Skip to content

प्रत्येक नवऱ्याची अशी अपेक्षा असते की आपली बायको अशी असावी.

प्रत्येक नवऱ्याची अशी अपेक्षा असते की आपली बायको अशी असावी.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नवरा बायको म्हणजे रथाची दोन चाकं. रथ व्यवस्थित चालायचा असेल तर त्याची दोन चाकं नीट असावी लागतात. तसच संसाराचा रथ नीट चालवायचा असेल तर नवरा बायको रुपी ही दोन चाकं नीट असावी लागतात. एकमेकांना नीट साथ देणारी लागतात. आता साथ द्यायची असेल तर एकमेकांना समजून घेणं, अपेक्षा पूर्ण करणं आलं आणि अपेक्षा या दर वेळी बोलूनच दाखवल्या जातात अस नाही.

प्रत्येक नात्यात अपेक्षा या असतात. त्यात नवरा बायको हे नात तर एकमेकांना पूर्ण करत. त्यामुळे इतक्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा जी व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होणार आहे आयुष्याचा भाग होणार आहे तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जात असतील तर त्यात वावग नाही.

लग्न करताना जश्या बायकोच्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात जस की, माझा होणारा नवरा माझ्या बाबांसारखा असावा, मला नवीन काही करायचे असेल तर त्याने प्रोत्साहन द्यावं, कामात मला मदत करावी. याचप्रमाणे प्रत्येक नवऱ्याची पण आपल्या होणाऱ्या बायकोकडून काही अपेक्षा असते.

आपली बायको अशी असावी अस वाटत. कशी असावी अस वाटत? तर माझ्या आईने जशी माझी काळजी घेतली, जस तिने मला सांभाळलं तसच माझ्या बायकोने देखील मला सांभाळावं अस नवऱ्याला वाटत असत. चांगल्या, सुखाच्या दिवसात तर सर्वच सोबत असतात, पण तिने माझ्या दुःखात पण, संकटाच्या दिवसात पण माझी साथ द्यावी. कोणाचा विश्वास असुदे किंवा नसुदे माझ्या बायकोने तरी माझ्यावर विश्वास ठेवावा, तिने माझ्या सोबत असाव.

मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्याची बायको क्षिती जोग यांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांची मुलाखत घेताना त्याने या गोष्टीचा खुलासा केला की क्षिती त्याच्याहून चार एक वर्षांनी मोठी आहे आणि त्याचं त्याला काही वेगळेपण वाटत नाही. कारण त्याला अस वाटत होत की माझ्या होणाऱ्या बायकोने मला माझ्या आईप्रमाणे माझी काळजी घ्यावी, सांभाळावं आणि ते सर्व मला क्षिती मध्ये दिसल.
जगातल्या बऱ्याच यशस्वी व्यक्ती पहिल्या तर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नीची साथ दिसते. म्हणून अस म्हटल देखील जात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो. हीच साथ नवऱ्याला अपेक्षित असते. अशी बायको हवी अस वाटत असत.

नवरा आपल्या बायकोमध्ये एक मैत्रीण शोधत असतो. अशी मैत्रीण जिच्याशी तो मनमोकळेपणे बोलू शकतो. जिथे काही बंधन नसेल. बायका आपलं दुःख लगेच रडून बोलून मोकळं करतात. पण पुरुषांना इथे बऱ्याचदा बंधन पडत. पुरुषांनी रडण, दुःखी होण हा कमकुवतपणा आहे अस मनावर बिंबवल जात. पण त्यातून त्यांची जी घुसमट होते ती त्यांनाच ठाऊक असते.

अश्या वेळी माझी बायको अशी असावी की जिच्या मांडीवर पडून मी ढसाढसा रडू शकतो. जिला मी माझ दुःख सांगू शकतो. जी त्यावेळी मला रडू नको अस न म्हणता माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवेल अशी बायको असावी अस नवऱ्याला वाटत असत.

बऱ्याचदा अस होत की नवऱ्याला आपल्या मनातल नीट सांगत येत नाही, शब्दात मांडता येत नाही. पण त्याच ते मौन बायकोला समजावं, त्यातून त्याला जे सांगायचं आहे हे बायकोने समजून घ्यावं अस नवऱ्याला वाटत असत.

बऱ्याच घरांमध्ये सासू सूनांमध्ये भांडण होताना दिसतात. त्यातून वेगळं राहुयात मला तुमच्या आई बाबांसोबत राहायचं नाही असे वाद होतात. यात नवरा बिचारा भरडला जातो. कारण दोन्ही त्याला जवळच्या असतात.

म्हणून माझी बायको अशी असावी जिने माझ्या आई बाबांना पण आपलं मानाव, त्यांच्या वृध्दत्वात त्यांचा आधार व्हावं अस वाटत असत. झाडाची सावली जशी झाडाला नेहमी सोबत करते तशी आपली बायको असावी अस नवऱ्याला वाटत. या चार ओळी त्याला खूप चांगल्या पद्धतीने दर्शवतील,

नदीच्या खळाळत्या लाटे सारखी अशी हसणारी तू मैत्रीण हो वृक्षाच्या भक्कमपणा सारखी तू माझा आधार हो चंद्राची शीतल सावली हो
आणि माझ्या सोबत पावलं टाकणारी माझी सहधर्मचारिणी हो….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “प्रत्येक नवऱ्याची अशी अपेक्षा असते की आपली बायको अशी असावी.”

  1. Lekh chhanach aahe pan .He sagla many .vaysani asel tar, kahich samjat nasel tar kai kraycha baikone

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!