वैवाहिक आयुष्यात सुखी, समाधानी शरीरसंबंधासाठी काही टिप्स..!
हर्षदा पिंपळे
वैवाहिक आयुष्य म्हणजे एखादा अपवाद वगळता सर्वांना हवहवसं वाटणारं आयुष्य. वैवाहिक आयुष्य केवळ एका विशिष्ट गोष्टी भोवती फिरत नाही. या वैवाहिक आयुष्यात दोन मनांच मिलन होतं.दोन शरीरांच मिलन होतं.वैवाहिक आयुष्यात इतर गोष्टींप्रमाणेच लैंगिक आयुष्यालाही तितकच महत्त्व आहे.सुखी वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांची जवळीकही तितकची महत्वाची असते.
एकमेकांना पुरेसा वेळ देणही त्यासाठी आवश्यक असतं.परंतु सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना पुरेसा वेळ देणच शक्य होत नाही.आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यात या वेळ न दिल्यामुळेच शक्य होत नाहीत.आणि वैवाहिक जीवनात तर एकमेकांना पूरक वेळच देता आला नाही तर गोष्टी अजूनच अवघड होऊन बसतात.एकमेकांना वेळ न देता आल्यामुळे एकमेकांच्या जवळ नाहीच पण एकमेकांशी निवांतपणे बोलणही होत नाही.
आणि याचाच परिणाम वैवाहिक आयुष्यावर दिसून येतो.वैवाहिक आयुष्यातील लैंगिक जीवनावर दिसून येतो. आपण पाहतो अनेक विवाहित जोडपी ही असमाधानी लैंगिक जीवन जगताना दिसतात.शारीरिक जवळीक साधताना जी मोकळीकता असायला हवी ती मोकळीकता अनेकदा कित्येक जोडप्यात नसते.किंवा अनेकदा वेळेअभावी, कामाच्या ताणामुळे यावर त्याचा परिणाम होतो.
अनेकदा कुठलीही व्यक्ती जर तणावाखाली असेल तर ती सहजासहजी कोणतेही Healthy शरीरसंबंध प्रस्थापित करू शकत नाही.कारण व्यक्ती तणावाखाली असल्याने त्याचा पूर्ण परिणाम मेंदूवर होतो.ताणतणावामुळे शरीरातील हार्मोन्सवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि अशा स्थितीत Healthy शारीरिक संबंध निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतात.
खरतरं वैवाहिक आयुष्यात असमाधान, निराशा असण्याची कितीतरी कारणे आहेत. तर याच वैवाहिक आयुष्यात सुखी, समाधानी शरीरसंबंधासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे—
मोकळेपणाने बोलणे- सर्वप्रथम दोघांनी केवळ भाजी कोणती आवडते नी कोणत ठिकाण आवडत या विशिष्टच आवडीनिवडी विचारात न घेता एकमेकांमध्ये प्रत्येक गोष्टीत मोकळा संवाद ठेवायला हवा.लैंगिक जीवनाविषयी मोकळेपणाने बोलायला हवं.याने तुमच्यात एक सलोखा तयार होऊन वैवाहिक जीवनात शरिरसंबंध प्रस्थापित करताना मोकळेपणा जाणवेल.एकमेकांच्या लैंगिक इच्छा, आवडी-निवडी ,कल्पना याविषयी मोकळेपणाने संवाद साधा.एकमेकांना काय हवं नी काय नको हे जाणून घ्या.
एकमेकांना पुरक वेळ-धकाधकीच्या जीवनात एकमेकांसाठी वेळ काढणच अवघड झालय.आजकालच्या शिफ्टवाल्या लाईफस्टाईल मुळे एकमेकांना वेळ देणं अवघड होऊन बसलय.कधी एकाची डे शिफ्ट तर कधी एकाची नाईट शिफ्ट असते.यामध्ये एकमेकांशी निवांतपणे बोलणे,एकमेकांशी जवळीक साधणे या सगळ्याला वेळच मिळत नाही. त्यामुळे शक्य होईल तितकं *एकमेकांना किमान थोडा तरी वेळ द्या.
एकमेकांच्या संपर्कात राहणे-जोडीदार कितीही दूर असेल तरी त्याच्या कायमस्वरूपी संपर्कात राहणे केव्हाही फायदेशीर ठरते.शरीराने दूर असूनही मनाने एकमेकांच्या जळव आहोत याची जाणीव एकमेकांना करून देणे.
चांगल्या वातावरणाची निर्मिती- शारीरिक संबंध हे आजूबाजूच्या वातावरणावरही अवलंबून असतात. म्हणजे आजूबाजूच वातावरण जर चांगल असेल तर शरीर चांगल्या प्रकारे साथ देत.त्यामुळे वातावरणाची,किंवा खोलीची वातावरण निर्मिती देखील प्रसन्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी खोलीत मंद प्रकाश ,एखादं छानसं म्युझिक, फुलांच दरवळ वगैरे अशाप्रकारे वातावरण आनंदी नी फ्रेश केल्यास याचा परिणाम निश्चितच सकारात्मकपणे लैंगिक आयुष्यावर होऊ शकतो.अशा वातावरणात मन प्रसन्न असतं.आणि मन प्रसन्न असलं की शरीरही तितक्याच उत्साहाने साथ देतं.
एकमेकांना अलिंगन देणे-दिवसभरात कितीही थकला असाल तरी एकमेकांना अलिंगन द्यायला विसरू नका.आणि एका मिठीत मानसिक/शारीरिक थकवा हळुहळू नाहीसा होऊन रिलॅक्स वाटतं.अलिंगनाला सगळ्यात सोपा स्ट्रेस बर्स्टर म्हणून पाहिले जाते.त्यामुळे हे अलिंगन देखील सुखी, समाधानी शरीरसंबंधासाठी उपयुक्त ठरू शकते.
भावनिक नाते घट्ट करणे- शरीर एकत्र येण्यासाठी केवळ दोन व्यक्तीच गरजेच्या नसतात तर त्याचबरोबर त्यांच मनामनाने एकत्र असणही गरजेचं असतं.मनोमिलन जितकं घट्ट असेल तितकच शरीर नैसर्गिकरित्या जवळ येईल. एकमेकांमध्ये असणारं प्रेम-मोकळीक सुखी शारीरिक संबंध निर्माण करते.शारीरिक जवळीक ही एक गरज आहे असं म्हणून त्यात प्रेम नसलं तरी चालतं असं जर वाटत असेल तर ते योग्य नाही. याऊलट जर नात्यात प्रेम-जिव्हाळा असेल तर शरीरसंबंध हे healthy होण्यास जास्त मदत होते.
कोणत्याही तणावात ,थकलेल्या अवस्थेत,आणि लादलेल्या गोष्टीत शरीरसंबंध कधीच समाधानी असू शकत नाही. तणावामुळे, थकलेल्या अवस्थेत शरीरसुख अनुभवताना अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. तर याऊलट तुम्ही जितकं आनंदी असाल तितकच तुम्ही शरीरसुख चांगल्या प्रकारे अनुभवू शकता.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
