पाळीच्या वेळी स्त्रियांना नेमकं आपल्या नवऱ्याविषयी काय वाटतं ?
प्रीती लांडगे
मासिक पाळीच्या वेळी स्त्री खूप थकलेली असते आतुन बाहेरून ती अशक्त झालेली असते हरमोन्स मध्ये बरेच चेजेस असतात एकतर पाळी येण्यापूर्वी 4/5 दिवस आधीच त्रास होत असतो नंतर पाळी आल्यावर ही त्रास म्हणजे महीन्यातील 10/15 दिवस असेच दुखणे काढण्यात जातात आणि दर महिन्याला असे प्रत्येक स्त्रीला होते काहीना होत ही नाही. या काळात मनात खूप चलबिचल चालू असते कधी खूप भिती वाटते. काही बोलायला नको वाटते, कोणाशी बोलायला आवडत नाही.
गप्प बसून किंवा पडून रहावेसे वाटते परंतु असे सुख फार थोड्या महिलांना मिळते किंवा मिळत ही नाही. आणि ज्यांना मिळते. त्याचे पती फार समजूतदार किंवा समजून घेणारे आहेत असे समजून जावे. घरातल्या लोकांना बर्याच लोकांना कळत नाही तिला काय होते आहे. ती अशी त्रासलेली का दिसत आहे. बरे उघडपणे बोलण्याची सोय नाही. नवर्याला काही सांगावे तर तो कधी जवळ नसतो आणि असला तरी तीला काय होते आहे हे समजण्याची बुद्धी होत नाही. आणि झालीच तरी ती स्त्री आहे म्हणून तिला काही किंमत नाही. तिला काय होते ती घरात तर असते. दिवस रात्र तिला काय बाहेर जायचे आहे का कामाला अस बोलतात. आणि दुर्लक्ष करतात आणि आता बाहेर जाते तर घरातले पण काम कर सगळे. आणि कामाला पण जा असे आता सुरू आहे.
या सगळ्या मध्ये स्त्रीला एवढेच वाटते की माझ्या नवर्याने काही वेळ माझ्या सोबत असावे, मला थोडी मदत करावी. कधी चहा द्यावा. जी जड अवघड कामे असतील तर निदान तेव्हा तरी नवर्याने सोबत रहाऊन मदत करावी. तीला गरम पाण्याची पिशवी द्यावी शेक घेण्यासाठी तिच्या नकळतपणे गुपचूप तिची कामे करून तीला सरप्राईज द्यावे. आणि महत्त्वाचे म्हणजे तीला आणि तीच्या मनाला समजून घ्यावे, तीला हसू येईल असे काहीतरी करावे.
तीच्या सोबत एखाद्या बैठा खेळ खेळावा. तिचा बेड त्याच्या वरील बेडशीट छान बदलून द्यावे म्हणजे तिला फ्रेश वाटेल असे सगळे वाटत असते एका स्त्रीला. तसेच तीला जास्तीत जास्त आराम करण्यासाठी द्यावा. नाही केला दोन दिवस स्वंयपाक काही बिघडत नाही, तुम्ही त्या काळात काही बाहेरून मागवा किंवा तुम्ही एखादा पदार्थ बनवा बघा तीला ही खूप आनंदी वाटेल आणि हो त्या काळात तुमच्या काम भावनेवर नियंत्रण ठेवा तीला तेव्हा फक्त अधार हवा असतो. आणि नेहमी देखील तीला आधार तुमची सोबत ही महत्त्वाचे असते तीच्या साठी.
पूर्वी पाळीच्या दिवसात स्त्रीला बाजूला बसवले जायचे म्हणजे वाळीत च टाकले जायचे आली पाळी आता टाका वाळीत अस जणू काही. वाळीत टाकणे हे किती वाईट असते होना परंतु, एका वेगळ्या दृष्टीने विचार करून बघा त्या काळात तीला ते वाळीत टाकणे एका अर्थाने चांगले होते. तीला त्या काळात खूप भरपूर आराम मिळायचा तीचे हक्काचे चार दिवस असायचे तीचे तचे. परंतु आता काळ बदला आहे. तरीही आरामाची गरज असतेच त्या काळात. आता तो तुमचा चॉईस करायचा नाही करायचा.
आणि प्रत्येक नवर्याला हे माहितीच हवे की त्या काळात आपल्या बायकोला काय हव नको तिला काही मदत हवी का हे त्याचे त्याने निरीक्षण केले पाहिजे. थोडे फार तिच्या मनातले ओळखले पाहिजे. जरा तिच्या मनासारखे काहीतरी केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीचा आदर केला पाहिजे. वेळप्रसंगी तीची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तीच्या भावनाची कदर केली पाहिजे कारण तेव्हा खूप उदास, चिडचिड होत असते. ती एक हाडामांसाची माणूस आहे. या दृष्टीने तिच्या कडे बघा तीच्याशी मैत्री करा बायको कम मैत्रीण तुमच्या बायकोहून छान मैत्रीण अशी दुसरी मिळणार नाही. तीच्याशी मैत्री करा. हेच एका स्त्रीला वाटत असते. आणि हीच तीची तिच्या नवर्याकडून अपेक्षा असते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान आहे
Nice 🙂👍
Kharach khup bhari lekh Aahe navryane bayko chi kadji ghetlich pahije
Very good
खुप छान प्रत्येक नवर्याने हे केलं पाहिजे आपल्या बायको साठी
मी माझ्या पत्नीला हे चार पाच दिवस बाजूला बसवून आराम घेण्यास सांगतो तासा मला माझ्या कामातून वेल काडून तिच्या कडे वा मुलांना कडे लक्ष्य द्यावे लागते
aani jar Bayko navara sodun dusrya mansat interested asel tar to sudha aanun dyacha ok
👌