Skip to content

बेडवर एकमेकांची स्वर्गसुख घेण्याची इच्छा हळूहळू कमी का होत जाते ?

बेडवर एकमेकांची स्वर्गसुख घेण्याची इच्छा हळूहळू कमी का होत जाते ?


काव्या धनंजय गगनग्रास


संसारात शारीरिक संबंधाला खूप महत्त्व आहे. हा संबंध दोन व्यक्तींना शरीराने जवळ आणतोच तसेच मनाने ही ते जवळ येतात. याचे शारीरिक तसे मानसिक फायदेही आहेत. ताण कमी होणे, मन आनंदी होणे, याने प्रतिकार क्षमता पण चांगली होते. जोडीदाराविषयी प्रेम, आत्मीयता, विश्वास अधिक वाढतो. पण शारीरिक संबंधांतून मिळणारे हे स्वर्गसुख, याची इच्छा हळू हळू कमी होत जाते. अस का होत? प्रेम नसतं का? तर अस नाही. पण तरीही सुरुवातीचा जो उत्साह असतो तो मात्र मावळतो. अस होत की नवऱ्याची इच्छा असते पण बायको मात्र तयार नसते कधी याउलट पण होत आणि कधीकधी तर दोघांचीही इच्छा कमी होत जाते. शारीरिक संबंध कमी होतात. याची अनेक कारण आहेत. ती कोणती ते पाहूया.

१.पहिलं म्हणजे एकमेकांचा खूप जास्त सहवास. कोणतीही गोष्ट जेव्हा नवीन असते त्यात नावीन्य असत तेव्हा त्याविषयी जास्त ओढ असते. आकर्षण असत. तसच नात जेव्हा नुकतच सुरू झालेलं असत, नवनवीन असत तेव्हा एकमेकांबद्दल वाटणारी जी शारीरिक ओढ असते ती कमी होत जाते. परिणामी इच्छा पण कमी होते.

२.दुसर कारण म्हणजे नात्यात होणारे वादविवाद, संघर्ष. जर जोडीदाराशी सतत वाद होत असतील, तंटे होत असतील, मतभेद असतील तर त्याचा बाकीच्या गोष्टीवरही परिणाम होतो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे शारीरिक संबंध.

३.तिसर कारण अस की शारीरिक जवळीकता जरी प्रेम, जवळीकता निर्माण करत असेल तरी कधी तेव्हाच जेव्हा यात दोघांचीही पूर्णपणे मर्जी लागते. एकमेकांवर पूर्ण विश्वास लागतो. हे जर होत नसेल तर मात्र इच्छा कमी होते. आणि विश्वास पण कमी होतो.

४.चार आताच जीवन हे खूप धकाधकीचं, धावपळीचं आहे. त्यात नवरा बायको दोघेही काम करत असतात. त्यामुळे कामाचा ताण, इतर टेन्शन, आर्थिक समस्या या सर्व गोष्टी पण मानसिक त्रास देतातच. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होत जाते.

५.पाच बदलत जाणारी नाती. म्हणजे काय जेव्हा बाई एका बाळाला जन्म देते तेव्हा तिचे प्राधान्यक्रम बदलतात. तिचं लक्ष पूर्णपणे बाळाकडे केंद्रित होत. तसेच यावेळी शारीरिक बदलही मोठ्या प्रमाणात झालेले असतात. हॉर्मोन्स बदलत असतात. त्याचाही परिणाम होतो.

६.व्यसन हे एक कारण आहे. संशोधनाने हे सिद्ध केले आहे की अतिप्रमाणात केले जाणारे धूम्रपान, मद्यपान हे लैंगिक इच्छा कमी करते. म्हणून एक आरोग्यदायी जीवन असणे खूप गरजेचे आहे.

७.वय हे एक मोठे कारण आहे. वयानुसार तसेच जसजशी स्त्रीमध्ये रजोनिवत्ती जवळ येऊ लागते तसतसे शारीरिक बदल मोठ्या प्रमाणावर होऊ लागतात आणि लैंगिक इच्छा कमी होत जाते.

८.कोणतंही नातं असो त्यात संवाद खूप गरजेचा असतो. आणि नवरा बायकोच्या नात्यात तर तो खूपच गरजेचा आहे. पण तो जेव्हा कुठेतरी कमी होत जातो. एकमेकांशी जेव्हा नीट बोललच जात नाही तेव्हा बाकीच्या गोष्टी लांबच राहतात. यातून फक्त दुरावा निर्माण होतो.

९. वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या. नवरा बायकोच्या नात्यात बाकीची नाती पण असतात. मग ते बाळ असो किंवा घरातली इतर लोक. यांच्या जबाबदाऱ्या जेव्हा अंगावर पडतात, वाढतात तेव्हा याचा परिणाम वैयक्तिक जीवनावर होतो. लक्ष त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे जास्त लागते.

१०. शारीरिक समस्या असतील जसे की थायरॉईड याचा पण परिणाम होतो. आणि ही समस्या शारीरिक तसेच मानसिक रित्या पण परिणाम करते. याने मूळ स्वींग, उदास वाटण, थकवा येणं असे परिणाम होतात.

११. जीवनशैली. शारीरिक संबंधांमध्ये जीवनशैली पण मोठी भूमिका निभावत असते. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, झोप या सर्व गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. त्या जर नीट नसतील तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तसेच मनावर होतो.

ही काही कारणे आहेत जी सुरुवातीची एकमेकांना शारीरिक सुख देण्याची इच्छा कमी करत जातात. जरी यातून मानसिक, शारीरिक आरोग्य चांगलं करत असतील तरी या संबंधाचा पाया अनेक गोष्टीवर आधारलेला आहे. तो पाया नीट ठेवणे, त्याची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे आहे. ज्यात एकंदरीत दोघांचं नातं सुदृढ असणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे तसेच त्यानुसार योग्य त्या वेळी मदत, मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “बेडवर एकमेकांची स्वर्गसुख घेण्याची इच्छा हळूहळू कमी का होत जाते ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: