
बस फक्त आजचा दिवस!
मला एक मस्त मॅजिक मंत्र सापडलाय! हो खरंच मॅजिक मंत्र, दररोज जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल, मनाचा गोंधळ उडेल, निगेटिव्ह मन पॉझिटिव्ह मनावर वरचढ ठरायला लागेल तेव्हा फक्त एकच मंत्र म्हणायचा, “बस फक्त आजचा दिवस!”
• सकाळी अलार्म वाजूनही व्यायामाकरिता गादीवरून उठवंस वाटतं नाहीए? सिम्पल, मनाला सांगायचं बस फक्त आजचा दिवस! उद्या आपण निवांत झोपू ? (जो उद्या कधी येतंच नाही)
• मस्त डायटिंग चालू आहे आणि तंदुरीपासून ते केकपर्यंत तुम्हाला ओढून घेतंय, मनाला सांगायचं, बस फक्त आजचा दिवस! खाऊयात ना रविवारी सगळं?
• आज ऑफिसला जायचा कंटाळा आलाय? बस फक्त आजचा दिवस! उद्या सुट्टी घेऊयात ना?
• आवडत्या व्यक्तीबरोबर अबोला आहे? बस फक्त आजचा दिवस बोलून बघायला काय हरकत आहे? नाही का??
गंमत म्हणजे “बस फक्त आजचा दिवस!” चा मॅजिक मंत्र मला व्यायाम करायला उठायचा कंटाळा येतो म्हणून मिळाला! “बस फक्त आजचा दिवस!” जेव्हा मी ‘व्यायामाला दांडी’ म्हणून वापरायला लागले तेव्हा म्हटलं, चला उलट करून बघूयात! आणि काय सांगू? “दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी” अंजारून गोंजारून त्याला “फक्त आजचा दिवस” असं सांगितलं की (उद्या सुट्टी?) मानून धम्माल ऐकायला लागलंय मन!
खरंच सांगते, दररोज फक्त आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा की बाकी सगळं सोप्प असतं!
बस फक्त आजचा दिवस!
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

