Skip to content

पत्नीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या ८ सोप्या टिप्स!

पत्नीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या ८ सोप्या टिप्स!


मयुरी महेंद्र महाजन


स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं, ते दोन्हीही मजबूत असणे, आणि बरोबर सोबतीने चालणे महत्त्वाचे आहेत, पती व पत्नी आयुष्यातील इतके अनोखे व सुंदर नाते आहे, त्याला खरंतर कुठे तोडच नाही, कारण ते प्रेमाचेही आहे, सलोख्याचे ही आहे ,आणि आईबाप होण्याच्या ममत्वाचेही आहेचं, परंतु दांपत्य जीवनाचा पूर्णपणे आनंद तीच माणसं अनुभवतात ,ज्यांना नात्यांची , माणसांची व आपल्याला लाभलेल्या सुखाची जाण असते, आपल्या नात्यात सन्मान, आदर व एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल, तर आपले नाते नक्कीच खुलणार, बहरणार,,,

नात्यांना खरं तर फक्त जिव्हाळ्याची गरज असते ,तसं तर या प्रश्न स्रीचा आहे, म्हणून सांगावस वाटते, की स्रीला कुठल्या महागडा मॉलमध्ये, महागडा गाडीत, बंगल्यात फिरायला आवडत असले, तरी आपल्या नवऱ्याच्या कष्टाची तिला नेहमीच कदर असते ,आपण आपल्या पत्नीसाठी काही दुसरे करायची आवश्यकता नाही, फक्त प्रेमाने तिची विचारपूस करा ,कशी आहेस ….दिवसभर धावपळ करून दमत असशील…. असं म्हणा…

बघा संपूर्ण दिवसभराचा शीण निघून जाईल, प्रेमाने तिला मिठी मारा, आणि म्हणा, कीती करतेसं माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आपल्या संसारासाठी करते, तिच्या हातची अळणी भाजी सुद्धा छान आहे, असं म्हणून जेव्हा तिला ती भाजी अळणी लागते ,तेव्हा तिच्याप्रती तुमच्या मनात असलेल्या प्रेमाला ती आपल्या स्वतःमध्ये अनुभवते , संसार हा दोघांचा असतो, त्यासाठी असणारे कुठलेही निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा तिच्याही मताला कोणी विचारावं, तिच्या मतालाही घरात प्राधान्य आहे, यातचं तीला स्वर्गाचा आनंद असतो ,आजची स्त्री जरी स्वतःचे कर्तृत्व गाजवत असली, तरी नवरा-बायकोच्या नात्यात तिला कधीही आपले दुय्यम स्थान वाटू नये, याची काळजी प्रत्येक नवऱ्याने घ्यायला हवी, दोघांनाही आपल्या वैचारिक स्वातंत्र्य ,तसेच स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार एकमेकांकडून हवा, जेणेकरून नात्याचं ओझं कुणा ऐकावरती बंधन होऊ नये,

खरतर स्त्रीच आयुष्य गुंतागुंतीचं असतं, माहेर-सासर या दोघ घरांमध्ये तिचं मन आयुष्यभरासाठी अडकलेलं असते, त्यात कितीतरी नवीन चेहरे, त्या प्रत्येकाला सांभाळण्यात प्रत्येकाची मन सांभाळण्यात तिची होणारी दमछाक, फक्त हक्काचा नवरा असतो, तो तरी मन समजून घेणारा हवा ,हीचं तीची आर्त इच्छा, या सर्व प्रपंचात तिला निराशेच्या गर्तेत अडकणे, किंवा त्याला सामोरे जावेच लागते…जरी त्यातील कोणी ते दाखवत नसले तरीही…. आपण आज पाहणार आहोत ,निराशेच्या गर्तेतून पत्नीला बाहेर काढण्याच्या अशा आठ टिप्स ज्या तुम्हाला आपल्या नात्यातील प्रेम द्विगुणित करण्यात मोलाच्या ठरतील….

एक -सर्वप्रथम आपल्या पत्नीचा स्वभाव समजून घेणे गरजेचे आहे, म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ..काही खूप भावनिक असतात, काही एकदम शांत असतात, आपली निराशा कधी जाणवू देत नाही, हे ओळखून घेणे आपल्यासाठी आव्हान असू शकते, त्यासाठी तुमचे दोघांचे संभाषण होणे गरजेचे आहे, म्हणून सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला हीच राहिलं, की विषय कुठलाही असो ,त्या विषयावरती असलेल्या शंका गैरसमज यापासून ते तो विषय पूर्ण क्लियर होईपर्यंत, आपला एकमेकांशी सुसंवाद योग्यरीत्या होणे महत्त्वाचे आहे,

दोन -आपल्याला आपली पत्नी रागीट ,तापट किंवा प्रत्येक वेळी ती काही सांगण्याच्या स्थितीत असल्यावर, तुझं काय रोजचंच आहे …अशी प्रतिक्रिया चुकूनही देऊ नका ,ती तुम्हाला खरच काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही तिचे जीवन साथी या नात्याने किमान ते ऐकूण तरी घ्यावं, तिला काही समस्या असेलं, तर तिचे म्हणणे सर्वप्रथम ऐका, त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता तुम्ही तिच्यासोबत आहात, हा विश्वास तिला वाटू द्या ,

तीन- तुमची पत्नी सर्व कामे जरी नीट करत असली ,तरी तिच्या कामात किंवा वागण्या-बोलण्यात तुम्हाला काही बदल जाणवत आहेत का ???म्हणजेच हल्ली खूप निराशावादी सूर दिसतोय, पहिल्यासारखा उत्साह दिसत नाही, या गोष्टीचे निरीक्षण करा, व त्याची नेमकी कारणे काय आहे, हे जाणण्याचा प्रयत्न करा, मुद्दामून तिला हसवण्याचा प्रयत्न करा,

चार- पत्नी निराशेत आहे, हे समजलं ,तर त्यासाठी तिला दोषी ठरवू नका, तिच्यासोबत बसा… तिच्याशी बोला… मी आहे तुझ्यासोबत कशाला काळजी करतेसं….. बस फक्त हे वाक्य म्हणा, आणि अगदी मनापासून म्हणा, तिला तो विश्वास द्या जो विश्वास ती जगात कायम शोधत असते, की कोणीतरी आहे.. माझ्यासोबत… जे अगदी विश्वासाने ,भक्कमपणे माझ्यासोबत आहे,

पाच -एखाद्या ठिकाणी फिरायला घेऊन जा… आणि खूप काही पैसे खर्च करून पिकनिकला जायची आवश्यकता नाही ,अगदी कुठे जवळ एखादे गार्डन असेल, किंवा चल जेवण झाल्यावर एक फेरफटका मारून येऊ …म्हणून सोबतीचे तुम्ही दिलेले काही क्षण असतील, निसर्गाच्या शुद्ध हवेमध्ये आपल्या सखीला आपण आपल्या आयुष्याचे सोहळे विचारावे, हल्ली तुझं प्रेम कमी झालंयं… की तुझ प्रेमच नाही माझ्यावर…. मस्करीत घेऊन बघा…. हा पण जर कोणी सिरीयसली घेतलं ,तर मात्र येथे गफलत व्हायची ,त्यासाठी स्वभाव पाहून बोला,

सहा- आपल्या पत्नीला बोलण्याची मोकळीक द्या ,म्हणजे ती मोकळेपणाने आपलं सुख दुःख तुमच्या सोबत मांडू शकेल, असे हक्काचे ठिकाण तरी तिच्यासाठी मोकळं असावं, माझी मैत्रीण मला नेहमी म्हणते जर समोरच्या व्यक्तीला आपण तिचे जवळचे व विश्वासाचे वाटत असलो, तरी ती व्यक्ती मोकळेपणाने बोलतेचं…

सात- घर, संसार, मुले व त्यासोबत ती काम करणारी असेलं, तर तिचे काम व सामाजिक बांधिलकी ,अशा कितीतरी गोष्टी एकत्रित सांभाळणारी स्त्री, तीसुद्धा मानवच आहे, या सर्व धावपळीत सर्वांचे सर्व करूनही जर कोणी कोणी तीला ऊणी दुणी केली, तर ते स्त्रियांना खपत नाही, चिडचिड आणि राग अनावर होऊन नंतर त्याचा पश्चाताप यामुळे निराशेची परिस्थिती उद्भवते त्यावेळी जर तो राग बाहेरचा राग घरात नवर्‍यावर निघत असेल, तर त्या ठिकाणी पुरुषांचा कस लागतो, जर पुरुष या ठिकाणी समजून घेणारा असेलं, तर तिला काय झालं चिडायला, जाऊदे आता तू रागात आहे, शांत झालं तुझं, की तुझं बरोबर काय ते सांगशीलं, बायको कितीही रागवली तरी, बहिरेपणाचे सोंग घेऊन …झालं तुझं… मी येतो.. बाहेरून… तोपर्यंत …

आठ -जर तुम्हाला खरच आपल्या पत्नीला निराशेतून काढायचे असेल, किंवा निराशेत जाऊ द्यायचे नसेल ,तर तिचा आनंद कशात आहे, ते शोधा, तिच्या आनंदासाठी तुम्हाला जे करता येईल ,ते करण्याचा प्रयत्न करा, आणि समजा पत्नीला निराशा असण्यामागे जर तिथे जवळचे कोणी तिला सोडून गेले असेल, जसे की आई किंवा वडील तर तुम्हीच तिला आधार आहेत, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी सहज करू शकतो ,आपल्या पत्नीची आवड जोपासा, तिची काळजी घ्या, आणि अधून मधून तिच्याप्रती असलेल्या प्रेमाला व्यक्त करायला विसरू नका ….मग कधी तिला मिठीत घेणे असेल, किंवा मस्त छान चहा बनवायचा असेल, प्रेमाने करून तर बघा ,तुम्ही जितके प्रेम देणारं, तिच्या दुप्पट तिप्पट स्त्री त्याची परतफेड नक्कीच करणारं… कारण तुमच्यामुळे ती आहे, आणि तिच्यामुळे तुम्ही आहेत,

बघा या टिप्स तुम्हाला कशा वाटतात नक्की सांगा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पत्नीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या ८ सोप्या टिप्स!”

  1. Shubhada Satish Sutar

    Khup Chan ani hrudaysparshi bhavnik aatachment ahe yamadhe……Pati-Patni ya natyat kasa perfect bond asla pahije he ya lekhadhe sangitle gele ahe…..😍🤗

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!