Skip to content

वेगळे होण्याआधी आपण कोणत्या मानसिक समस्येतुन निर्णय घेतोय का, याचा नक्की विचार करा.

वेगळे होण्याआधी आपण कोणत्या मानसिक समस्येतुन निर्णय घेतोय का, याचा नक्की विचार करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


लग्न एक अशी गोष्ट, एक अस नात जे दोन जीवांना पूर्ण करत असत. आपण कितीही म्हटल की मी राहून आयुष्यभर एकटी तरी आपलं हक्काचं अस माणूस आपल्यापाशी असाव अस आपल्याला वयाच्या एका टप्प्यावर वाटायला लागतं. लग्नाला इतकं महत्त्व त्यासाठीच दिलं गेलं असावं. देवाच्या साक्षीने आपण अनोळखी असणाऱ्या माणसाला आपलं मानतो आणि तर नवीन नात मनापासून जपतो.

आयुष्यभराचे जोडीदार होतो आणि ही अनोळखी व्यक्तीचं काही दिवसात कधी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक होऊन जाते आपल्याला पण समजत नाही. त्यातूनच मग व्रत वैकल्य आली, उपास आले. जुन्या काळात आता सारखं उघड उघड प्रेम व्यक्त करता येत नसे. तेच या उपासाच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं. हे झालं अरेंज मॅरेज च्या बाबतीत. आता लव्ह मॅरेज पण खूप मोठ्या संख्येने होतात. त्यामुळे समोरची व्यक्ती पहील्यापासूनच चांगली ओळखीची असते. फक्त नंतर त्या नात्याला कायदेशीर ओळख मिळते इतकचं.

पण ही लग्नाची फक्त एक बाजू आहे. जितकं हे नात पवित्र, सुंदर आणि परिपूर्ण करणार आहे तितकीच त्याची दुसरी बाजू त्रासदायक आहे. ती बाजू म्हणजे घटस्फोट. घटस्फोट जरी फक्त नवरा बायकोमध्ये होत असला तरी त्याची झळ त्या पूर्ण कुटुंबाला बसत असते. त्यातही जर मुल असतील तर त्यांचासाठी हि घटना आयुष्यभर एखाद्या वाईट आठवणी सारखी बनते तसच त्यांच्या बालमनावर खूप परिणाम होतो.

भारतासारख्या देशात जिथे पहिल्यापासून कुटुंब व्यवस्था नात्यांना खूप महत्त्व आहे तिथे डिव्होर्स च प्रमाण आधी कमी होत. जरी मतभेद असले तरी ते सोडवायला माणसं होती. तसच नवरा बायको मध्येही बऱ्याच प्रमाणात समायोजन करण्याची तसेच समजून घेण्याची वृत्ती होती.
आताही ती अनेक जणामध्ये दिसते. पण जस जसा पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे तशी तशी नात्यांची, माणसाची एकंदरीत लग्नाकडे पहायची दृष्टी बदलली आहे.

आताच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. जे दिलं पाहिजे. आपलं म्हणून एक अस्तित्व असल पाहिजे. पण याचा पण अनेक ठिकाणी विपर्यास होत आहे, अतिरेक होत आहे आणि समजून घेण्याची वृत्ती पण कमी होत आहे. ज्यातून मतभेद होतात, वाद, तंटे आणि मग हे सर्व येऊन थांबत घटस्फोटकडे. अलीकडे ही कारण बऱ्याच प्रमाणत दिसून येतात आणि यात माघार कोणाला घ्यायची नसते. कारण दोघांनाही त्यांचंच पटत असत.

पण अजून एक कारण आहे जे या टप्प्याला व्यक्तीला आणु शकत. ते म्हणजे दोघांपैकी एकाला कोणालातरी असणारी मानसिक समस्या. ती कशी? तर अनेक जणांचं बालपण त्रासदायक वातावरण गेलेलं असत, आई बाबांची भांडण, किंवा लहानपणी झालेला अत्याचार, लग्नाआधी आलेले काही वाईट अनुभव. अश्या वातावरणात जर व्यक्ती वाढलेली असली तर ते प्रसंग, त्या आठवणी तो त्रास मनावर कोरला जातो. या गोष्टी मनावर कुठेतरी परिणाम करतात. मुलींच्या बाबतीत तर त्यांचे वडील हे आदर्श असतात आणि प्रत्येक मुलीला अस वाटत असत की तिचा होणारा नवरा तिच्या बाबा सारखं असावा. पण ज्यांना पालकांचे च अनुभव जिथे वाईट मिळतात तिथे जर होणारा जोडीदार जरा जरी तसा वागणारा दिसला तर त्या जुन्या आठवणी परत डोळ्यासमोर येतात आणि ती भीती पुन्हा निर्माण होते.

उदा. जर लहानपणी वडील भांडण करणारे असले आणि नवरा जर तापट असला तरी नवऱ्याच्या स्वभावाहूनही जास्त आधीच्या आठवणी त्याला परत जोडल्या गेल्याने अजून त्रास होतो. तसच आधी जर काही लैंगिक त्रासाचा सामना केला असेल तर नवरा बायकोचं नात याने विस्कळीत होत. याच कारण नवरा जरी प्रेमाने येत असेल किंवा एखादेवेळी हक्काने जवळ येत असेल तरी आधीच्या त्रासदायक आठवणी परत येत्तात आणि नवऱ्याच प्रेमही जबरदस्ती वाटते. बरेचदा इथे समस्या ही असते की या गोष्टी लग्न करायच्या आधी सांगितल्या जात नाहीत कारण समोरचा माणूस काय म्हणेल याची भीती.

आणि अनेकदा अस होत की सांगूनही समोरचा माणूस तितकी संवेदनशीलता दाखवत नाही. म्हणजे काय तर आपल्या जोडीदाराचे आधी चांगले मित्र होऊ त्याला त्या आधीच्या समस्येतून बाहेर काढू आणि नंतर नात पुढे नेऊ.अस होत नाही. नवरा बायकोच्या क्रिया या प्रतिका प्रमाणे काम करत असतात. म्हणजेच काय नवरा सारखं जर जवळीक साधायला पाहतोय म्हणजे त्याला माझं शरीर हवंय. बायको मला न सांगता बाहेर जाते याचा अर्थ आई मला सोडून जायची तशीच हे देखील जाते. हिला माझी पर्वा नाही. आताच्या त्या कृतीहूनही जास्त त्याला जे अर्थ लावले गेलेलं आहेत जे बऱ्याच अंशी आधी आलेल्या अनुभवावर आधारित असतात त्यातून समस्या निर्माण होतात. घटस्फोट घेणाऱ्या दोघांपैकी एकाला तरी अशी समस्या असते.

म्हणूनच हे खूप गरजेचं आहे की जर नात तोडायचा विचार करत असाल आपल्याला अशी कोणती मानसिक समस्या नाही ना ज्याचा आपल्या आताच्या नात्यावर परिणाम होत आहे याचा नक्की विचार करा. आपल्याला जोडीदाराशी याबद्द्ल बोला आणि हे जोडीदारासाठी पण खूप महत्त्वाचं आहे की त्याने आपल्या नवरा किंवा बायकोला चांगल्या पद्धतीने समजून घेतल पाहिजे. चांगल्या समुपदेशकाला भेटून ही समस्या सोडवली पाहिजे. आपलं विखुरल जाणारं नात पुन्हा नीट करण्याची याहून चांगली संधी नसेल. पण ती संधी आपण निर्माण केली पाहिजे. एकेमकांवर विश्वास ठेवून.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वेगळे होण्याआधी आपण कोणत्या मानसिक समस्येतुन निर्णय घेतोय का, याचा नक्की विचार करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!