…

” निडर मन झाले…….मधुर घन आले….”


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया


Online Counseling साठी !

क्लिक करा

3 thoughts on “आयुष्य एकदाच मिळतं…जगुया तर मग !!”

  1. Mastach,, mi hi Asach karate…zali ata 20 varshe lagnala….mansokt jagayche,, mule hi mothi jhali ahet….no dependency..

  2. खुप सुरेख पहिल्या स्त्रिया प्रथम नवर्‍याला मग मुलांना खायला द्यायचे शेवटी उरले तर खायचे नाही तर शिळेपाके खाऊन पोट भरत असे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!