संकुचित स्वभावामुळे आपल्या जोडीदाराची प्रगती खुंटते, हे माहितीये का?
सोनाली जे.
संकुचित स्वभाव म्हणजे काय ?? Narrow minded? विशाल मनाचा अभाव . किंवा क्षूद्र वृत्ती.एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. पण वृत्ती फारच संकुचित. आपल्या पूर्ती मर्यादित. केवळ स्व विचार. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. त्याचा जोडीदार काटेरी कॅक्टस होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला,
पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,”मला पण पाणी मिळेल का?” दयाळू कॅक्टस लगेच “हो” म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्याला तोंड दिले.
तात्पर्य: काय तर कोणाच्या दिसण्यातून, कोणाच्या वागण्यातून कोणत्याही व्यक्तीविषयी, वस्तू विषयी त्याच्या मत बनवू नका.आणि आपली वृत्ती , स्वभाव संकुचित बनवू नका. गुलाबाने जेव्हा आपल्या रोजच्या जोडीदाराकडून कॅक्टस कडे पाणी मागतो तेव्हा संकुचित वृत्ती , स्वभाव न बाळगता दिलखुलासपणे , मोकळेपणाने तो गुलाबाला हसत हसत पाणी देण्यास तयार झाला. आपल्या सोबत दुसऱ्याला ही जगण्यास प्रोत्साहन , टिकून राहण्यास प्रोत्साहन ,वाढीस मदत.
हेच जर इथे काटेरी कॅक्ट्स ने संकुचित स्वभाव दाखविला असता. तर त्याचाच रोजचा जोडीदार गुलाब पाण्याविना सुकून गेला असता. परत कधीच न फुलण्याकरिता…
संकुचित स्वभावामुळे आपल्या जोडीदाराची प्रगती खुंटते, हे माहितीये का?
जोडीदार हा संसारात असो , व्यवसायात असो. अथवा खेळात असो , डान्स मध्ये असो ..कुठेही कुठेही जर एक कोणी संकुचित स्वभावाचा असेल तरी प्रगती खुंटते. व्यवसायात एका पार्टनर ने धडाडी ने पुढे जाण्याचा निर्णय घेतला , त्याला आर्थिक सोय , loan यांची तजवीज ही केली. आणि अचानक दुसऱ्या partner ने संकुचित स्वभाव दाखविला की आपण एवढी गुंतवणूक करत आहोत आणि जर नाहीच फायदा झाला तर .
आणि त्यातून त्या पुढे जाण्याला विरोध केला , वाद घातले , पाठिंबा काढून घेतला तर त्याच्या जोडीदाराची व्यावसायिक प्रगती आणि ultimately त्याची ही प्रगती खुंटते च ना !! कारण पुढचा धडाडीचे पावूल न टाकता आहे तिथेच थांबले तर नुकसानच की . कोणतीच रिस्क न घेता आहे ते तेवढेच मर्यादित काम चालू ठेवू हा संकुचित निर्णय ही व्यवसायाच्या प्रगतीला घातक ठरतो.
सुरुवातीला पती पत्नी यांचे नाते खूप चांगले असते. एकमेकांना समजून घेत असतात. मदत करत असतात. मदत घेत असतात. भांडणे झाली , आवडी निवडी यात तफावत असेल तरी समजून घेवून पुढे जात असतात.
एकदाका भांडणे सुरू झा्ली , मीच का समजून घ्यायचे , मनाचा विशालपणा सोडून संकुचित स्वभाव बनत गेला की मग जे खरोखरीच चांगले नातं होत, जे दोघांनी मिळून संसार आनंदाने करण्यात मजा , सुख , शांती , समाधान मिळत होते, कुटुंबाची प्रगती होत होती. ते सगळे सुख , आनंद , समाधान , शांती अचानक बिघडत गेले. तेही केवळ एकाच्या संकुचित स्वभावामुळे.
नवरा ऑफिस मधून घरी उशिरा आला. बरेचदा कामा मुळे उशीर होत असतो हेच डोक्यात ठेवून बायको तिच्या संकुचित स्वभावामुळे जेवून च आला असाल. Office मध्ये सारखेच जास्ती काम असते. मग बाहेरच जेवण. बहुदा सोबत ही चांगली असतं असेल.
नवरा-बायकोच्या भांडणात वैतागून नवरा म्हणाला, ‘‘मी मोठी चूक केली की तुला नीट न बघताच लग्नाला हो म्हटलं.’’ बायकोला प्रचंड वाईट ही वाटले . दुःख ही झाले. रडू ही आले. पण बायकोने केवळ तिचा मनावरचा संयम ठेवला नाही. तिच्या मनाचा मोठेपणा , विशालता दाखविली असती तर हे नेहमीचे वाद झाले नसते..पण तिच्या संकोचीत स्वभावामुळे , समजून न घेण्यामुळे , किंवा संशय ,विसंवाद यातून अंतर निर्माण होते.
जोडीदाराकडून होणाऱ्या अपेक्षाभंगामुळे निर्माण होणारी नाराजी जेव्हा तुम्हाला सहनशीलतेकडून असह्य़तेच्या राज्यात घेऊन जाते तेव्हा तुमचा ताळ सुटतो. त्यातून रागाचा जन्म होतो. आता इथेच रिलेशनल मॅच्युरिटीचा वापर करणे जरुरीचे असते. राग हा लटका, खोटाखोटा ठेवण्याची सवय करणे नितांत गरजेचे असते. जेवढय़ास तेवढा. राग हा रुसवा असावा, संताप नव्हे. हे समजून उमजून घेतले तर सवयीने ते जमायलाही लागते. हिस्टेरियासारखे उद्रेक तुम्ही टाळू शकाल. विसंवादाला बोथट करणे हे यामुळे जमू लागेल. जोडीदाराविषयीच्या रागाने उद्ध्वस्त होणाऱ्या कामजीवनाला सांभाळणे ही तारेवरची कसरत असते.
नात्यात जोडीदाराला स्पेस देणे, मोकळीक देणे अत्यंत जरुरीचे असते. कारण जग हे एकच असले तरी प्रत्येकाचे वेगळे असते.
काही वेळेस पार्टनर मर्यादा खरेच ओलांडून जातात. नावीन्य , कधी सतत घरच्या कटकटीचा कंटाळा येवून , तर कधी वेळच मिळत नसतो जोडीदाराकडून ,त्याची / तिची चूक होते ही पण अशावेळी मनाचा संकुचितपणा , किंवा अजून वाद विवाद करणे टाळावे.
नात्यातील प्रेमाचा ओलावा कमी करणारा दाम्पत्याचा सर्वात जिव्हाळय़ाचा छंद म्हणजे वादविवाद करणे. काळाच्या ओघात या नात्यात संवाद कमी आणि वाद जास्त हे वास्तव जन्माला येत असतं.
बरेचवेळा आपला जोडीदार खरेच खूप चांगला असतो . निर्मल असतो. पण केवळ त्यावर उगीच घेतला जाणारा संशय , संकुचित वृत्ती , काही गोष्टी accept न होणे , न करणे जसे ऑफिस , व्यवसायातील काम करताना सोबत स्त्री वर्ग ही काम करत असतो. मग नसतील ते विचार ही मनात घर करत जातात. कामानिमित्ताने कुठे एकत्र गेले तरी संशय , संकुचित स्वभाव यातून गैरसमज च निर्माण होतात. विश्वासाला तडा जातो.
पती-पत्नींमधील उदासीनता , निराशा खिन्नता , विसंवाद, एकमेकांविषयी तिटकारा इत्यादीमुळे जोडीदाराविषयी कामभावनाच काय पण आपुलकीही राहात नाही. काही वेळा तर टोकाची घृणाभावना तर नातंच डळमळीत करते.
यात स्वतः आणि जोडीदार दोघेही डिस्टर्ब होतातच. पण चांगला हसत खेळत चाललेला संसार ही डळमळीत होतो. प्रसंगी घटस्फोट ही घेतले जातात.
किंवा मुलांच्या करिता एकत्र राहून ही कोणतेही संबंध नाहीत. अशा वेळी जोडीदारही डिस्टर्ब होतो , सतत ते विचार , स्वभाव दोष , वाद विवाद यातून प्रगती ही खुंटते कारण मन एकाग्र चित्त होणे ही अवघड जाते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणे ही अवघड जाते बरेचवेळा नेहमीचे काम करणे ही मुश्किल जाते.
संकुचित स्वभावामुळे आपल्या जोडीदाराची प्रगती खुंटते, पण संपूर्ण कुटुंबाची ही प्रगती खुंटते, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतात. स्वतः ही disturbed personality चे शिकार बनतात.
संकुचित स्वभाव रखण्यापेक्षा विशाल मन ठेवा , स्वभाव मनमोकळा ठेवा. प्रत्येकाला त्याची स्पेस द्या. आणि स्वतः ही घ्या.
आयुष्य सुंदर आहे केवळ संकुचित स्वभावामुळे आपल्या जोडीदाराची प्रगती आणि आपली ही प्रगती , कुटुंबाची प्रगती ही खुंटू देवू नका.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Chhan
Khup chan ahe 👍👍👍